मुख्य मजकुरावर जा

circa 2100–1900 BC

Abraham: The Covenant

God calls Abram from Ur, establishes an everlasting covenant, and promises a son through whom all nations will be blessed.

394 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती २०:४सुमारे इ.स.पू. १८९७

    पण अबीमेलेखाने तिला अद्याप स्पर्श केला नव्हता, म्हणून तो म्हणाला, “प्रभू, तुम्ही एक निरपराधी राष्ट्राचा अंत कराल काय?

  2. उत्पत्ती २०:५सुमारे इ.स.पू. १८९७

    खुद्द अब्राहामानेच मला सांगितले नव्हते का की ती माझी बहीण आहे? आणि तिनेही सांगितले नव्हते का तो माझा भाऊ आहे? मी हे शुद्ध हृदयाने आणि शुद्ध हातांनी केले आहे.”

  3. उत्पत्ती २०:६सुमारे इ.स.पू. १८९७

    परमेश्वराने त्याला स्वप्नात म्हणाले, “होय, ते मला माहीत आहे; ते तू शुद्ध हृदयाने केले आहे आणि म्हणूनच मी तुला पाप करण्यापासून रोखून धरले आणि तिला स्पर्शही करू दिला नाही.

  4. उत्पत्ती २०:७सुमारे इ.स.पू. १८९७

    आता तू तिला आपल्या पतीकडे परत पाठवून दे. तिचा पती माझा संदेष्टा आहे. तो तुझ्यासाठी प्रार्थना करेल, म्हणजे तू जिवंत राहशील; पण जर तू तिला परत पाठविले नाहीस, तर तू आणि तुझे सर्व लोक खात्रीने मरतील.”

  5. उत्पत्ती २०:८सुमारे इ.स.पू. १८९७

    दुसर्‍या दिवशी सकाळीच अबीमेलेखाने आपल्या सर्व अधिकार्‍यांना बोलाविले आणि काय घडले हे त्याने सांगितले, तेव्हा सर्व लोक फार घाबरले.

  6. उत्पत्ती २०:९सुमारे इ.स.पू. १८९७

    मग अबीमेलेखाने अब्राहामास बोलावून विचारणा केली, “हे तू आमच्याशी काय केलेस? मी असे काय अपराध केले की, मला तुझ्याकडून अशी वागणूक मिळावी आणि त्यामुळे माझ्यावर आणि माझ्या राज्यावर घोर पातक आणले? जे कृत्य कधीही करू नये ते तू माझ्याशी केले आहेस.”

  7. उत्पत्ती २०:१०सुमारे इ.स.पू. १८९७

    मग अबीमेलेखाने अब्राहामास विचारले, “तू हे असे करण्याचे काय कारण आहे?”

  8. उत्पत्ती २०:११सुमारे इ.स.पू. १८९७

    अब्राहाम म्हणाला, “मी मनात विचार केला, ‘या शहरात कोणीही परमेश्वराला भीत नाही आणि माझ्या पत्नीमुळे ते माझा वध करतील.’

  9. उत्पत्ती २०:१२सुमारे इ.स.पू. १८९७

    असे असूनही, ती माझी बहीण आहे, माझ्या वडिलांची मुलगी आहे, परंतु माझ्या आईची मुलगी नाही; आणि ती माझी पत्नी झाली.

  10. उत्पत्ती २०:१३सुमारे इ.स.पू. १८९७

    परमेश्वराने माझ्या वडिलांचे घर सोडून मला प्रवासास पाठविले, तेव्हा मी तिला म्हटले की, ‘जिथेही आपण जाऊ तिथे मी तुझा भाऊ आहे असे सांगून तू माझ्यावरील तुझी प्रीती मला दाखव.’ ”

  11. उत्पत्ती २०:१४सुमारे इ.स.पू. १८९७

    मग अबीमेलेखाने अब्राहामाला मेंढरे, बैल आणि स्त्री व पुरुष गुलाम दिले आणि त्याची पत्नी साराहदेखील त्याला परत केली.

  12. उत्पत्ती २०:१५सुमारे इ.स.पू. १८९७

    आणि अबीमेलेख म्हणाला, “माझा देश तुमच्यासमोर आहे. तुम्हाला आवडेल तिथे राहा.”

  13. उत्पत्ती २०:१६सुमारे इ.स.पू. १८९७

    मग साराहला तो म्हणाला, “तुझ्या भावाला मी चांदीचे एक हजार शेकेल देत आहे. मी तुझ्यावर केलेल्या गुन्ह्याबद्दल तुझ्याबरोबरच्या लोकांसमोर ही भरपाई आहे; तू पूर्णपणे निर्दोष आहे.”

  14. उत्पत्ती २०:१७सुमारे इ.स.पू. १८९७

    यानंतर अब्राहामाने परमेश्वराजवळ प्रार्थना केली आणि परमेश्वराने अबीमेलेख राजा, राणी व त्याच्या दासी यांना आरोग्य दिले आणि त्यांना परत मुले होऊ लागली.

  15. उत्पत्ती २०:१८सुमारे इ.स.पू. १८९७

    कारण अब्राहामाची पत्नी साराह हिच्यामुळे याहवेहनी अबीमेलेखाच्या घराण्यातील सर्व स्त्रियांची गर्भधारणा बंद केली होती.

  16. यानंतर याहवेहने आपल्या म्हणण्याप्रमाणे साराहवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पूर्ण केले.

  17. साराह गर्भवती झाली आणि परमेश्वराने नियुक्त केलेल्या वेळी अब्राहामाला त्याच्या वृद्धापकाळात तिच्यापासून एक पुत्र झाला.

  18. अब्राहामाने साराहपासून जन्मलेल्या पुत्राचे नाव इसहाक असे ठेवले.

  19. इसहाक जन्मल्यानंतर आठ दिवसांनी, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे, अब्राहामाने त्याची सुंता केली.

  20. जेव्हा इसहाकाचा जन्म झाला, त्यावेळी अब्राहाम शंभर वर्षांचा होता.

  21. साराह म्हणाली, “परमेश्वराने मला हसविले आहे आणि जे याबद्दल ऐकतील, ते माझ्याबरोबर आनंद करतील.”

  22. आणि ती अजून म्हणाली, “अब्राहामाला कोणी सांगितले असते काय की साराह तिच्या बाळाला स्तनपान करेल? तरीही मी अब्राहामाला त्याच्या म्हातारपणी एक अपत्य दिले आहे.”

  23. उत्पत्ती २१:८सुमारे इ.स.पू. १८९३

    ते बाळ वाढू लागले आणि ज्या दिवशी इसहाकाचे दूध तोडण्यात आले, त्या दिवशी अब्राहामाने एक मोठी मेजवानी दिली.

  24. उत्पत्ती २१:९सुमारे इ.स.पू. १८९३

    परंतु अब्राहामाला इजिप्त देशाची स्त्री हागार, हिच्यापासून झालेला पुत्र, इसहाकाला चिडवीत असताना साराहने पाहिले.

  25. उत्पत्ती २१:१०सुमारे इ.स.पू. १८९३

    तेव्हा ती अब्राहामाला म्हणाली, “दासी व तिचा पुत्र यांना घालवून द्या; कारण त्या स्त्रीचा पुत्र कधीही माझा पुत्र इसहाक याच्याबरोबर वारसा वाटून घेणार नाही.”