मुख्य मजकुरावर जा

circa 2100–1900 BC

Abraham: The Covenant

God calls Abram from Ur, establishes an everlasting covenant, and promises a son through whom all nations will be blessed.

394 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती १७:२७सुमारे इ.स.पू. १८९७

    अब्राहामाच्या घरातील सर्व पुरुष, त्याच्या घरात जन्मलेले व पैसे देऊन परदेशी व्यक्तीकडून खरेदी केली गुलाम यांचीही त्याच्याबरोबर सुंता झाली.

  2. उत्पत्ती १८:१सुमारे इ.स.पू. १८९७

    अब्राहाम मम्रेच्या महान एलावृक्षाजवळ राहत असताना, मध्यान्हाच्या उन्हात आपल्या तंबूच्या दारापुढे बसला होता, तेव्हा याहवेहने त्याला दर्शन दिले.

  3. उत्पत्ती १८:२सुमारे इ.स.पू. १८९७

    अब्राहामाने आपली नजर वर करून पाहिले की तीन पुरुष जवळपास उभे आहेत, तो घाईने आपल्या तंबूच्या दाराकडून त्यांना भेटण्यास गेला व त्यांना भूमीपर्यंत लवून नमन केले.

  4. उत्पत्ती १८:३सुमारे इ.स.पू. १८९७

    तो त्यांना म्हणाला, “माझ्या स्वामी, माझ्यावर आपली कृपा झाली असल्यास, माझ्या घरी न येता पुढे जाऊ नका.

  5. उत्पत्ती १८:४सुमारे इ.स.पू. १८९७

    मी थोडे पाणी आणतो आणि तुम्ही आपले पाय धुऊन या झाडाखाली विसावा घ्या.

  6. उत्पत्ती १८:५सुमारे इ.स.पू. १८९७

    तुम्हाला ताजेपणा यावा म्हणून थोडे अन्नही आणतो मग तुम्ही पुढील प्रवासास निघा; तुम्ही तुमच्या या सेवकाकडे आला आहात.” “ठीक आहे. तू म्हणतोस त्याप्रमाणे कर.” त्यांनी उत्तर दिले.

  7. उत्पत्ती १८:६सुमारे इ.स.पू. १८९७

    मग अब्राहाम धावत आपल्या तंबूत येऊन साराहला म्हणाला, “लवकर तीन सिआ सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.”

  8. उत्पत्ती १८:७सुमारे इ.स.पू. १८९७

    नंतर अब्राहाम आपल्या गुरांच्या कळपाकडे गेला, त्यातील एक कोवळे व उत्तम वासरू त्याने निवडले आणि ते लवकर बनवावे म्हणून एका नोकराकडे दिले.

  9. उत्पत्ती १८:८सुमारे इ.स.पू. १८९७

    मग त्याने दूध, दही आणि वासराचे मांस घेतले, जे त्याने बनविले होते आणि ते त्यांच्यासमोर ठेवले; आणि ते जेवत असता तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला.

  10. उत्पत्ती १८:९सुमारे इ.स.पू. १८९७

    त्यांनी विचारले, “तुझी पत्नी, साराह कुठे आहे?” अब्राहामाने उत्तर दिले, “ती तंबूत आहे.”

  11. उत्पत्ती १८:१०सुमारे इ.स.पू. १८९७

    मग त्यापैकी एकजण म्हणाला, “पुढील वर्षी मी तुझ्याकडे निश्चित वेळेत परत येईन, तेव्हा तुझी पत्नी साराहला एक पुत्र होईल.” त्याच्यामागे, तंबूच्या दारातून साराह हे ऐकत होती.

  12. उत्पत्ती १८:११सुमारे इ.स.पू. १८९७

    आता अब्राहाम व साराह दोघेही खूप वृद्ध झाली होती. साराहला मुले होण्याचा काळ केव्हाच निघून गेला होता;

  13. उत्पत्ती १८:१२सुमारे इ.स.पू. १८९७

    म्हणून साराह स्वतःशीच हसली व विचार करू लागली, “मी झिजून गेले आहे आणि माझा स्वामीही वृद्ध असताना, आता मला हा आनंद मिळेल काय?”

  14. उत्पत्ती १८:१३सुमारे इ.स.पू. १८९७

    तेवढ्यात याहवेहने अब्राहामाला विचारले, “ ‘माझ्यासारख्या वृद्धेला खरेच मूल होईल काय?’ असे म्हणत साराह का हसली?

  15. उत्पत्ती १८:१४सुमारे इ.स.पू. १८९७

    याहवेहला कोणतीही गोष्ट असाध्य आहे काय? मी सांगितल्याप्रमाणे पुढील वर्षी निश्चित वेळेत परत येईल आणि साराहला एक पुत्र होईल.”

  16. उत्पत्ती १८:१५सुमारे इ.स.पू. १८९७

    साराह घाबरली, म्हणून ती खोटे बोलत म्हणाली, “मी हसले नाही.” परंतु ते म्हणाले, “होय, तू हसलीस.”

  17. उत्पत्ती १८:१६सुमारे इ.स.पू. १८९७

    जेव्हा ते पुरुष पुढील प्रवासास जाण्यास उठले आणि त्यांनी खाली सदोमाच्या दिशेने पाहिले. अब्राहाम त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्याबरोबर थोडी वाट चालून गेला.

  18. उत्पत्ती १८:१७सुमारे इ.स.पू. १८९७

    मग याहवेह म्हणाले, “अब्राहामापासून मी माझा संकल्प गुप्त ठेवावा काय?

  19. उत्पत्ती १८:१८सुमारे इ.स.पू. १८९७

    कारण खात्रीने अब्राहाम एक महान व बलाढ्य राष्ट्र होईल आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.

  20. उत्पत्ती १८:१९सुमारे इ.स.पू. १८९७

    कारण मी त्याला निवडले आहे अशासाठी की त्याने त्याच्यानंतर त्याच्या लेकरांना व त्याच्या घराण्याला याहवेहच्या मार्गात जे योग्य व न्यायी आहे, त्यात चालवावे, त्यामुळे अब्राहामाला दिलेले अभिवचन याहवेह पूर्ण करतील.”

  21. उत्पत्ती १८:२०सुमारे इ.स.पू. १८९७

    मग याहवेहने म्हटले, “सदोम आणि गमोरा विरुद्ध आक्रोश खूप वाढला आहे आणि त्यांचे पाप गंभीर आहे.

  22. उत्पत्ती १८:२१सुमारे इ.स.पू. १८९७

    मी खाली जाऊन बघेन, मग त्यांनी जे केले आहे ते माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आक्रोशाएवढे वाईट आहे की नाही हे मला समजेल.”

  23. उत्पत्ती १८:२२सुमारे इ.स.पू. १८९७

    त्याच्याबरोबर असलेले पुरुष सदोमाच्या दिशेने गेले, पण अब्राहाम याहवेहपुढे उभा राहिला.

  24. उत्पत्ती १८:२३सुमारे इ.स.पू. १८९७

    अब्राहाम त्यांच्याजवळ गेला आणि विचारले: “तुम्ही दुष्टांबरोबर नीतिमानांचा सुद्धा नाश करणार काय?

  25. उत्पत्ती १८:२४सुमारे इ.स.पू. १८९७

    जर त्या शहरात पन्नास नीतिमान लोक आढळले तरी त्यांचा तुम्ही नाश करणार आणि त्यात असलेल्या नीतिमान लोकांसाठी तुम्ही त्यांची गय करणार नाही काय?