- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 2100–1900 BC
Abraham: The Covenant
God calls Abram from Ur, establishes an everlasting covenant, and promises a son through whom all nations will be blessed.
या कालखंडातील वचने
- उत्पत्ती २१:११सुमारे इ.स.पू. १८९३
ही बाब अब्राहामाला खूप त्रास देत होती कारण ती त्याच्या मुलाची होती.
- उत्पत्ती २१:१२सुमारे इ.स.पू. १८९३
तरी परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, “तुझी स्त्री गुलाम आणि तिचा पुत्र यांच्यामुळे तू मनस्ताप करून घेऊ नकोस. साराहच्या म्हणण्याप्रमाणे कर, कारण इसहाकाद्वारेच तुझी संतती वाढेल.
- उत्पत्ती २१:१३सुमारे इ.स.पू. १८९३
त्या दासीपुत्रापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करेन, कारण तोही तुझा पुत्र आहे.”
- उत्पत्ती २१:१४सुमारे इ.स.पू. १८९२
दुसर्या दिवशी अब्राहाम सकाळीच उठला, त्याने प्रवासासाठी भोजन आणि पाण्याची कातडी पिशवी हागारेला दिली. ती तिच्या खांद्यावर अडकवून मुलासह तिची रवानगी केली. ती तिथून निघाली व बेअर-शेबाच्या अरण्यात भटकू लागली.
- उत्पत्ती २१:१५सुमारे इ.स.पू. १८९२
जवळचे पाणी संपल्यावर तिने आपल्या पुत्राला एका झुडूपाखाली ठेवले,
- उत्पत्ती २१:१६सुमारे इ.स.पू. १८९२
आणि ती त्याच्यापासून सुमारे बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन बसली, “माझ्या बाळाचा मृत्यू मला पाहावयाला नको आहे,” असे म्हणून ती हुंदके देऊन रडू लागली.
- उत्पत्ती २१:१७सुमारे इ.स.पू. १८९२
मग परमेश्वराने त्या मुलाच्या रडणे ऐकले आणि परमेश्वराचा दूत आकाशातून हागारेला हाक मारून म्हणाला, “हागारे, तुला काय झाले आहे? भिऊ नकोस; कारण परमेश्वराने मुलाचे रडणे ऐकले आहे.
- उत्पत्ती २१:१८सुमारे इ.स.पू. १८९२
ऊठ, त्याला उचलून घे, कारण मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करेन.”
- उत्पत्ती २१:१९सुमारे इ.स.पू. १८९२
मग परमेश्वराने तिचे डोळे उघडले आणि तिला एक पाण्याची विहीर दिसली. तेव्हा तिने आपली पाण्याची मसक भरून घेतली आणि त्या मुलाला पाणी पाजले.
- उत्पत्ती २१:२०सुमारे इ.स.पू. १८९२
परमेश्वर त्या मुलासोबत होते. तो पारानच्या रानात लहानाचा मोठा होऊन एक तरबेज तिरंदाज झाला;
- उत्पत्ती २१:२१सुमारे इ.स.पू. १८९२
पुढे तो पारानच्या रानात राहत असताना त्याच्या आईने त्याचा इजिप्त देशातील एका मुलीसह विवाह करून दिला.
- उत्पत्ती २१:२२सुमारे इ.स.पू. १८८६
याच सुमारास अबीमेलेख राजा व त्याचा सेनापती पीकोल. हे अब्राहामाकडे आले, ते त्याला म्हणाले, “तू जे काही करतोस त्यात परमेश्वर तुला साहाय्य करतात.
- उत्पत्ती २१:२३सुमारे इ.स.पू. १८८६
तर परमेश्वराच्या नावाने तू मला असे वचन दे की, तू माझ्याशी, माझ्या मुलांशी किंवा वंशजांशी कपटनीतीने वागणार नाहीस. ज्याप्रमाणे मी तुझ्याशी मित्रत्वाने वागलो आहे, त्याप्रमाणेच तूही माझ्या देशाशी मित्रत्वानेच वागशील.”
- उत्पत्ती २१:२४सुमारे इ.स.पू. १८८६
अब्राहाम म्हणाला, “ठीक आहे, मी तुला शपथ देतो.”
- उत्पत्ती २१:२५सुमारे इ.स.पू. १८८६
“पण तुझ्या सेवकांनी माझ्या नोकरांपासून जबरदस्तीने एक विहीर हिरावून घेतली आहे त्याचे काय?” अब्राहामाने अबीमेलेखकडे तक्रार केली.
- उत्पत्ती २१:२६सुमारे इ.स.पू. १८८६
“हे तर मी पहिल्यांदाच ऐकत आहे,” अबीमेलेख राजाने उद्गार काढले, “आणि याला कोण जबाबदार आहे याची मला काहीच कल्पना नाही. हे तू मला आधी का सांगितले नाहीस?”
- उत्पत्ती २१:२७सुमारे इ.स.पू. १८८६
मग अब्राहामाने मेंढरे आणि बैल घेतले आणि अबीमेलेखाला दिले आणि त्या दोघांनी करार केला.
- उत्पत्ती २१:२८सुमारे इ.स.पू. १८८६
पण अब्राहामाने सात मेंढ्या बाजूला काढून ठेवल्या,
- उत्पत्ती २१:२९सुमारे इ.स.पू. १८८६
तेव्हा अबीमेलेखाने अब्राहामाला विचारले, “तू असे का करीत आहेस? त्या मेंढ्या बाजूला का काढीत आहेस?”
- उत्पत्ती २१:३०सुमारे इ.स.पू. १८८६
यावर अब्राहामाने उत्तर दिले, “ही विहीर मीच खोदली आहे, याचे जाहीर प्रमाण म्हणून या मेंढ्या मी तुला देणगीदाखल देत आहे.”
- उत्पत्ती २१:३१सुमारे इ.स.पू. १८८६
म्हणून त्या वेळेपासून त्या विहिरीचे नाव बेअर-शेबा पडले. कारण दोघांनी त्याच ठिकाणी शपथ घेऊन करार केला होता.
- उत्पत्ती २१:३२सुमारे इ.स.पू. १८८६
बेअर-शेबा येथे करार केल्यानंतर अबीमेलेख आणि त्याचा सेनापती पीकोल पलिष्ट्यांच्या देशात परतले.
- उत्पत्ती २१:३३सुमारे इ.स.पू. १८८६
अब्राहामाने बेअर-शेबा येथे टमरिस्क म्हणजे एशेल नावाचे झाड लावले आणि सनातन परमेश्वर याहवेहची आराधना केली.
- उत्पत्ती २१:३४सुमारे इ.स.पू. १८८६
आणि अब्राहाम पलिष्ट्यांच्या देशात दीर्घकाल राहिला.
- उत्पत्ती २२:१सुमारे इ.स.पू. १८७२
काही वेळेनंतर परमेश्वराने अब्राहामाची परीक्षा घेतली. परमेश्वराने त्यास म्हटले, “अब्राहामा!” “हा, मी इथे आहे,” तो उत्तरला.