- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- रोमकरांस ६:१३सुमारे इ.स. ६०
तुमच्या शरीराचा कोणताही अवयव पाप करण्यासाठी दुष्टपणाचे साधन म्हणून सादर करू नका, परंतु त्याऐवजी मरणातून जिवंत झाल्यासारखे परमेश्वराला सादर करा; आणि आपला प्रत्येक अवयव नीतिमत्वाची साधने होण्याकरिता त्याला सादर करा.
- रोमकरांस ६:१४सुमारे इ.स. ६०
तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून येथून पुढे पाप तुम्हावर स्वामित्व चालविणार नाही.
- रोमकरांस ६:१५सुमारे इ.स. ६०
तर मग काय? आपण नियमशास्त्राच्या अधीन नसून कृपेच्या अधीन आहोत, म्हणून आपण पाप करावे काय? नक्कीच नाही!
- रोमकरांस ६:१६सुमारे इ.स. ६०
ज्याची आज्ञा पाळण्यासाठी तुम्ही स्वतःला वाहवून घेता, त्याची आज्ञा पाळण्याने तुम्ही त्याचे गुलाम बनता; पापाची गुलामी तर मरण किंवा परमेश्वराचे आज्ञापालन तर नीतिमत्व हे तुम्हाला माहीत नाही काय?
- रोमकरांस ६:१७सुमारे इ.स. ६०
परमेश्वराचे आभारी आहोत, कारण पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होता, परंतु आता तुम्हाला जी शिकवण दिली आहे तिचे तुम्ही अंतःकरणापासून आज्ञापालन केले आणि तुम्ही समर्पित आहात.
- रोमकरांस ६:१८सुमारे इ.स. ६०
तुम्ही पापापासून मुक्त होऊन आता नीतिमत्वाचे दास झाला आहात.
- रोमकरांस ६:१९सुमारे इ.स. ६०
तुमच्या मानवी रीतीप्रमाणे रोजच्या जीवनातील उदाहरण घेऊन मी बोलतो. तुम्ही आपले अवयव अशुद्धपणाला व सतत वाढणार्या दुष्टपणाला दास म्हणून समर्पित केले होते, तसे आता स्वतःस जे नीतिमत्व पावित्र्याकडे नेते त्यास दास म्हणून समर्पित करा.
- रोमकरांस ६:२०सुमारे इ.स. ६०
जेव्हा तुम्ही पापाचे दास होता, तेव्हा नीतिमत्वाच्या बंधनातून मुक्त होता.
- रोमकरांस ६:२१सुमारे इ.स. ६०
ज्यासाठी तुम्हाला आता लाज वाटते त्या गोष्टींपासून त्यावेळी तुम्हाला काय लाभ मिळाला? त्या गोष्टींचा परिणाम तर मरण आहे.
- रोमकरांस ६:२२सुमारे इ.स. ६०
पण आता तुम्ही पापाच्या सत्तेपासून मुक्त झाला असून परमेश्वराचे दास झाला आहात, आणि जो लाभ तुम्हाला मिळाला आहे तो पावित्र्याकडे नेतो व त्याचा परिणाम सार्वकालिक जीवन आहे.
- रोमकरांस ६:२३सुमारे इ.स. ६०
कारण पापाचे वेतन मरण आहे, पण परमेश्वराचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.
- रोमकरांस ७:१सुमारे इ.स. ६०
बंधूंनो आणि भगिनींनो, ज्यांना नियमशास्त्र माहीत आहे, त्यांच्याबरोबर मी बोलतो, एखादी व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राचे प्रभुत्व तिच्यावर राहते हे तुम्हाला समजत नाही काय?
- रोमकरांस ७:२सुमारे इ.स. ६०
उदाहरणार्थ, लग्न झालेली स्त्री तिचा पती जिवंत असेपर्यंत त्याला बांधलेली असते, परंतु जर तिचा पती मरण पावला, तर ती ज्या नियमाद्वारे त्याला बांधलेली असते त्यापासून मुक्त होते.
- रोमकरांस ७:३सुमारे इ.स. ६०
पती जिवंत असताना, तिने दुसर्या पुरुषाशी संबंध ठेवले तर तिला व्यभिचारिणी म्हणतात; पण पती मरण पावल्यावर ती त्या नियमापासून मुक्त होते; नंतर तिने दुसर्या पुरुषाशी विवाह केला, तर ती व्यभिचारिणी होत नाही.
- रोमकरांस ७:४सुमारे इ.स. ६०
त्याप्रमाणे बंधू व भगिनींनो, तुम्ही सुद्धा ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राला मृत झाले आहात, म्हणून तुम्ही दुसर्याचे, जो मरणातून उठविला गेला त्याचे व्हावे यासाठी की तुम्ही परमेश्वरासाठी फळ द्यावे.
- रोमकरांस ७:५सुमारे इ.स. ६०
आपण पापी स्वभावाच्या नियंत्रणात होतो, व ज्या कृत्यांचे फळ मरण आहे, ती करावयास आपल्या वासना नियमानुसार आपल्यामध्ये कार्य करीत होत्या.
- रोमकरांस ७:६सुमारे इ.स. ६०
परंतु आता ज्याने आपल्याला बांधून ठेवले होते, त्याला आपण मेलेले आहोत, म्हणून नियमशास्त्रातील जुन्या लेखाप्रमाणे नव्हे, तर एका नव्या आत्म्याच्या मार्गाने सेवा करू या.
- रोमकरांस ७:७सुमारे इ.स. ६०
तर मग आपण काय म्हणावे? नियम पापमय आहे का? नक्कीच नाही! नियमाशिवाय पाप काय आहे हे मला समजले नसते. “तू लोभ करू नको,” असे नियमशास्त्र मला म्हणाले नसते, तर लोभ काय आहे हे मला कधीच समजले नसते.
- रोमकरांस ७:८सुमारे इ.स. ६०
परंतु पापाने नियमांचा फायदा घेऊन संधी साधून माझ्यामध्ये सर्वप्रकारचा लोभ उत्पन्न केला; कारण नियमांशिवाय पाप मृत आहे.
- रोमकरांस ७:९सुमारे इ.स. ६०
अशी वेळ होती जेव्हा मी नियमशास्त्राशिवाय जिवंत होतो; परंतु आज्ञा आल्यावर, पाप जीवित झाले आणि मी मरण पावलो.
- रोमकरांस ७:१०सुमारे इ.स. ६०
वास्तविक ज्या आज्ञांनी जीवन द्यावयास पाहिजे होते, त्याच आज्ञांनी मरण आले हे मला आढळून आले.
- रोमकरांस ७:११सुमारे इ.स. ६०
पापाने आज्ञांच्या योगे गैरफायदा घेऊन मला फसविले, आणि आज्ञांच्या द्वारे मला ठार मारले.
- रोमकरांस ७:१२सुमारे इ.स. ६०
वास्तविक नियमशास्त्र पवित्र आहे, आणि आज्ञा पवित्र, न्याययुक्त आणि उत्तम आहेत.
- रोमकरांस ७:१३सुमारे इ.स. ६०
परंतु जे उत्तम ते माझ्या मरणास कारणीभूत झाले काय? असे नक्कीच नाही. पाप ते पाप दिसावे, आणि चांगल्याद्वारे पापाने माझ्यामध्ये मृत्यू उत्पन्न केला, यासाठी की आज्ञेद्वारे पाप हे पराकोटीचे पाप दिसून यावे.
- रोमकरांस ७:१४सुमारे इ.स. ६०
नियमशास्त्र आध्यात्मिक आहे; हे आपल्याला माहीत आहे. पण मी तर पापाला गुलाम म्हणून विकलेला दैहिक प्राणी आहे.