मुख्य मजकुरावर जा

Rebekah

29 वचने · 5 कुटुंब सदस्य

Rebekah चा उल्लेख असलेली वचने

  1. बेथुएल रिबेकाहचा पिता झाला.

  2. त्याची प्रार्थना समाप्त होण्यापूर्वी रिबेकाह खांद्यावर घागर घेऊन तिथे आली. ती नाहोर आणि मिल्का यांचा पुत्र बेथुएल याची कन्या होती. नाहोर हा अब्राहामाचा भाऊ होता.

  3. रिबेकाहला एक भाऊ होता, त्याचे नाव लाबान होते. तो धावतच त्या मनुष्याला भेटण्यासाठी विहिरीकडे गेला;

  4. त्याने तिची नथ व तिच्या हातातील बांगड्या पाहिल्या आणि रिबेकाहच्या तोंडची हकिकत ऐकली, तेव्हा तो विहिरीकडे गेला आणि पाहिले की तो मनुष्य अद्यापही आपल्या उंटांपाशी विहिरीजवळच उभा आहे.

  5. “माझ्या मनातल्या मनात माझे हे बोलणे संपले नाही तोच रिबेकाह आपल्या खांद्यावर घागर घेऊन पाणी भरण्यास आली आणि तिने विहिरीत उतरून पाणी भरले. मग मी तिला म्हणालो, ‘मला थोडे पाणी प्यावयाला दे.’

  6. ही रिबेकाह तुमच्यापुढे आहे, तिला घेऊन जा. याहवेह परमेश्वराने मार्गदर्शन केल्याप्रमाणे तिला तुमच्या धन्याच्या पुत्राची पत्नी होऊ द्या.”

  7. मग त्या सेवकाने रिबेकाहला सोने आणि चांदीचे दागिने आणि कपडे दिले; तसेच त्याने तिच्या आईसाठी आणि भावासाठीही पुष्कळ मौल्यवान वस्तू दिल्या.

  8. त्याप्रमाणे त्यांनी रिबेकाहला बोलावून विचारले, “तू या मनुष्यासोबत जाशील का?” तिने उत्तर दिले, “होय, मी जाईन.”

  9. तेव्हा त्यांनी तिला निरोप दिला. म्हणून त्यांनी आपली बहीण रिबेकाह हिला, तिची दाई, अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्यासह तिची रवानगी केली.

  10. एकमेकांपासून दूर होण्यापूर्वी त्यांनी रिबेकाहला आशीर्वाद दिला: “आमच्या भगिनी, तू लक्षावधींची माता हो; तुझी संतती त्यांच्या शत्रूंच्या शहरांचा ताबा घेवोत.”

  11. नंतर रिबेकाह व तिच्या दासी तयार होऊन उंटावर आरूढ झाल्या आणि त्या मनुष्याबरोबर गेल्या, त्या सेवकाने रिबेकाहला घेतले आणि निघाला.

  12. रिबेकाहने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले, तेव्हा ती उंटावरून खाली उतरली

  13. मग इसहाकाने रिबेकाहला आपली आई साराहच्या तंबूमध्ये आणले. त्याने रिबेकाहशी विवाह केला आणि ती त्याची पत्नी झाली. त्याचे तिच्यावर प्रेम बसले; आणि आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्यामुळे त्याला सांत्वन मिळाले.

  14. जेव्हा इसहाकाने रिबेकाहशी विवाह केला तेव्हा तो चाळीस वर्षांचा होता. रिबेकाह पद्दन-अराम येथील अरामी बेथुएलाची कन्या आणि लाबानाची बहीण होती.

  15. इसहाकाने याहवेहची प्रार्थना करून रिबेकाहला मूल देण्याची विनंती केली, कारण तिला मूल नव्हते. याहवेहने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची पत्नी रिबेकाह गर्भवती झाली.

  16. इसहाकास वन्यप्राण्यांचे मांस खाण्याची आवड होती, एसाव त्याचा आवडता होता, तर याकोब रिबेकाहचा आवडता होता.

  17. जेव्हा तेथील लोकांनी त्याला त्याच्या पत्नीबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” कारण “ती माझी पत्नी आहे” असे सांगण्याची त्याला भीती वाटली; त्याने विचार केला, “या ठिकाणचे लोक रिबेकाहमुळे कदाचित मला मारून टाकतील, कारण ती फार सुंदर आहे.”

  18. तो तिथे बराच काळ राहिल्यानंतर एके दिवशी पलिष्ट्यांचा राजा अबीमेलेख याने खिडकीतून बाहेर पाहिले की तो इसहाक आपली पत्नी रिबेकाह हिच्याशी प्रेम करीत आहे.

  19. त्या इसहाक आणि रिबेकाहसाठी दुःखाचे स्रोत होत्या.

  20. इसहाक आपला पुत्र एसावसोबत बोलत आहे हे रिबेकाह ऐकत होती. एसाव रानात शिकार करून मांस आणण्यास गेला,

  21. रिबेकाहने आपला पुत्र याकोब याला बोलाविले आणि ती त्याला म्हणाली “हे बघ, तुझे वडील तुझा भाऊ एसावाला म्हणाले,

  22. याकोब त्याची आई रिबेकाहला म्हणाला, “पण माझा भाऊ एसाव तर केसाळ आहे आणि माझी कातडी अगदी केसरहित आहे.

  23. मग रिबेकाहने घरात असलेले एसावाचे उत्तम कपडे घेतले आणि आपला धाकटा मुलगा याकोबाला ते घालण्यास सांगितले.

  24. परंतु एसावाचा बेत कोणीतरी रिबेकाहच्या कानावर घातला. रिबेकाहने याकोबाला बोलाविले आणि त्याला सांगितले, “एसावाने तुझा जीव घेऊन, सूड घेण्याची धमकी दिली आहे.

  25. नंतर रिबेकाह इसहाकास म्हणाली, “या हेथी मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे. याकोबानेही त्यांच्यापैकीच एकीशी लग्न केले तर माझ्या जगण्याचा काही उपयोग नसेल.”