- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- रोमकरांस ४:९सुमारे इ.स. ६०
हा आशीर्वाद केवळ सुंता झालेल्यांसाठी आहे की सुंता न झालेल्यांसाठी सुद्धा आहे? आपण म्हणतो की अब्राहामाचा विश्वास त्याला नीतिमत्व असे गणण्यात आला.
- रोमकरांस ४:१०सुमारे इ.स. ६०
कोणत्या परिस्थितीत त्याला मान्यता देण्यात आली? सुंता होण्यापूर्वी किंवा नंतर? नंतर नाही, पण आधी!
- रोमकरांस ४:११सुमारे इ.स. ६०
सुंता झालेली नसताना त्याच्या विश्वासामुळे नीतिमत्व प्राप्त होते याचा शिक्का म्हणून सुंता ही खूण होती. जे विश्वास ठेवतात पण ज्यांची सुंता झाली नाही, त्या सर्वांचा अब्राहाम हा पिता झाल्यामुळे त्यांना नीतिमत्व प्राप्त व्हावे,
- रोमकरांस ४:१२सुमारे इ.स. ६०
आणि तो सुंता झालेल्याचाही पिता आहे, पण ज्यांची केवळ सुंताच झाली नाही तर जो विश्वास आपला पिता अब्राहामामध्ये सुंता होण्यापूर्वी होता त्या विश्वासावर पाऊल ठेऊन चालतात त्यांचाही पिता आहे.
- रोमकरांस ४:१३सुमारे इ.स. ६०
अब्राहामाला व त्याच्या वंशजांना जे अभिवचन दिले होते की तो या पृथ्वीचा वारस होईल, ते नियमशास्त्राद्वारे नव्हे, तर विश्वासाने जे नीतिमत्व प्राप्त होते त्याद्वारे देण्यात आले होते
- रोमकरांस ४:१४सुमारे इ.स. ६०
कारण जे नियमावर अवलंबून आहेत ते जर वारसदार आहेत, तर विश्वासास काहीच किंमत नाही आणि अभिवचने निरर्थक आहेत.
- रोमकरांस ४:१५सुमारे इ.स. ६०
कारण नियमामुळे क्रोध भडकतो आणि जिथे नियम नाही तिथे उल्लंघनही नाही.
- रोमकरांस ४:१६सुमारे इ.स. ६०
यास्तव, अभिवचन विश्वासाच्याद्वारे कृपा म्हणून अब्राहामाच्या सर्व वंशजाला मिळते. जे केवळ नियमांच्या अधीन आहेत त्यांनाच नव्हे, तर ज्यांचा विश्वास अब्राहामाच्या विश्वासासारखा आहे त्या सर्वांना, कारण अब्राहाम आपल्या सर्वांचा पिता आहे.
- रोमकरांस ४:१७सुमारे इ.स. ६०
असे लिहिले आहे: “मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले.” परमेश्वराच्या दृष्टीने अब्राहाम आमचा पिता आहे, ज्यावर त्याने विश्वास ठेवला, जो परमेश्वर मेलेल्यांना जीवन देतो आणि ज्यागोष्टी नाही त्या गोष्टी अस्तित्वात याव्या अशी आज्ञा देतो.
- रोमकरांस ४:१८सुमारे इ.स. ६०
आशा धरण्यास काही आधार नसताना, अब्राहामाने आशेने विश्वास ठेवला व तो अनेक राष्ट्रांचा पिता झाला, आणि “तुझी संततीही होईल.” असे त्याला सांगण्यात आले होते त्याचप्रमाणे झाले.
- रोमकरांस ४:१९सुमारे इ.स. ६०
त्याचे शरीर जणू काही मृत अवस्थेत असताना—तो अंदाजे शंभर वर्षाचा होता—व साराहचे गर्भाशय मृत झालेले असताना, त्याने आपला विश्वास डळमळू दिला नाही
- रोमकरांस ४:२०सुमारे इ.स. ६०
परमेश्वराच्या अभिवचनाबद्दल अब्राहाम कधीही अविश्वासाने डळमळला नाही, परंतु विश्वासामध्ये दृढ झाला आणि त्याने परमेश्वराला गौरव दिले.
- रोमकरांस ४:२१सुमारे इ.स. ६०
अभिवचन दिल्याप्रमाणे परमेश्वर करावयास समर्थ आहे ही त्याची पूर्ण खात्री होती.
- रोमकरांस ४:२२सुमारे इ.स. ६०
त्यामुळेच, “ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.”
- रोमकरांस ४:२३सुमारे इ.स. ६०
हे शब्द “तो नीतिमान ठरविला गेला” केवळ त्यांच्यासाठीच लिहिले गेले नव्हते,
- रोमकरांस ४:२४सुमारे इ.स. ६०
परंतु आपल्यासाठीही आहे, ज्यांनी प्रभू येशूंना मरणातून उठविले त्यावर विश्वास ठेवला तर परमेश्वर आपल्यालाही नीतिमान ठरवेल.
- रोमकरांस ४:२५सुमारे इ.स. ६०
त्यांना आपल्या पापांसाठी मरणाच्या स्वाधीन करण्यात आले आणि आपल्या नीतिमत्वासाठी पुन्हा उठविले गेले.
- रोमकरांस ५:१सुमारे इ.स. ६०
ज्याअर्थी, विश्वासाद्वारे आपल्याला नीतिमान ठरविण्यात आले आहे, त्याअर्थी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराबरोबर शांती आहे,
- रोमकरांस ५:२सुमारे इ.स. ६०
ख्रिस्ताद्वारे विश्वासामुळेच त्यांनी आपल्याला या कृपेत प्रवेश दिला आहे. येथे आपण स्थिर आहोत व आपण परमेश्वराच्या आशेच्या गौरवाची प्रौढी मिरवितो.
- रोमकरांस ५:३सुमारे इ.स. ६०
इतकेच केवळ नव्हे तर क्लेशातही आनंद करतो, कारण आपणास माहीत आहे की दुःख हे धीर उत्पन्न करते.
- रोमकरांस ५:४सुमारे इ.स. ६०
धीरामुळे, चारित्र्य; आणि चारित्र्यामुळे, आशा.
- रोमकरांस ५:५सुमारे इ.स. ६०
आशेमुळे आपण लज्जित होणार नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराची प्रीती आपल्या अंतःकरणात ओतली गेली आहे.
- रोमकरांस ५:६सुमारे इ.स. ६०
आपण अगदी दुर्बल होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी, अधर्मी लोकांसाठी मरण पावले.
- रोमकरांस ५:७सुमारे इ.स. ६०
नीतिमान मनुष्यासाठी क्वचितच कोणी मरेल; चांगल्या मनुष्यासाठी मरावयास कोणीतरी धजेल.
- रोमकरांस ५:८सुमारे इ.स. ६०
परंतु परमेश्वर आम्हावरील स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण असे देतात की, आम्ही पापी असताना, ख्रिस्त आम्हासाठी मरण पावले.