मुख्य मजकुरावर जा

circa 2100–1900 BC

Abraham: The Covenant

God calls Abram from Ur, establishes an everlasting covenant, and promises a son through whom all nations will be blessed.

394 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती २४:५८सुमारे इ.स.पू. १८५७

    त्याप्रमाणे त्यांनी रिबेकाहला बोलावून विचारले, “तू या मनुष्यासोबत जाशील का?” तिने उत्तर दिले, “होय, मी जाईन.”

  2. उत्पत्ती २४:५९सुमारे इ.स.पू. १८५७

    तेव्हा त्यांनी तिला निरोप दिला. म्हणून त्यांनी आपली बहीण रिबेकाह हिला, तिची दाई, अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्यासह तिची रवानगी केली.

  3. उत्पत्ती २४:६०सुमारे इ.स.पू. १८५७

    एकमेकांपासून दूर होण्यापूर्वी त्यांनी रिबेकाहला आशीर्वाद दिला: “आमच्या भगिनी, तू लक्षावधींची माता हो; तुझी संतती त्यांच्या शत्रूंच्या शहरांचा ताबा घेवोत.”

  4. उत्पत्ती २४:६१सुमारे इ.स.पू. १८५७

    नंतर रिबेकाह व तिच्या दासी तयार होऊन उंटावर आरूढ झाल्या आणि त्या मनुष्याबरोबर गेल्या, त्या सेवकाने रिबेकाहला घेतले आणि निघाला.

  5. उत्पत्ती २४:६२सुमारे इ.स.पू. १८५७

    दरम्यानच्या काळात इसहाक नेगेव-दक्षिण-प्रांतातील आपल्या घरून बएर-लहाई-रोई येथे आला होता.

  6. उत्पत्ती २४:६३सुमारे इ.स.पू. १८५७

    एके दिवशी संध्याकाळी तो मनन करीत शेतातून फिरावयास निघाला असताना, त्याने नजर वर करून पाहिले, तो त्याला काही उंट येताना दिसले.

  7. उत्पत्ती २४:६४सुमारे इ.स.पू. १८५७

    रिबेकाहने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले, तेव्हा ती उंटावरून खाली उतरली

  8. उत्पत्ती २४:६५सुमारे इ.स.पू. १८५७

    आणि सेवकाला विचारले, “शेतातून आपल्याला भेटावयास येत असलेला तो पुरुष कोण आहे?” “ते माझे स्वामी आहेत.” सेवकाने उत्तर दिले. तेव्हा तिने आपले मुख बुरख्याने झाकून घेतले.

  9. उत्पत्ती २४:६६सुमारे इ.स.पू. १८५७

    आपण काय काय केले याचा सर्व वृतांत सेवकाने इसहाकाला सांगितला.

  10. उत्पत्ती २४:६७सुमारे इ.स.पू. १८५७

    मग इसहाकाने रिबेकाहला आपली आई साराहच्या तंबूमध्ये आणले. त्याने रिबेकाहशी विवाह केला आणि ती त्याची पत्नी झाली. त्याचे तिच्यावर प्रेम बसले; आणि आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्यामुळे त्याला सांत्वन मिळाले.

  11. उत्पत्ती २५:१सुमारे इ.स.पू. १८५३

    अब्राहामाने दुसरी पत्नी केली होती, तिचे नाव केटूराह होते.

  12. उत्पत्ती २५:२सुमारे इ.स.पू. १८५२

    तिच्यापासून त्याला जिम्रान, योक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूआह पुत्र झाले.

  13. उत्पत्ती २५:३सुमारे इ.स.पू. १८२४

    योक्षान हा शबा आणि ददान यांचा पिता; अश्शूरी, लटूशी आणि लऊमी हे ददानाचे गोत्र होते.

  14. उत्पत्ती २५:४सुमारे इ.स.पू. १८०४

    एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व केटूराहचे वंशज होते.

  15. उत्पत्ती २५:५सुमारे इ.स.पू. १८२९

    अब्राहामाने आपली सर्व मालमत्ता इसहाकाच्या नावावर केली.

  16. उत्पत्ती २५:६सुमारे इ.स.पू. १८२९

    परंतु अब्राहाम जिवंत असताना त्याने आपल्या दासीपुत्रांनाही देणग्या दिल्या आणि त्याने त्यांना इसहाकापासून दूर, पूर्वेकडे पाठवून दिले.

  17. उत्पत्ती २५:७सुमारे इ.स.पू. १८२१

    अब्राहाम एकशे पंचाहत्तर वर्षे जगला.

  18. उत्पत्ती २५:८सुमारे इ.स.पू. १८२१

    मग अब्राहामाने अखेरचा श्वास घेतला आणि एका वृद्धावस्थेत, परिपूर्ण वयाचा होऊन मरण पावला; आणि मग तो त्याच्या लोकांना जाऊन मिळाला.

  19. उत्पत्ती २५:९सुमारे इ.स.पू. १८२१

    त्याची मुले इसहाक आणि इश्माएल यांनी त्याला मम्रेजवळील मकपेलाच्या गुहेत, जोहर हिथीचा मुलगा एफ्रोनच्या शेतात पुरले,

  20. उत्पत्ती २५:१०सुमारे इ.स.पू. १८२१

    हे अब्राहामाने हेथच्या लोकांकडून विकत घेतलेले शेत. तिथे अब्राहामाला त्याची पत्नी साराहजवळ मूठमाती देण्यात आली.

  21. उत्पत्ती २५:११सुमारे इ.स.पू. १८२१

    अब्राहामाच्या मृत्यूनंतर परमेश्वराने इसहाकाला आशीर्वाद दिला, जो नंतर बएर-लहाई-रोई या ठिकाणी राहवयास गेला.

  22. उत्पत्ती २५:१२सुमारे इ.स.पू. १८२१

    ही अब्राहामाचा पुत्र इश्माएलची वंशावळ आहे, जो साराहची इजिप्तमधील दासी हागारेपासून जन्मला.

  23. उत्पत्ती २५:१३सुमारे इ.स.पू. १८२१

    ही इश्माएलाच्या पुत्रांची त्यांच्या जन्मानुसार यादी: इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, नंतर केदार, अदबील, मिबसाम,

  24. उत्पत्ती २५:१४सुमारे इ.स.पू. १८२१

    मिश्मा, दूमाह, मस्सा,

  25. उत्पत्ती २५:१५सुमारे इ.स.पू. १८२१

    हदद, तेमा, यतूर, नापीश आणि केदमाह.