मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जखऱ्याह ९:१५सुमारे इ.स.पू. ४८७

    आणि सर्वसमर्थ याहवेह त्यांचे रक्षण करतील. ते नष्ट करतील, आणि गोफणीच्या दगडांनी विजयी होतील. ते प्राशन करतील व मद्यपीसारखे गर्जना करतील; ते वाटीसारखे ओतप्रोत भरतील आणि वेदीच्या कोपऱ्यांवर शिंपडण्यासाठी उपयोगात येतील.

  2. जखऱ्याह ९:१६सुमारे इ.स.पू. ४८७

    त्या दिवशी मेंढपाळ जसा आपल्या मेंढरांना वाचवितो, त्याप्रमाणे याहवेह त्यांचे परमेश्वर त्यांच्या लोकांना वाचवतील. मुकुटामध्ये बसविलेल्या रत्नांप्रमाणे ते त्यांच्या देशात चमकतील.

  3. जखऱ्याह ९:१७सुमारे इ.स.पू. ४८७

    ते सर्व किती अद्भुत व सुंदर असतील! धान्य तरुणांची आणि नवा द्राक्षारस तरुणींची भरभराट करेल.

  4. जखऱ्याह १०:१सुमारे इ.स.पू. ४८७

    “वसंतॠतूमध्ये पाऊस पडावा म्हणून याहवेहस विनंती करा; याहवेहच कडाडणाऱ्या मेघगर्जना पाठवितात. तेच सर्व लोकांवर पावसाचा वर्षाव करतात आणि प्रत्येकाला शेतातील पीक देतात.

  5. जखऱ्याह १०:२सुमारे इ.स.पू. ४८७

    मूर्ती लबाड बोलतात, दैवप्रश्न करणारे खोटे दृष्टान्त बघतात; ते जी स्वप्ने सांगतात ती खरी नसतात, त्यांनी केलेले सांत्वन व्यर्थ असते. म्हणून लोक मेंढपाळ नसल्यामुळे जुलमाच्या दबावाखाली मेंढराप्रमाणे भटकतात.

  6. जखऱ्याह १०:३सुमारे इ.स.पू. ४८७

    “माझा संताप मेंढपाळांविरुद्ध भडकतो, आणि मी पुढार्‍यांना शिक्षा करेन; कारण आपल्या कळपाची, यहूदीयाच्या लोकांची काळजी सर्वसमर्थ याहवेह करतील, आणि त्यांना युद्धातील कुशल घोड्यांप्रमाणे करतील.

  7. जखऱ्याह १०:४सुमारे इ.स.पू. ४८७

    यहूदातून कोनशिला येईल, त्याच्यातूनच तंबूचा खिळा, त्याच्यातूनच युद्धाचे धनुष्य, त्याच्यातूनच प्रत्येक अधिकारी येईल.

  8. जखऱ्याह १०:५सुमारे इ.स.पू. ४८७

    एकत्र ते योद्ध्यांसारखे होतील ते आपले शत्रू रस्त्यातील चिखलात तुडवतील. ते लढतील कारण याहवेह त्यांच्याबरोबर आहेत, आणि ते त्यांच्या शत्रूंच्या घोडेस्वारांना लज्जित करतील.

  9. जखऱ्याह १०:६सुमारे इ.स.पू. ४८७

    “मी यहूदाहला बलवान करेन आणि योसेफाच्या वंशास वाचवेन. मी त्यांची पुनर्स्थापना करेन कारण मी त्यांच्यावर करुणा करतो. ते असे होतील, जणू काही मी त्यांचा त्याग कधी केलाच नव्हता, कारण मी त्यांचा याहवेह परमेश्वर आहे आणि मी त्यांचा धावा ऐकेन.

  10. जखऱ्याह १०:७सुमारे इ.स.पू. ४८७

    एफ्राईमी योद्ध्यांसारखे होतील, द्राक्षारसाने व्हावे तसे त्यांचे हृदय आनंदित होईल. त्यांची मुलेसुद्धा हे पाहतील आणि उल्लास पावतील; त्यांची हृदये याहवेहच्या ठायी आनंदित होतील.

  11. जखऱ्याह १०:८सुमारे इ.स.पू. ४८७

    मी त्यांना संकेत देईन, आणि त्यांना एकत्र करेन. मी निश्चितच त्यांना सोडवेन; ते पुन्हा पूर्वीसारखेच असंख्य होतील.

  12. जखऱ्याह १०:९सुमारे इ.स.पू. ४८७

    जरी मी त्यांना लोकांमध्ये विखुरले आहे, तरी देखील त्या दूर देशी ते माझी आठवण करतील. ते व त्यांची सर्व मुलेबाळे जगतील, आणि ते परत येतील.

  13. जखऱ्याह १०:१०सुमारे इ.स.पू. ४८७

    मी त्यांना इजिप्तमधून परत आणेन, आणि अश्शूरातून एकत्र गोळा करेन. गिलआद व लबानोनमध्ये त्यांचे पुनर्वसन करेन, आणि तिथे त्यांना जागा पुरेशी होणार नाही.

  14. जखऱ्याह १०:११सुमारे इ.स.पू. ४८७

    ते संकटांच्या समुद्रातून प्रवास करतील; उफाळणाऱ्या लाटा शांत केल्या जातील आणि नाईल नदीचे खोल पाणी शुष्क होईल. अश्शूरचा गर्व खाली करण्यात येईल व इजिप्तचा राजदंड निघून जाईल.

  15. जखऱ्याह १०:१२सुमारे इ.स.पू. ४८७

    मी याहवेहमध्ये त्यांना सामर्थ्यवान करेन आणि त्यांच्या नामामध्ये ते सुरक्षितपणे जगतील,” असे याहवेह जाहीर करतात.

  16. जखऱ्याह ११:१सुमारे इ.स.पू. ४८७

    हे लबानोना, आपल्या वेशी उघड, म्हणजे अग्नी तुझ्या गंधसरूच्या वृक्षांना भस्म करेल!

  17. जखऱ्याह ११:२सुमारे इ.स.पू. ४८७

    अहो सनोवरच्या वृक्षांनो, गंधसरूच्या सर्व नष्ट झालेल्या वृक्षांसाठी आकांत करा; डौलदार वृक्ष उद्ध्वस्त झाले आहेत! बाशानातील एलावृक्षांनो, आकांत करा; घनदाट वने तोडून टाकली जात आहेत!

  18. जखऱ्याह ११:३सुमारे इ.स.पू. ४८७

    मेंढपाळांचा आकांत ऐका; त्यांची सुपीक कुरणे नष्ट झाली आहेत! सिंहाच्या गर्जना ऐका; यार्देनेच्या खोऱ्यातील गर्द झाडी उद्ध्वस्त झाली आहे.

  19. जखऱ्याह ११:४सुमारे इ.स.पू. ४८७

    मग माझे परमेश्वर याहवेह असे म्हणाले: “कत्तल करण्यासाठी राखीव मेंढरांचा मेंढपाळ हो.

  20. जखऱ्याह ११:५सुमारे इ.स.पू. ४८७

    त्यांचे ग्राहक त्यांची कत्तल करतात आणि त्याबद्दल काहीही शिक्षा न होता निसटून जातात. जे त्यांना विकतात, ते म्हणतात, ‘याहवेहची उपकारस्तुती असो, मी श्रीमंत आहे!’ त्यांचे स्वतःचे मेंढपाळदेखील त्यांना दयामाया दाखवित नाहीत.

  21. जखऱ्याह ११:६सुमारे इ.स.पू. ४८७

    या देशातील लोकांची मी देखील गय करणार नाही,” असे याहवेह जाहीर करतात. “मी प्रत्येकाला त्यांच्या शेजाऱ्याच्या व त्यांच्या राजांच्या हाती देईन. ते देश उद्ध्वस्त करतील आणि मी त्यांच्यापासून कोणालाही सोडविणार नाही.”

  22. जखऱ्याह ११:७सुमारे इ.स.पू. ४८७

    तेव्हा मी कत्तल करण्यासाठी राखीव मेंढरांचा, विशेषतः कळपात अत्याचार होत असलेल्या मेंढरांचा मेंढपाळ झालो. मग मी मेंढपाळांच्या दोन काठ्या घेतल्या, एकीला मी कृपा व दुसरीला ऐक्य असे नाव दिले आणि मेंढरांचे राखण केले.

  23. जखऱ्याह ११:८सुमारे इ.स.पू. ४८७

    आणि एका महिन्यातच मी तीन मेंढपाळांना काढून टाकले. परंतु त्या मेंढरांना माझी घृणा आली, त्यामुळे मी त्रागलो,

  24. जखऱ्याह ११:९सुमारे इ.स.पू. ४८७

    आणि मी म्हणालो, “मी तुमचा मेंढपाळ राहणार नाही. जे मरत असतील, ते मरो आणि जे नाश होत असतील, ते नाश पावोत. जे उरलेले आहेत, ते एकमेकांचे मांस खावोत.”

  25. जखऱ्याह ११:१०सुमारे इ.स.पू. ४८७

    मग मी कृपा नावाची माझी काठी घेतली आणि ती मोडली, सर्व राष्ट्रांशी मी केलेला करार रद्द केला.