मुख्य मजकुरावर जा

circa 2100–1900 BC

Abraham: The Covenant

God calls Abram from Ur, establishes an everlasting covenant, and promises a son through whom all nations will be blessed.

394 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती १४:१३सुमारे इ.स.पू. १९१३

    या लढाईत वाचलेला एक मनुष्य इब्री अब्रामाकडे पळून आला व त्याने ही बातमी त्याला सांगितली. त्यावेळी अब्राम, अमोरी मम्रे याच्या एला राईत तळ देऊन राहिला होता. अष्कोल व आनेर हे दोघे मम्रेचे भाऊ होते व त्यांनी अब्रामासोबत करार केला होता.

  2. उत्पत्ती १४:१४सुमारे इ.स.पू. १९१३

    लोटाला कैद करून नेल्याचे अब्रामाला समजल्याबरोबर त्याने आपल्या कुटुंबात जन्मलेल्या तीनशेअठरा प्रशिक्षित पुरुषांना बरोबर घेतले आणि घरी परतणार्‍या विजयी सैन्याचा थेट दानपर्यंत पाठलाग केला.

  3. उत्पत्ती १४:१५सुमारे इ.स.पू. १९१३

    रात्रीच्या वेळी अब्रामाने युद्ध करण्यासाठी आपले सैन्य विभागले आणि त्याने या सैन्यावर यशस्वी हल्ला केला आणि त्याच्यापुढून पळून जाणार्‍या सैन्याचा त्याने दिमिष्काच्या उत्तरेकडे असलेल्या होबाह या शहरापर्यंत पाठलाग केला.

  4. उत्पत्ती १४:१६सुमारे इ.स.पू. १९१३

    त्याने सर्व मालमत्ता तसेच आपला पुतण्या लोट, याची मालमत्ता, स्त्रिया आणि कैद करून पळविलेले लोटचे इतर लोकही परत मिळविले.

  5. उत्पत्ती १४:१७सुमारे इ.स.पू. १९१३

    केदोरलाओमेर व त्याचे मित्र असलेल्या इतर राजांचा पराभव करून अब्राम परत चालला असताना सदोमचा राजा शावेहच्या खोर्‍यात (या खोर्‍यास पुढे राजांचे खोरे असे नाव पडले) त्याला भेटावयास आला.

  6. उत्पत्ती १४:१८सुमारे इ.स.पू. १९१३

    शालेमचा राजा मलकीसदेक जो परात्पर परमेश्वराचा याजक होता, तो अब्रामाला भाकर व द्राक्षारस घेऊन आला.

  7. उत्पत्ती १४:१९सुमारे इ.स.पू. १९१३

    आणि त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, “आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ते परात्पर परमेश्वराद्वारे अब्राम आशीर्वादित असो.

  8. उत्पत्ती १४:२०सुमारे इ.स.पू. १९१३

    ज्या सर्वसमर्थ परमेश्वराने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले ते परमेश्वर धन्यवादित असो.” मग अब्रामाने मलकीसदेकाला सर्वांचा दहावा भाग दिला.

  9. उत्पत्ती १४:२१सुमारे इ.स.पू. १९१३

    सदोमच्या राजाने अब्रामाला म्हटले, “लोक मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा.”

  10. उत्पत्ती १४:२२सुमारे इ.स.पू. १९१३

    यावर अब्रामाने सदोमाच्या राजाला उत्तर दिले, “आकाश व पृथ्वी यांना निर्माण करणारा परात्पर याहवेह परमेश्वर यांना मी हात उंच करून वचन दिले आहे,

  11. उत्पत्ती १४:२३सुमारे इ.स.पू. १९१३

    ‘मी अब्रामाला श्रीमंत बनविले आहे,’ असे तुला कधीही म्हणता येऊ नये म्हणून मी तुझ्यापासून सुतळीचा एक दोरा किंवा जोड्याचा बंदही घेणार नाही.

  12. उत्पत्ती १४:२४सुमारे इ.स.पू. १९१३

    माझ्या या तरुण माणसांनी जेवढे अन्न खाल्ले आहे तेवढ्यांचाच मी स्वीकार करेन, मात्र माझे मित्र आनेर, अष्कोल आणि मम्रे यांना त्यांचा वाटा मिळो.”

  13. उत्पत्ती १५:१सुमारे इ.स.पू. १९११

    या गोष्टीं घडल्यानंतर अब्रामाला दृष्टान्तात याहवेहकडून हा संदेश मिळाला: “अब्रामा, भिऊ नको; मीच तुझी ढाल, तुझे अत्यंत महान प्रतिफळ आहे.”

  14. उत्पत्ती १५:२सुमारे इ.स.पू. १९११

    यावर अब्राम म्हणाला, “हे सार्वभौम याहवेह, तुम्ही मला काय देऊ शकणार, मला पुत्र नसल्यामुळे माझ्या सर्व मालमत्तेचा वारस तर दिमिष्काचा एलिएजर होईल ना?”

  15. उत्पत्ती १५:३सुमारे इ.स.पू. १९११

    अब्रामाने असेही म्हटले, “तुम्ही मला पुत्र दिलेला नाही; म्हणून माझा सेवकच माझा वारस होईल.”

  16. उत्पत्ती १५:४सुमारे इ.स.पू. १९११

    तेव्हा त्याच्याकडे याहवेहचे वचन आले, “तुझ्या मालमत्तेचा वारसदार हा मनुष्य होणार नाही, परंतु तुझे मांस व तुझे रक्त असलेला तुझा पुत्र तुझा वारस होईल.”

  17. उत्पत्ती १५:५सुमारे इ.स.पू. १९११

    मग त्यांनी त्याला बाहेर आणले आणि म्हटले, “वर आकाशात पाहा आणि तुला मोजता आले तर आकाशातील तारे मोज.” नंतर ते त्याला म्हणाले, “त्याचप्रमाणे तुझी संततीही होईल.”

  18. उत्पत्ती १५:६सुमारे इ.स.पू. १९११

    अब्रामाने याहवेहवर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.

  19. उत्पत्ती १५:७सुमारे इ.स.पू. १९११

    त्यांनी त्याला सांगितले, “मी याहवेह आहे. मी ही भूमी कायमची वतन करून देण्यासाठी तुला खास्द्यांच्या ऊर या शहरातून येथे आणले आहे.”

  20. उत्पत्ती १५:८सुमारे इ.स.पू. १९११

    पण अब्रामाने विचारले, “सार्वभौम याहवेह, मला हे वतन मिळेल ते मी कसे समजू?”

  21. उत्पत्ती १५:९सुमारे इ.स.पू. १९११

    मग याहवेह त्याला म्हणाले, “तू तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका, तसेच एक होला आणि पारव्याचे एक पिल्लू घेऊन ये.”

  22. उत्पत्ती १५:१०सुमारे इ.स.पू. १९११

    अब्रामाने हे सर्व आणले आणि त्या प्राण्यांचा वध करून ते त्याने मधोमध कापले; व त्यांचे दोन्ही भाग समोरासमोर ठेवले; पण पक्षी मात्र विभागले नाही.

  23. उत्पत्ती १५:११सुमारे इ.स.पू. १९११

    त्या प्राण्यांच्या मृतशरीरांवर गिधाडांनी झडप घातली, तेव्हा अब्रामाने गिधाडांना हुसकावून लावले.

  24. उत्पत्ती १५:१२सुमारे इ.स.पू. १९११

    सूर्यास्ताच्या वेळी अब्रामाला गाढ निद्रा लागली आणि त्याच्यावर दाट आणि भयानक गडद अंधार पडला.

  25. उत्पत्ती १५:१३सुमारे इ.स.पू. १९११

    मग याहवेहने अब्रामाला म्हटले, “हे निश्चितपणे जाणून घे की, तुझे वंशज, जो देश त्यांचा स्वतःचा नाही अशा देशात परके गुलाम म्हणून राहतील व त्यांना चारशे वर्षे बंदिस्त करून अन्यायाने वागविले जाईल.