मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. रोमकरांस २:१९सुमारे इ.स. ६०

    तुम्हाला खात्री आहे की, तुम्ही एखाद्या आंधळ्याला मार्गदर्शक व्हाल व अंधारात इतरांना प्रकाश असे व्हाल.

  2. रोमकरांस २:२०सुमारे इ.स. ६०

    नियमांचे दृश्य स्वरूप ज्ञान व सत्य यामध्ये आहे, आणि म्हणून आपण मूर्खाचे मार्गदर्शक, लहान मुलांचे शिक्षक आहोत असे तुम्हाला वाटते.

  3. रोमकरांस २:२१सुमारे इ.स. ६०

    जे तुम्ही, इतरांना शिकविणारे, ते तुम्ही स्वतःला का शिकवीत नाही? चोरी करू नका म्हणून संदेश सांगणारे, तुम्ही चोरी का करता?

  4. रोमकरांस २:२२सुमारे इ.स. ६०

    जे तुम्ही लोकांनी व्यभिचार करू नये, असे म्हणता ते तुम्ही व्यभिचार करता का? जे तुम्ही मूर्तीचा विटाळ मानणारे, तुम्ही मंदिर का लुटता?

  5. रोमकरांस २:२३सुमारे इ.स. ६०

    जे तुम्ही नियमशास्त्राचा गर्व असणारे, ते तुम्ही नियम मोडून परमेश्वराचा अपमान का करता?

  6. रोमकरांस २:२४सुमारे इ.स. ६०

    मग नियमशास्त्र म्हणते: “तुमच्यामुळेच गैरयहूदी लोकांमध्ये परमेश्वराच्या नावाची निंदा होत आहे.”

  7. रोमकरांस २:२५सुमारे इ.स. ६०

    नियम पाळत असाल तर सुंतेला काही मोल आहे; पण तुम्ही नियम पाळीत नसाल, तर सुंता न झाल्यासारखे आहात.

  8. रोमकरांस २:२६सुमारे इ.स. ६०

    जर ज्यांची सुंता झाली नाही ते नियमशास्त्राचे पालन करतात, तर त्यांची सुंता न होणे, हे सुंता झाल्यासारखे होणार नाही काय?

  9. रोमकरांस २:२७सुमारे इ.स. ६०

    ज्यांच्या शरीराची सुंता झालेली नसून नियम पाळतात ते तुम्हाला दोषी ठरवतील, कारण तुमच्याजवळ लेखी नियम आहेत आणि सुंता झालेली असतानाही तुम्ही नियम तोडता.

  10. रोमकरांस २:२८सुमारे इ.स. ६०

    कारण केवळ बाह्य स्वरूपाने कोणी यहूदी होत नाही, सुंता ही केवळ शारीरिक आणि बाह्य नाही.

  11. रोमकरांस २:२९सुमारे इ.स. ६०

    तोच खरा यहूदी, जो मनाने यहूदी आहे आणि सुंता ही अंतःकरणाची सुंता आहे व ती आत्म्याद्वारे आहे, लेखी व्यवस्थेप्रमाणे नाही. अशा व्यक्तीची प्रशंसा इतर लोकांकडून नव्हे, तर परमेश्वरापासून होईल.

  12. रोमकरांस ३:१सुमारे इ.स. ६०

    तर यहूदी असून फायदा काय, किंवा सुंतेला काही मोल आहे का?

  13. रोमकरांस ३:२सुमारे इ.स. ६०

    सर्व बाबतीत आहे! सर्वात प्रथम यहूदीयांना परमेश्वराने आपले वचन सोपवून दिले होते.

  14. रोमकरांस ३:३सुमारे इ.स. ६०

    जर काहीजण अविश्वासू होते तर मग काय? त्यांचा अविश्वासूपणा हा परमेश्वराच्या विश्वासूपणाला रद्द करेल का?

  15. रोमकरांस ३:४सुमारे इ.स. ६०

    नक्कीच नाही! प्रत्येक मनुष्य लबाड असला तरी परमेश्वर खरेच आहेत. यासंबंधी असे लिहिले आहे: “म्हणून तुम्ही यथायोग्य न्याय दिला आहे आणि जेव्हा तुम्ही न्याय देता तेव्हा ते दोषमुक्त असतात.”

  16. रोमकरांस ३:५सुमारे इ.स. ६०

    परंतु जर आमच्या अनीतीमुळे परमेश्वराचे नीतिमत्व अधिक स्पष्ट होत असेल तर आम्ही काय म्हणावे? परमेश्वर आपल्यावर क्रोध आणतात तर ते अन्यायी आहेत काय? (मी तर हे मानवी रीतीने बोलतो.)

  17. रोमकरांस ३:६सुमारे इ.स. ६०

    पण असे कदापि नाही! कारण मग परमेश्वर जगाचा न्याय कसा करतील?

  18. रोमकरांस ३:७सुमारे इ.स. ६०

    कोणी असा वाद करेल, “जर माझ्या खोटेपणाने परमेश्वराच्या खरेपणाचे संवर्धन होते व त्यांचे अधिक गौरव होते, तर मी पापी आहे असा दोष का लावण्यात येत आहे?”

  19. रोमकरांस ३:८सुमारे इ.स. ६०

    किंवा, “चला आपण वाईट करू म्हणजे यामधून काही चांगले निष्पन्न होईल” आम्ही असेच म्हणालो, असा काहीजण आमच्यावर आरोप लावतात. त्यांची दंडाज्ञा तर योग्यच आहे!

  20. रोमकरांस ३:९सुमारे इ.स. ६०

    तर मग काय? यात आम्हाला काही फायदा आहे का? मुळीच नाही! कारण आम्ही आधी यहूदी आणि गैरयहूदी सर्वजण पापाच्या सत्तेखाली आहेत असा आरोप केला आहे.

  21. रोमकरांस ३:१०सुमारे इ.स. ६०

    असे लिहिले आहे: “कोणीही नीतिमान नाही, एकही नाही;

  22. रोमकरांस ३:११सुमारे इ.स. ६०

    समंजस असा कोणी नाही; परमेश्वराला शोधणारा कोणी नाही.

  23. रोमकरांस ३:१२सुमारे इ.स. ६०

    प्रत्येकजण भटकून गेले आहेत; सर्वजण निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.”

  24. रोमकरांस ३:१३सुमारे इ.स. ६०

    “त्यांची मुखे उघड्या थडग्यासारखी आहेत” त्यांच्या जिभेने ते खोटे बोलतात. “नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते.”

  25. रोमकरांस ३:१४सुमारे इ.स. ६०

    “त्यांची मुखे तर शापाने व कडूपणाने भरलेली आहेत.”