- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 2100–1900 BC
Abraham: The Covenant
God calls Abram from Ur, establishes an everlasting covenant, and promises a son through whom all nations will be blessed.
या कालखंडातील वचने
- उत्पत्ती २४:८सुमारे इ.स.पू. १८५७
पण स्त्री येथे येण्यास तयार झाली नाही, तर तू आपल्या वचनातून मुक्त होशील. फक्त माझ्या मुलाला तिकडे नेऊ नकोस.”
- उत्पत्ती २४:९सुमारे इ.स.पू. १८५७
तेव्हा सेवकाने त्याचा धनी अब्राहामाच्या मांडीखाली हात ठेऊन ही बाब शपथपूर्वक मान्य केली.
- उत्पत्ती २४:१०सुमारे इ.स.पू. १८५७
मग त्या सेवकाने अब्राहामाचे दहा उंट घेऊन, आपल्या धन्याच्या मालमत्तेतील उत्तमोत्तम वस्तू निवडून त्या सर्व उंटांवर लादल्या. मग तो प्रवास करीत अराम-नहराईम मधील नाहोराच्या नगरास गेला.
- उत्पत्ती २४:११सुमारे इ.स.पू. १८५७
तिथे नगराच्या बाहेर त्याने विहिरीजवळ उंटांना बसविले; ती संध्याकाळची वेळ होती. स्त्रिया विहिरीतून पाणी नेण्यासाठी तिथे येत होत्या.
- उत्पत्ती २४:१२सुमारे इ.स.पू. १८५७
त्यावेळी त्या सेवकाने प्रार्थना केली, “हे याहवेह, माझ्या धन्याच्या परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम याच्यावर दया करा आणि ज्या उद्देशाने मी हा प्रवास केला तो सफल करा.
- उत्पत्ती २४:१३सुमारे इ.स.पू. १८५७
पाहा, मी येथे विहिरीजवळ उभा आहे व पाणी नेण्याकरिता नगरातील कन्या येत आहेत.
- उत्पत्ती २४:१४सुमारे इ.स.पू. १८५७
माझी तुम्हाला अशी विनंती आहे की, त्या तरुणींपैकी एकीला ‘तुझी पाण्याची घागर वाकवून मला प्यायला पाणी दे’ असा ज्यावेळी मी म्हणेन त्यावेळी, ‘होय निश्चितच, मी तुझ्या उंटांनाही पाणी पाजते’ असे जी म्हणेल तीच इसहाकासाठी तुम्ही निवडलेली वधू आहे, यावरून मला समजेल की तुम्ही माझ्या धन्याला कृपा दाखविली आहे.”
- उत्पत्ती २४:१५सुमारे इ.स.पू. १८५७
त्याची प्रार्थना समाप्त होण्यापूर्वी रिबेकाह खांद्यावर घागर घेऊन तिथे आली. ती नाहोर आणि मिल्का यांचा पुत्र बेथुएल याची कन्या होती. नाहोर हा अब्राहामाचा भाऊ होता.
- उत्पत्ती २४:१६सुमारे इ.स.पू. १८५७
ती अतिशय देखणी असून कुमारिका होती; आतापर्यंत कोणत्याही पुरुषाने तिला स्पर्श केला नव्हता. तिने खाली जाऊन विहिरीच्या पाण्याने घागर भरली आणि ती वर आली.
- उत्पत्ती २४:१७सुमारे इ.स.पू. १८५७
अब्राहामाचा सेवक तिच्याकडे धावत गेला आणि तो तिला म्हणाला, “कृपया मला तुझ्या घागरीतील थोडे पाणी दे.”
- उत्पत्ती २४:१८सुमारे इ.स.पू. १८५७
“प्या, माझ्या स्वामी,” असे म्हणून तिने लगेच आपली घागर वाकवून त्याला प्यायला पाणी दिले.
- उत्पत्ती २४:१९सुमारे इ.स.पू. १८५७
त्यास पुरेसे पाणी पाजल्यानंतर ती त्याला म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठीही त्यांना पुरेल इतके पाणी काढते.”
- उत्पत्ती २४:२०सुमारे इ.स.पू. १८५७
तिने आपल्या घागरीतील पाणी कुंडात ओतले आणि ती पुन्हा पाणी काढण्याकरिता विहिरीकडे धावत गेली आणि त्याच्या सर्व उंटांना पुरेल इतके पाणी तिने काढले.
- उत्पत्ती २४:२१सुमारे इ.स.पू. १८५७
ती पाणी काढीत असताना, तो सेवक एक शब्दही न बोलता, तिचे बारकाईने निरीक्षण करीत होता की याहवेहने त्याचा प्रवास सफल केला की नाही.
- उत्पत्ती २४:२२सुमारे इ.स.पू. १८५७
शेवटी उंटांचे पाणी पिणे संपल्यावर, त्याने तिला एक बेका वजनाची सोन्याची नथ आणि दहा शेकेल वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या दिल्या.
- उत्पत्ती २४:२३सुमारे इ.स.पू. १८५७
नंतर त्याने तिला विचारले, “तू कोणाची कन्या आहेस? कृपया मला सांग की रात्री मुक्काम करण्यासाठी आम्हाला तुझ्या वडिलांच्या घरी जागा मिळू शकेल काय?”
- उत्पत्ती २४:२४सुमारे इ.स.पू. १८५७
तिने उत्तर दिले, “मी नाहोर व मिल्का, यांचा पुत्र बेथुएल यांची कन्या आहे.”
- उत्पत्ती २४:२५सुमारे इ.स.पू. १८५७
आणि ती पुढे हे म्हणाली, “आमच्या घरी रात्री मुक्काम करण्यासाठी खोली आणि उंटांसाठीही भरपूर गवत व चारा आहे.”
- उत्पत्ती २४:२६सुमारे इ.स.पू. १८५७
तेव्हा त्या मनुष्याने आपले डोके लवविले आणि याहवेहची आराधना केली.
- उत्पत्ती २४:२७सुमारे इ.स.पू. १८५७
तो म्हणाला, “माझा धनी अब्राहामाचे परमेश्वर याहवेहची स्तुती असो, माझ्या धन्याबरोबर तुम्ही इतक्या प्रेमाने आणि विश्वासूपणाने वागता म्हणून मी तुमचे आभार मानतो. माझ्या धन्याच्या नातेवाईकांच्या कुटुंबात तुम्ही मला सरळ घेऊन आला म्हणूनही मी तुमचे आभार मानतो.”
- उत्पत्ती २४:२८सुमारे इ.स.पू. १८५७
तेव्हा ती मुलगी आपल्या आईच्या कुटुंबातील लोकांना ही बातमी सांगण्यासाठी धावतच घरी गेली.
- उत्पत्ती २४:२९सुमारे इ.स.पू. १८५७
रिबेकाहला एक भाऊ होता, त्याचे नाव लाबान होते. तो धावतच त्या मनुष्याला भेटण्यासाठी विहिरीकडे गेला;
- उत्पत्ती २४:३०सुमारे इ.स.पू. १८५७
त्याने तिची नथ व तिच्या हातातील बांगड्या पाहिल्या आणि रिबेकाहच्या तोंडची हकिकत ऐकली, तेव्हा तो विहिरीकडे गेला आणि पाहिले की तो मनुष्य अद्यापही आपल्या उंटांपाशी विहिरीजवळच उभा आहे.
- उत्पत्ती २४:३१सुमारे इ.स.पू. १८५७
त्याने म्हटले, “या, तुम्ही जे याहवेहद्वारे आशीर्वादित आहात, बाहेर का उभे आहात? तुम्हाला राहण्यास खोली आणि उंटांकरिता मी जागा तयार केली आहे.”
- उत्पत्ती २४:३२सुमारे इ.स.पू. १८५७
मग तो मनुष्य त्यांच्या घरी गेला. उंटांवरून सामान उतरून त्यांना गवत आणि खाण्याकरिता चाराही देण्यात आला. त्यास व त्याच्या बरोबरीच्या लोकांस पाय धुण्याकरिता त्याने पाणीही दिले.