- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 2100–1900 BC
Abraham: The Covenant
God calls Abram from Ur, establishes an everlasting covenant, and promises a son through whom all nations will be blessed.
या कालखंडातील वचने
- उत्पत्ती २५:१६सुमारे इ.स.पू. १८२१
हे इश्माएलाचे पुत्र होते आणि त्यांच्या गावांवरून आणि छावण्यांनुसार हे बारा वंशाचे प्रधान झाले.
- उत्पत्ती २५:१७सुमारे इ.स.पू. १७७३
इश्माएल एकशे सदतीस वर्षे जगला. त्याने आपला शेवटचा श्वास घेतला आणि मरण पावला आणि तो आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला.
- उत्पत्ती २५:१८सुमारे इ.स.पू. १७७३
त्याचे वंशज हवीलापासून शूर देशापर्यंत वस्ती करून राहिले. हा देश इजिप्त देशाच्या सीमेवर अश्शूरच्या बाजूला आहे. ते एकमेकांशी वैराभावाने राहत होते.
- उत्पत्ती २५:१९सुमारे इ.स.पू. १८९६
अब्राहामाचा मुलगा इसहाक याची वंशावळ अशी आहे: अब्राहाम हा इसहाकाचा पिता झाला,
- उत्पत्ती २५:२०सुमारे इ.स.पू. १८५६
जेव्हा इसहाकाने रिबेकाहशी विवाह केला तेव्हा तो चाळीस वर्षांचा होता. रिबेकाह पद्दन-अराम येथील अरामी बेथुएलाची कन्या आणि लाबानाची बहीण होती.
- उत्पत्ती २५:२१सुमारे इ.स.पू. १८३७
इसहाकाने याहवेहची प्रार्थना करून रिबेकाहला मूल देण्याची विनंती केली, कारण तिला मूल नव्हते. याहवेहने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची पत्नी रिबेकाह गर्भवती झाली.
- उत्पत्ती २५:२२सुमारे इ.स.पू. १८३६
तिच्या उदरात मुले एकमेकांशी भांडू लागली. तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?” आणि याबाबत तिने याहवेहकडे विचारणा केली.
- उत्पत्ती २५:२३सुमारे इ.स.पू. १८३६
याहवेहने तिला सांगितले, “तुझ्या उदरात दोन राष्ट्रे आहेत, तुझ्या उदरातील हे दोन वंश वेगळे होतील; एकजण दुसर्यापेक्षा बलवान होईल, मोठा लहान्याची सेवा करेल.”
- उत्पत्ती २५:२४सुमारे इ.स.पू. १८३६
तिचे दिवस भरून प्रसूतिसमय आला तेव्हा पाहा, तिला जुळे पुत्र झाले.
- उत्पत्ती २५:२५सुमारे इ.स.पू. १८३६
पहिल्यांदा जन्मलेला तांबूस रंगाच्या केसांनी इतका व्यापलेला होता की, त्याने केसांचा झगाच घातला आहे असे वाटत होते; म्हणून त्यांनी त्याचे नाव एसाव असे ठेवले.
- उत्पत्ती २५:२६सुमारे इ.स.पू. १८३६
मग जुळ्यातील दुसरा पुत्र जन्मला. त्याचा हात एसावाच्या टाचेवर होता म्हणून त्यांनी त्याचे नाव याकोब असे ठेवले. जेव्हा रिबेकाहने यांना जन्म दिला, तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता.
- उत्पत्ती २५:२७सुमारे इ.स.पू. १८३६
हळूहळू ती मुले वाढली. एसाव एक तरबेज शिकारी झाला, खुल्या मैदानातील फिरणारा मनुष्य होता, पण याकोब तसा शांत स्वभावाचा असून त्याला तंबूतच राहण्यास आवडे.
- उत्पत्ती २५:२८सुमारे इ.स.पू. १८३६
इसहाकास वन्यप्राण्यांचे मांस खाण्याची आवड होती, एसाव त्याचा आवडता होता, तर याकोब रिबेकाहचा आवडता होता.
- उत्पत्ती २५:२९सुमारे इ.स.पू. १८०५
एकदा याकोब वरण शिजवित असताना एसाव शिकारीहून खूप थकूनभागून आला.
- उत्पत्ती २५:३०सुमारे इ.स.पू. १८०५
तो याकोबाला म्हणाला, “लवकर, मला तो तांबडा पदार्थ घेऊ दे! मला भयंकर भूक लागली आहे!” (म्हणूनच त्याला एदोम असेही म्हणतात.)
- उत्पत्ती २५:३१सुमारे इ.स.पू. १८०५
याकोबाने उत्तर दिले, “प्रथम तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे.”
- उत्पत्ती २५:३२सुमारे इ.स.पू. १८०५
एसाव म्हणाला, “एखादा मनुष्य भुकेने मरत असताना त्याला त्याच्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग?”
- उत्पत्ती २५:३३सुमारे इ.स.पू. १८०५
परंतु याकोब म्हणाला, “आधी शपथ घे.” म्हणून त्याने शपथ घेतली आणि आपला ज्येष्ठ पुत्रत्वाचा हक्क याकोबाला मोबदला म्हणून दिला.
- उत्पत्ती २५:३४सुमारे इ.स.पू. १८०५
तेव्हा याकोबाने एसावाला भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले; एसावाने ते खाल्ले आणि निघून गेला. अशा रीतीने एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ मानला.