मुख्य मजकुरावर जा

circa 2100–1900 BC

Abraham: The Covenant

God calls Abram from Ur, establishes an everlasting covenant, and promises a son through whom all nations will be blessed.

394 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती १५:१४सुमारे इ.स.पू. १९११

    परंतु ज्या राष्ट्रात त्यांनी गुलाम म्हणून सेवा केली त्याला मी शिक्षा करेन. त्यानंतर तुझे वंशज त्या देशातून पुष्कळ धन घेऊन बाहेर पडतील.

  2. उत्पत्ती १५:१५सुमारे इ.स.पू. १९११

    पण तू चांगला म्हातारा होऊन मरण पावशील व शांतीने तुझ्या पूर्वजांबरोबर पुरला जाशील.

  3. उत्पत्ती १५:१६सुमारे इ.स.पू. १९११

    चार पिढ्यानंतर तुझे वंशज या भूमीत परत येतील, कारण अमोर्‍यांचा अपराध अजून पूर्ण झालेला नाही.”

  4. उत्पत्ती १५:१७सुमारे इ.स.पू. १९११

    नंतर सूर्य मावळला आणि अंधार पडला तेव्हा अब्रामाने त्या प्राण्यांच्या मृतशरीराच्या दोन ढिगांमधून धुमसते अग्निपात्र आणि पेटलेली मशाल जाताना पाहिली.

  5. उत्पत्ती १५:१८सुमारे इ.स.पू. १९११

    त्या दिवशी याहवेहने अब्रामाशी करार केला; त्यांनी म्हटले, “मी तुझ्या वंशजांना इजिप्त देशाच्या नदीपासून फरात नदीपर्यंतचा जो सर्व प्रदेश—

  6. उत्पत्ती १५:१९सुमारे इ.स.पू. १९११

    केनी, कनिज्जी, कदमोनी,

  7. उत्पत्ती १५:२०सुमारे इ.स.पू. १९११

    हिथी, परिज्जी, रेफाईम,

  8. उत्पत्ती १५:२१सुमारे इ.स.पू. १९११

    अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबूसी या लोकांचा देश देत आहे.”

  9. उत्पत्ती १६:१सुमारे इ.स.पू. १९१२

    अब्रामाला साराय आपली पत्नी हिच्यापासून मूलबाळ नव्हते. पण सारायला हागार नावाची इजिप्तची एक दासी होती;

  10. उत्पत्ती १६:२सुमारे इ.स.पू. १९१२

    सारायने अब्रामाला म्हटले, “याहवेहने मला मूलबाळ दिले नाही, म्हणून तू माझ्या दासीचा स्वीकार कर; म्हणजे तिच्यापासून माझी मुले होतील.” आणि अब्रामाने तिचा शब्द मानला.

  11. उत्पत्ती १६:३सुमारे इ.स.पू. १९११

    अब्राम कनान देशात राहून दहा वर्षे झाली होती. अब्रामाची पत्नी साराय हिने आपली इजिप्तची दासी हागार हिला अब्रामाची पत्नी होण्यासाठी त्याच्याकडे सोपविले.

  12. उत्पत्ती १६:४सुमारे इ.स.पू. १९११

    तो हागारसोबत निजला आणि ती गर्भवती झाली. जेव्हा तिला आपण गर्भवती झाल्याचे लक्षात आले, तेव्हा ती तिच्या मालकिणीचा तिरस्कार करू लागली.

  13. उत्पत्ती १६:५सुमारे इ.स.पू. १९११

    मग साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्याशी होत असलेल्या अन्यायास तुम्ही जबाबदार आहात. वास्तविक, मी तिला तुमच्या हातात दिले आणि आता जेव्हा तिला कळले की ती गर्भवती आहे, ती मला तुच्छ मानू लागली आहे. याहवेह माझ्या व तुमच्यामध्ये न्याय करो.”

  14. उत्पत्ती १६:६सुमारे इ.स.पू. १९११

    यावर अब्रामाने सारायला उत्तर दिले, “तुझ्या दासीवर तुझा पूर्ण अधिकार आहे. तुला जे योग्य वाटेल ते तिच्याशी कर.” तेव्हा सारायने हागारची छळणूक केली; आणि हागार तिच्यापासून पळून गेली.

  15. उत्पत्ती १६:७सुमारे इ.स.पू. १९११

    शूर गावाच्या वाटेवर रानातील एका झर्‍याजवळ ती याहवेहच्या एका दूताला आढळली.

  16. उत्पत्ती १६:८सुमारे इ.स.पू. १९११

    तो तिला म्हणाला, “अगे हागारे, सारायची दासी, तू कुठून आलीस आणि कुठे चाललीस?” हागारेने उत्तर दिले, “मी माझी मालकीण साराय हिच्यापासून पळून जात आहे.”

  17. उत्पत्ती १६:९सुमारे इ.स.पू. १९११

    तेव्हा याहवेहचा दूत तिला म्हणाला, “तू तुझ्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधीनतेत राहा.”

  18. उत्पत्ती १६:१०सुमारे इ.स.पू. १९११

    दूत पुढे म्हणाला, “मी तुझा वंश इतका वाढवेन की त्यांची मोजणी करता येणार नाही.”

  19. उत्पत्ती १६:११सुमारे इ.स.पू. १९११

    याहवेहच्या दूताने तिला आणखी म्हटले, “आता तू गर्भवती आहेस आणि तुला एक पुत्र होईल. तू त्याचे नाव इश्माएल असे ठेव, कारण याहवेहने तुझे दुःख ऐकले आहे.

  20. उत्पत्ती १६:१२सुमारे इ.स.पू. १९११

    तो रानगाढवासारखा एक मनुष्य होईल; त्याचा हात प्रत्येकाच्या विरुद्ध असेल व प्रत्येकाचा हात त्याच्याविरुद्ध होईल; आणि तो आपल्या सर्व भाऊबंदांमध्ये शत्रुतापूर्ण वातावरणात वस्ती करून राहील.”

  21. उत्पत्ती १६:१३सुमारे इ.स.पू. १९११

    तिच्याशी बोलणार्‍या याहवेहला तिने हे नाव दिले: “मला पाहणारे परमेश्वर तुम्हीच आहात,” कारण ती म्हणाली, “जे मला पाहात आहेत, त्यांना मी आता पाहिले आहे.”

  22. उत्पत्ती १६:१४सुमारे इ.स.पू. १९११

    म्हणूनच त्या विहिरीला बएर-लहाई-रोई असे नाव पडले. जी कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.

  23. उत्पत्ती १६:१५सुमारे इ.स.पू. १९१०

    मग अब्रामाला हागारेपासून एक पुत्र झाला आणि तिच्यापासून झालेल्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल असे ठेवले.

  24. उत्पत्ती १६:१६सुमारे इ.स.पू. १९१०

    हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला त्यावेळी अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता.

  25. उत्पत्ती १७:१सुमारे इ.स.पू. १८९७

    अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा याहवेहने त्याला दर्शन देऊन म्हटले, “मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे. माझ्यापुढे विश्वासयोग्य आणि निर्दोष राहा.