मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. रोमकरांस ३:१५सुमारे इ.स. ६०

    “रक्तपात करावयाला त्यांचे पाय धाव घेतात,

  2. रोमकरांस ३:१६सुमारे इ.स. ६०

    दुःख व विध्वंस यांनी त्यांचे मार्ग ओळखले जातात,

  3. रोमकरांस ३:१७सुमारे इ.स. ६०

    आणि शांतीचा मार्ग त्यांना माहीत नाही.”

  4. रोमकरांस ३:१८सुमारे इ.स. ६०

    “त्यांच्या दृष्टीत परमेश्वराचे मुळीच भय नसते.”

  5. रोमकरांस ३:१९सुमारे इ.स. ६०

    आपल्याला माहीत आहे की, जे काही नियमशास्त्र सांगते ते नियमाच्या अधीन असणार्‍यांना सांगते, यासाठी की प्रत्येक तोंड बंद होईल व सर्व जगाला परमेश्वरासमोर हिशोब द्यावा लागेल.

  6. रोमकरांस ३:२०सुमारे इ.स. ६०

    नियमशास्त्राप्रमाणे कृती करणारी कोणीही व्यक्ती परमेश्वरासमोर नीतिमान म्हणून घोषित केली जाणार नाही; आपल्या पापांची जाणीव आपणाला नियमशास्त्रामुळे होते.

  7. रोमकरांस ३:२१सुमारे इ.स. ६०

    पण आता नियमशास्त्राव्यतिरीक्त परमेश्वराचे नीतिमत्त्व प्रकट झाले आहे, याविषयीची साक्ष नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांनी दिली आहे.

  8. रोमकरांस ३:२२सुमारे इ.स. ६०

    परमेश्वराचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्‍यांना दिले आहे, त्यात यहूदी व गैरयहूदी असा भेद केलेला नाही,

  9. रोमकरांस ३:२३सुमारे इ.स. ६०

    कारण सर्वांनी पाप केले आहे, आणि परमेश्वराच्या गौरवाला अंतरले आहेत,

  10. रोमकरांस ३:२४सुमारे इ.स. ६०

    आता परमेश्वराच्या कृपेने, ख्रिस्त येशूंच्याद्वारे खंडणी भरून आपल्याला मुक्त केले आणि विनामूल्य नीतिमान म्हणून जाहीर केले आहे.

  11. रोमकरांस ३:२५सुमारे इ.स. ६०

    ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्ताने विश्वासाद्वारे प्रायश्चिताचा यज्ञ व्हावा म्हणून परमेश्वराने त्यांना प्रस्तुत केले. यासाठी की मागे केलेल्या आपल्या पापांसाठी त्यांच्या सहनशीलतेमुळे दंड मिळू नये, तर त्यांचे नीतिमत्व प्रगट व्हावे.

  12. रोमकरांस ३:२६सुमारे इ.स. ६०

    आता सध्याच्या काळात देखील ते आपले नीतिमत्व प्रकट करीत आहेत, यासाठी की त्यांनी स्वतःवर आणि येशूंवर विश्वास ठेवणार्‍यांना नीतिमान म्हणून घोषित करावे.

  13. रोमकरांस ३:२७सुमारे इ.स. ६०

    तर मग आमचा गर्व कशासाठी? तो वगळण्यात आला आहे. कोणत्या नियमानुसार? नियमाला कर्माची जोड हवी का? नाही, नियमाला विश्वासाची गरज आहे.

  14. रोमकरांस ३:२८सुमारे इ.स. ६०

    आमची मान्यता ही आहे की मनुष्य विश्वासाद्वारे नीतिमान ठरतो, नियमशास्त्रातील कर्मामुळे नाही.

  15. रोमकरांस ३:२९सुमारे इ.स. ६०

    किंवा परमेश्वर केवळ यहूदीयांचाच परमेश्वर आहे का? तो गैरयहूदीयांचा परमेश्वर नाही का? तो गैरयहूदीयांचा सुद्धा आहेच,

  16. रोमकरांस ३:३०सुमारे इ.स. ६०

    परमेश्वर एकच आहे, मग सुंता झालेले वा सुंता न झालेले, विश्वासाच्याद्वारे सर्वजण निरपराधी ठरतात.

  17. रोमकरांस ३:३१सुमारे इ.स. ६०

    आता आपण नियमशास्त्राला विश्वासाने निरुपयोगी करतो का? मुळीच नाही! उलट आपण नियमशास्त्र प्रस्थापित करतो.

  18. रोमकरांस ४:१सुमारे इ.स. ६०

    आपण याबाबतीत काय म्हणावे, शारीरिक दृष्टीने आपला पूर्वज अब्राहामाला काय अनुभवयास मिळाले?

  19. रोमकरांस ४:२सुमारे इ.स. ६०

    अब्राहाम जर कृत्यांमुळे नीतिमान ठरला असता तर त्याला बढाई मिरविण्यास काही कारण असते; परंतु परमेश्वरासमोर नाही.

  20. रोमकरांस ४:३सुमारे इ.स. ६०

    शास्त्रलेख काय म्हणतो? “अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.”

  21. रोमकरांस ४:४सुमारे इ.स. ६०

    आता जो परिश्रम करतो त्याची मजुरी त्याचे दान नसून त्याचा अधिकार आहे.

  22. रोमकरांस ४:५सुमारे इ.स. ६०

    जो व्यक्ती परिश्रम करीत नाही, परंतु जो अधर्मी लोकांना नीतिमान ठरविणार्‍या त्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तो व्यक्ती विश्वासाने नीतिमान ठरतो.

  23. रोमकरांस ४:६सुमारे इ.स. ६०

    दावीद राजा पण तेच सांगतो की कर्मावाचून परमेश्वर त्यांना नीतिमान म्हणून जाहीर करतो, त्यांच्या धन्यतेचा आनंद काय वर्णावा:

  24. रोमकरांस ४:७सुमारे इ.स. ६०

    “धन्य ते लोक, ज्यांच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे.

  25. रोमकरांस ४:८सुमारे इ.स. ६०

    धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशोबी प्रभू कधीही पापाचा दोष लावणार नाही.”