- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 2100–1900 BC
Abraham: The Covenant
God calls Abram from Ur, establishes an everlasting covenant, and promises a son through whom all nations will be blessed.
या कालखंडातील वचने
- उत्पत्ती २३:३सुमारे इ.स.पू. १८६०
आणि साराहच्या मृतदेहाजवळ उभे राहून अब्राहाम हेथीच्या लोकांना म्हणाला,
- उत्पत्ती २३:४सुमारे इ.स.पू. १८६०
“या देशात मी एक परकीय व अनोळखी आहे. कृपया मला माझ्या मृतास पुरण्याकरिता जमिनीचा एक भाग विकत द्या.”
- उत्पत्ती २३:५सुमारे इ.स.पू. १८६०
हेथी लोकांनी अब्राहामाला उत्तर दिले,
- उत्पत्ती २३:६सुमारे इ.स.पू. १८६०
“महाराज, आमचे ऐका. आमच्यामध्ये आपण एक पराक्रमी राजपुत्र आहात. तुम्ही आपल्या मृतांसाठी स्वतःच कबर निवडून त्यांना मूठमाती द्या. आपली खाजगी कबर तुम्हाला देण्यास आमच्यातील कोणीही नकार देणार नाही.”
- उत्पत्ती २३:७सुमारे इ.स.पू. १८६०
हे ऐकून अब्राहामाने त्या हेथी लोकांसमोर लवून मुजरा केला आणि तो म्हणाला,
- उत्पत्ती २३:८सुमारे इ.स.पू. १८६०
“मी आपल्या मयतास पुरावे अशी तुमची इच्छा असेल तर माझे ऐका, जोहराचा पुत्र एफ्रोन,
- उत्पत्ती २३:९सुमारे इ.स.पू. १८६०
याला त्याच्या शेताच्या टोकाला असलेली मकपेला नावाची गुहा मला विकत देण्यास माझ्यावतीने विनंती करा. तिची पूर्ण किंमत मी देईन आणि ती माझ्या कुटुंबीयांसाठी स्मशानभूमी होईल.”
- उत्पत्ती २३:१०सुमारे इ.स.पू. १८६०
एफ्रोन हेथी हा हेथी लोकांसह बसलेला होता, त्या नगरचौकात असलेल्या सर्व हेथी लोकांसमक्ष तो अब्राहामाला म्हणाला,
- उत्पत्ती २३:११सुमारे इ.स.पू. १८६०
“नाही, महाराज, माझे ऐका; ती गुहा आणि ते शेत मी तुम्हाला देईन, माझ्या लोकांच्या देखत मी तुम्हाला ती देत आहे. तिथे तुम्ही तुमच्या मृतास मूठमाती द्या.”
- उत्पत्ती २३:१२सुमारे इ.स.पू. १८६०
अब्राहामाने त्या देशातील लोकांना पुन्हा लवून मुजरा केला
- उत्पत्ती २३:१३सुमारे इ.स.पू. १८६०
आणि त्या देशाच्या लोकांसमक्ष तो एफ्रोनास म्हणाला, “माझे ऐका, मला ती जागा तुझ्याकडून विकत घेऊ दे; त्या शेताची सर्व किंमत मी तुला देईन. मग मी माझ्या मृताला तिथे मूठमाती देईन.”
- उत्पत्ती २३:१४सुमारे इ.स.पू. १८६०
हे ऐकून एफ्रोन अब्राहामाला म्हणाला,
- उत्पत्ती २३:१५सुमारे इ.स.पू. १८६०
“महाराज, त्या जागेची किंमत केवळ चांदीची चारशे शेकेल आहे; पण तुमच्या आणि माझ्यामध्ये त्याचे काय? तिथे आपल्या मृताला मूठमाती द्या.”
- उत्पत्ती २३:१६सुमारे इ.स.पू. १८६०
तेव्हा अब्राहामाने कबूल केल्याप्रमाणे एफ्रोनाने हेथी लोकांच्या समक्ष सांगितलेली किंमत, म्हणजे चारशे शेकेल चांदी, त्या काळातील व्यापार्यांच्या परिमाणानुसार अब्राहामाने त्याला दिली.
- उत्पत्ती २३:१७सुमारे इ.स.पू. १८६०
अशाप्रकारे मम्रेजवळील मकपेला येथे असलेले एफ्रोनाचे शेत आणि शेताच्या शेवटच्या टोकाला असलेली गुहा आणि त्याच्या चतुःसीमातील प्रत्येक झाड अब्राहामाने विकत घेण्याचा करार केला.
- उत्पत्ती २३:१८सुमारे इ.स.पू. १८६०
हा करार शहराच्या वेशीसमोर सर्व हेथी लोकांच्या समक्ष झाला, ते सर्व अब्राहामाच्या कायमच्या मालकीचे झाले.
- उत्पत्ती २३:१९सुमारे इ.स.पू. १८६०
त्यानंतर अब्राहामाने आपली पत्नी साराह हिला कनान देशात मम्रे (म्हणजे हेब्रोन) जवळ असलेल्या मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरले.
- उत्पत्ती २३:२०सुमारे इ.स.पू. १८६०
याप्रमाणे, हेथी लोकांनी स्मशानभूमी म्हणून शेत व त्यातील गुहा अब्राहामाच्या मालकीची झाल्याचा करार केला.
- उत्पत्ती २४:१सुमारे इ.स.पू. १८५७
अब्राहाम आता खूप वृद्ध झाला होता. याहवेहने त्याला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते.
- उत्पत्ती २४:२सुमारे इ.स.पू. १८५७
अब्राहाम आपल्या घरादाराचा कारभार पाहणार्या सर्वात जुन्या सेवकाला म्हणाला, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव.
- उत्पत्ती २४:३सुमारे इ.स.पू. १८५७
स्वर्ग व पृथ्वीचे परमेश्वर याहवेह यांच्या नावाने मला वचन दे की, माझ्या मुलाचा मी राहत असलेल्या स्थानिक कनानी मुलीबरोबर विवाह करून देणार नाहीस,
- उत्पत्ती २४:४सुमारे इ.स.पू. १८५७
याऐवजी तू माझ्या मायदेशात माझ्या नातेवाईकांकडे जाशील आणि माझा पुत्र इसहाकासाठी एक वधू शोधून आणशील.”
- उत्पत्ती २४:५सुमारे इ.स.पू. १८५७
सेवकाने अब्राहामाला विचारले, “पण समजा, आपले घर सोडून इतक्या दूर येण्यास ती स्त्री तयार नसेल तर मी इसहाकाला जो देश तुम्ही सोडून आला त्या देशात घेऊन जावे काय?”
- उत्पत्ती २४:६सुमारे इ.स.पू. १८५७
“माझ्या मुलाला तिकडे कधीही नेऊ नको,” अब्राहाम त्याला म्हणाला.
- उत्पत्ती २४:७सुमारे इ.स.पू. १८५७
“कारण याहवेह जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी माझ्या पित्याच्या घरातून व माझ्या जन्मभूमीतून काढून मला आणि माझ्या मुलाबाळांना हा देश देण्याचे वचन दिले आहे, तेच परमेश्वर तुझ्यापुढे आपला दूत पाठवतील आणि माझ्या मुलासाठी योग्य वधू तुला मिळेल.