- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- रोमकरांस ५:९सुमारे इ.स. ६०
त्यांच्या रक्ताने आपल्याला नीतिमान ठरविले, तर किती विशेषकरून परमेश्वराच्या सर्व भावी क्रोधापासून त्यांच्याद्वारे आपला उद्धार होईल!
- रोमकरांस ५:१०सुमारे इ.स. ६०
आपण परमेश्वराचे शत्रू असताना, त्यांच्या पुत्राच्या मरणाद्वारे आपला समेट झाला, त्याअर्थी समेट झाल्यानंतर, कितीतरी अधिक त्यांच्या जीवनाद्वारे तारले जाऊ!
- रोमकरांस ५:११सुमारे इ.स. ६०
एवढेच नव्हे, तर परमेश्वरामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अभिमान बाळगतो, त्यांच्याद्वारे आमचा आता समेट झाला आहे.
- रोमकरांस ५:१२सुमारे इ.स. ६०
एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाद्वारे मरण जगात आले; सर्व लोकांमध्ये मरण पसरले, कारण सर्वांनी पाप केले आहे.
- रोमकरांस ५:१३सुमारे इ.स. ६०
नियमशास्त्र देण्यापूर्वी पाप जगात होतेच; पण नियमशास्त्र अस्तित्वात नसल्यामुळे, कोणालाही पापाबद्दल दोषी ठरविता येत नव्हते.
- रोमकरांस ५:१४सुमारे इ.स. ६०
आदामापासून मोशेपर्यंत मृत्यूचे राज्य होते, कारण आदामासारखा आज्ञेचा भंग त्यांनी स्वतः कधीही केलेला नव्हता. आदाम, जो येणार होता त्याचे प्रतिरूप होता.
- रोमकरांस ५:१५सुमारे इ.स. ६०
तरी देणगी ही आज्ञाभंगासारखी नाही. कारण या एका मनुष्याने, म्हणजे आदामाने, आपल्या पापांमुळे अनेक मानवांवर मृत्यू आणला. परंतु परमेश्वराची कृपा व देणगी एका मनुष्याद्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या कृपेद्वारे अनेकांना प्राप्त झाली.
- रोमकरांस ५:१६सुमारे इ.स. ६०
परमेश्वराचे वरदान एका मनुष्याने केलेल्या पापाच्या परिणामासारखे नाही आणि एकाच्या पापामुळे न्याय दंड मिळाला, परंतु वरदान अनेक अपराधानंतर आले आणि आपल्याला नीतिमान गणण्यात आले.
- रोमकरांस ५:१७सुमारे इ.स. ६०
कारण जर एका मनुष्याच्या अपराधामुळे, त्याच मनुष्याच्या द्वारे मरणाने राज्य केले, तर ज्यांना कृपेची व नीतिमत्वाची विपुल दाने मिळाली आहेत, ते येशू ख्रिस्त जे एक मानव आहेत, त्यांच्याद्वारे जीवनात किती विशेषकरून राज्य करतील!
- रोमकरांस ५:१८सुमारे इ.स. ६०
यास्तव एका अपराधामुळे सर्व मनुष्यजाती दंडास पात्र झाली, तसेच न्यायीपणाच्या एका कृत्यामुळे सर्व मनुष्यजात जीवनासाठी नीतिमान ठरविली जाते.
- रोमकरांस ५:१९सुमारे इ.स. ६०
कारण जसे एक मनुष्याच्या आज्ञाभंगामुळे अनेक लोक पापी ठरविले गेले, तसेच एका मनुष्याच्या आज्ञापालनामुळे अनेक लोक नीतिमान ठरविले जातील.
- रोमकरांस ५:२०सुमारे इ.स. ६०
पापाची जाणीव वाढावी म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, कारण जिथे पाप वाढले, तिथे कृपा अति विपुल झाली,
- रोमकरांस ५:२१सुमारे इ.स. ६०
यासाठी की ज्याप्रमाणे पापाने मरणाद्वारे राज्य केले, त्याचप्रमाणे कृपेने नीतिमत्वाद्वारे राज्य करावे आणि येशू ख्रिस्त आपल्या प्रभूद्वारे सार्वकालिक जीवन मिळावे.
- रोमकरांस ६:१सुमारे इ.स. ६०
तर मग आपण काय म्हणावे? आपल्याला अधिक कृपा मिळावी म्हणून आपण पाप करीतच राहावे काय?
- रोमकरांस ६:२सुमारे इ.स. ६०
नक्कीच नाही! जे आपण पापाला मरण पावलो आहोत, ते आपण त्यात कसे जगू शकतो?
- रोमकरांस ६:३सुमारे इ.स. ६०
ज्या आपण सर्वांनी ख्रिस्त येशूंमध्ये बाप्तिस्मा घेतला, त्यांच्या मृत्यूमध्येही बाप्तिस्मा घेतला हे तुम्हाला माहीत नाही का?
- रोमकरांस ६:४सुमारे इ.स. ६०
यास्तव बाप्तिस्म्याद्वारे मरणाने आपण ख्रिस्ताबरोबर पुरले गेलो यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवी शक्तीने मरणातून उठविले गेले, त्याचप्रमाणे आपणही पूर्णतः नवीन जीवन जगावे.
- रोमकरांस ६:५सुमारे इ.स. ६०
जर आपण त्यांच्या मरणामध्ये त्यांच्याशी अशा रीतीने संयुक्त झालो, तर त्यांच्या पुनरुत्थानामध्येही त्यांच्याशी खात्रीने संयुक्त होऊ.
- रोमकरांस ६:६सुमारे इ.स. ६०
आपल्याला माहीत आहे की आपला जुना स्वभाव त्यांच्याबरोबरच खिळला गेला व पापाच्या अधिकारात असलेले आपले शरीर निर्बल झाले म्हणून यापुढे आपण पापाचे गुलाम असू नये.
- रोमकरांस ६:७सुमारे इ.स. ६०
कारण जो कोणी मरण पावला आहे, तो पापापासून मुक्त झाला आहे.
- रोमकरांस ६:८सुमारे इ.स. ६०
आता जर आपण ख्रिस्ताबरोबर मेलो, तर त्यांच्याबरोबर जिवंतही होऊ असा आपला विश्वास आहे.
- रोमकरांस ६:९सुमारे इ.स. ६०
कारण आपल्याला ठाऊक आहे की, ख्रिस्त मरणातून उठविले गेले ते पुन्हा मरू शकत नाहीत; यापुढे त्यांच्यावर मरणाची सत्ता चालणार नाही.
- रोमकरांस ६:१०सुमारे इ.स. ६०
त्यांचे हे मरण पापासाठी एकदाच होते; पण आता जे जीवन ते जगतात, ते परमेश्वराकरिता जगतात.
- रोमकरांस ६:११सुमारे इ.स. ६०
याप्रमाणे, आपण पापाला मरण पावलेले आणि ख्रिस्त येशूंद्वारे परमेश्वरासाठी जिवंत झालेले असे माना.
- रोमकरांस ६:१२सुमारे इ.स. ६०
तुम्ही वाईट वासनांच्या स्वाधीन होऊ नये म्हणून तुमच्या मर्त्य शरीरावर पापाची सत्ता गाजवू देऊ नका.