- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- जखऱ्याह ३:२सुमारे इ.स.पू. ५१९
तेव्हा याहवेह सैतानाला म्हणाले, “अरे सैताना, याहवेह तुला धमकावितात! यरुशलेमची निवड करणारे याहवेह तुला धमकावितात! अग्नीतून बाहेर ओढून काढलेल्या जळत्या कोलितासारखा हा मनुष्य नाही का?”
- जखऱ्याह ३:३सुमारे इ.स.पू. ५१९
याहवेहच्या दूतासमोर उभ्या असलेल्या यहोशुआची वस्त्रे घाणेरडी होती.
- जखऱ्याह ३:४सुमारे इ.स.पू. ५१९
तेव्हा तिथे उभे असलेल्यांना स्वर्गदूत म्हणाला, “त्याची घाणेरडी वस्त्रे काढा.” मग यहोशुआला तो म्हणाला, “पाहा, मी तुझी पापे दूर केली आहेत आणि आता मी तुला ही महायाजकाची वस्त्रे घालीत आहे.”
- जखऱ्याह ३:५सुमारे इ.स.पू. ५१९
मग मी म्हणालो, “त्याच्या डोक्याला स्वच्छ फेटा बांधा.” तेव्हा याहवेहचा स्वर्गदूत तिथे उभा असताना त्यांनी त्याच्या डोक्याला एक स्वच्छ फेटा बांधला व वस्त्रे चढविली.
- जखऱ्याह ३:६सुमारे इ.स.पू. ५१९
नंतर याहवेहच्या दूताने यहोशुआवर ही जबाबदारी सोपविली:
- जखऱ्याह ३:७सुमारे इ.स.पू. ५१९
“सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘जर तू आज्ञाधारकपणे माझ्या मार्गांनी चालशील, तर तू माझ्या भवनावर शासन करशील आणि माझ्या न्यायमंदिरावर अधिकार चालवशील. ते पवित्र ठेवावेस म्हणून मी ते तुझ्या ताब्यात देईन; आणि इथे उभे असलेल्यांच्या बरोबरीने तू स्थान ग्रहण करशील.
- जखऱ्याह ३:८सुमारे इ.स.पू. ५१९
“ ‘ऐक, हे प्रमुख याजका यहोशुआ, तू आणि तुझ्याबरोबर बसलेले तुझे सहकारी, जे भावी काळाची चिन्हे आहेत: मी माझा सेवक, शाखा आणणार आहे.
- जखऱ्याह ३:९सुमारे इ.स.पू. ५१९
पाहा, मी यहोशुआसमोर एक दगड ठेवला आहे! या दगडाला सात नेत्र आहेत, मी त्यावर एक शिलालेख कोरणार आहे आणि या देशाची पापे एका दिवसात दूर करेन,’ सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.
- जखऱ्याह ३:१०सुमारे इ.स.पू. ५१९
“ ‘त्या दिवशी तुम्ही तुमच्या शेजार्यांना तुमच्या द्राक्षलतेच्या व अंजिराच्या झाडाखाली बसण्यास आमंत्रित करणार,’ सर्वसमर्थ याहवेह असे जाहीर करतात.”
- जखऱ्याह ४:१सुमारे इ.स.पू. ५१९
मग जो याहवेहचा स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता, तो परत आला व त्याने मला जागे केले, जणू काय मी झोपेतच होतो.
- जखऱ्याह ४:२सुमारे इ.स.पू. ५१९
त्याने मला विचारले, “तुला आता काय दिसते?” मी उत्तर दिले, “सात दिवे असलेला एक ठोस सोन्याचा दीपवृक्ष मला दिसत आहे. त्याच्या वरच्या टोकाला एक कटोरा असून, त्यात सात दिवे होते व त्याला लावलेल्या नळ्यांमधून त्या दिव्यांना तेल पुरविले जाई.
- जखऱ्याह ४:३सुमारे इ.स.पू. ५१९
या कटोर्याच्या उजव्या बाजूस एक व डाव्या बाजूस एक अशी दोन जैतुनाची झाडे मला दिसतात.”
- जखऱ्याह ४:४सुमारे इ.स.पू. ५१९
तेव्हा जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता, त्याला मी विचारले, “माझ्या प्रभू, हे काय आहे?”
- जखऱ्याह ४:५सुमारे इ.स.पू. ५१९
त्यावर देवदूताने उत्तर दिले, “हे काय आहे तुला माहीत नाही काय?” तेव्हा मी म्हणालो, “नाही, प्रभू.”
- जखऱ्याह ४:६सुमारे इ.स.पू. ५१९
मग तो मला म्हणाला, “जरूब्बाबेलासाठी याहवेहचा हा संदेश आहे: ‘बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल,’ असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
- जखऱ्याह ४:७सुमारे इ.स.पू. ५१९
“हे विशाल पर्वता, तू कोण आहेस? जरूब्बाबेलापुढे तू सपाट मैदान असा होशील. मग तो शिखरशिलेस बाहेर आणून प्रचंड गजर करेल, ‘याहवेह आशीर्वादित करो! याहवेह आशीर्वादित करो!’ ”
- जखऱ्याह ४:८सुमारे इ.स.पू. ५१९
याहवेहकडून मला एक वचन मिळाले:
- जखऱ्याह ४:९सुमारे इ.स.पू. ५१९
“जरूब्बाबेलाच्या हस्ते या मंदिराचा पाया घातला; आणि तोच स्वहस्ते ते पूर्ण करेल. तेव्हा तुम्हाला समजेल की सर्वसमर्थ याहवेहने मला तुमच्याकडे पाठविले आहे.
- जखऱ्याह ४:१०सुमारे इ.स.पू. ५१९
“ही सुरुवात अगदी लहान असली तरी तिला तुच्छ मानण्यास कोण धजावेल, कारण याहवेहचे सात नेत्र संपूर्ण पृथ्वीभर फिरतात व जरूब्बाबेलाच्या हातात शिखरशिला आहे, हे पाहून हर्षाने प्रफुल्लित होतात?”
- जखऱ्याह ४:११सुमारे इ.स.पू. ५१९
मग मी त्या दूताला विचारले, “दीपवृक्षाच्या उजव्या बाजूस एक व डाव्या बाजूस एक अशी दोन जैतुनाची झाडे का आहेत?”
- जखऱ्याह ४:१२सुमारे इ.स.पू. ५१९
मी पुन्हा त्याला विचारले, “तसेच तेल ओतणार्या सोन्याच्या दोन नळ्यांजवळ दोन जैतुनाच्या फांद्या का आहेत?”
- जखऱ्याह ४:१३सुमारे इ.स.पू. ५१९
त्यावर त्याने मला विचारले, “तुला हे काय आहे ते माहीत नाही काय?” मी म्हटले, “नाही, प्रभू.”
- जखऱ्याह ४:१४सुमारे इ.स.पू. ५१९
तेव्हा त्याने मला सांगितले, “अखिल पृथ्वीचे प्रभू आहेत, त्यांची सेवा करणारे हे दोन अभिषिक्त आहेत.”
- जखऱ्याह ५:१सुमारे इ.स.पू. ५१९
मी पुन्हा वर पाहिले आणि उडत असलेली एक चर्मपत्राची गुंडाळी मला दिसली.
- जखऱ्याह ५:२सुमारे इ.स.पू. ५१९
त्या दूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी उत्तर दिले, “मला एक उडती गुंडाळी दिसते! ती सुमारे वीस हात लांब व दहा हात रुंद असावी.”