मुख्य मजकुरावर जा

circa 2100–1900 BC

Abraham: The Covenant

God calls Abram from Ur, establishes an everlasting covenant, and promises a son through whom all nations will be blessed.

394 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती १७:२सुमारे इ.स.पू. १८९७

    मग मी माझ्या व तुझ्यामध्ये एक करार करेन आणि तुला बहुगुणित करेन.”

  2. उत्पत्ती १७:३सुमारे इ.स.पू. १८९७

    अब्रामाने भूमीपर्यंत लवून नमस्कार केला आणि परमेश्वर त्याला म्हणाले,

  3. उत्पत्ती १७:४सुमारे इ.स.पू. १८९७

    “मी तुझ्याशी हा करार करतो: तू अनेक राष्ट्रांचा पिता होशील.

  4. उत्पत्ती १७:५सुमारे इ.स.पू. १८९७

    आता येथून पुढे तुझे नाव अब्राम असे राहणार नाही, तर ते अब्राहाम असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे.

  5. उत्पत्ती १७:६सुमारे इ.स.पू. १८९७

    मी तुला फलद्रूप करेन; मी तुझ्यापासून राष्ट्रे उदयास आणेल आणि तुझ्या संततीमधून राजे उत्पन्न होतील.

  6. उत्पत्ती १७:७सुमारे इ.स.पू. १८९७

    तुझ्या व तुझ्या येणार्‍या पिढीबरोबर मी असा शाश्वत करार स्थापित करेन की, तुझा व तुझ्यानंतर तुझ्या संतानांचा मी परमेश्वर होईन.

  7. उत्पत्ती १७:८सुमारे इ.स.पू. १८९७

    ज्या देशात आज तू परका आहेस, तो संपूर्ण कनान देश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन; आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.”

  8. उत्पत्ती १७:९सुमारे इ.स.पू. १८९७

    मग परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, “माझ्याशी केलेल्या कराराचे तू आणि तुझ्या येणार्‍या वंशजांनी पिढ्यान् पिढ्या पर्यंत पालन करावे.

  9. उत्पत्ती १७:१०सुमारे इ.स.पू. १८९७

    तू आणि तुझ्या वंशजांशी हा माझा करार म्हणजे: तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची तुम्ही सुंता केली पाहिजे.

  10. उत्पत्ती १७:११सुमारे इ.स.पू. १८९७

    ही सुंता, तुझ्या आणि माझ्यामध्ये केलेल्या कराराचे चिन्ह होईल.

  11. उत्पत्ती १७:१२सुमारे इ.स.पू. १८९७

    पुत्र जन्मल्यानंतर आठव्या दिवशी त्याची सुंता केली पाहिजे. सुंतेची ही अट तू पैसे देऊन विकत घेतलेल्या परदेशीय गुलामांना आणि तुझ्या घराण्यात जन्मलेल्या प्रत्येकाला, जी तुझी संतती नाही त्यांनाही लागू आहे.

  12. उत्पत्ती १७:१३सुमारे इ.स.पू. १८९७

    तुझ्या घराण्यात जन्मलेल्या किंवा तू पैसे देऊन विकत घेतलेल्या प्रत्येक पुरुषाची सुंता केली जावो. तुझ्या शरीराशी केलेला हा करार सदासर्वकाळचा आहे.

  13. उत्पत्ती १७:१४सुमारे इ.स.पू. १८९७

    सुंता न केलेल्या प्रत्येक पुरुषाला त्या समाजातून बेदखल करण्यात येईल कारण त्याने माझा करार मोडला आहे.”

  14. उत्पत्ती १७:१५सुमारे इ.स.पू. १८९७

    मग परमेश्वराने अब्राहामालाही म्हटले, “तुझी पत्नी साराय हिचे नाव आता साराय राहणार नाही, तर तिचे नाव साराह असे होईल.

  15. उत्पत्ती १७:१६सुमारे इ.स.पू. १८९७

    मी तिला आशीर्वाद देईन आणि तिच्यापासून तुला निश्चितच एक पुत्र देईन. मी तिला आशीर्वादित करेन आणि तिला अनेक राष्ट्रांची माता करेन; तिच्यातून लोकांचे राजे उत्पन्न होतील.”

  16. उत्पत्ती १७:१७सुमारे इ.स.पू. १८९७

    अब्राहामाने लवून नमस्कार केला; आणि तो हसला व स्वतःशी म्हणाला, “शंभर वर्षांच्या माणसालाही मुले होतील का? नव्वद वर्षांच्या साराहच्या पोटी बाळ जन्माला येऊ शकेल काय?”

  17. उत्पत्ती १७:१८सुमारे इ.स.पू. १८९७

    तेव्हा अब्राहामाने परमेश्वराला म्हटले, “केवळ इश्माएल तुमच्या आशीर्वादाखाली राहिला तरी पुरे!”

  18. उत्पत्ती १७:१९सुमारे इ.स.पू. १८९७

    परमेश्वराने उत्तर दिले, “होय, परंतु तुझी पत्नी साराह हिच्यापासून तुला एक पुत्र होईल आणि तू त्याचे नाव इसहाक असे ठेवावेस. मी त्याच्याबरोबर आणि त्याच्यानंतर त्याच्या वंशजांबरोबरही अनंतकाळचा करार स्थापित करेन.

  19. उत्पत्ती १७:२०सुमारे इ.स.पू. १८९७

    इश्माएलाविषयी मी तुझी विनंती ऐकली आहे: मी त्याला निश्चितच आशीर्वाद देईन; त्याला फलद्रूप करेन व बहुगुणित करेन. तो बारा शासकांचा पिता होईल व मी त्याला एक महान राष्ट्र बनवेन.

  20. उत्पत्ती १७:२१सुमारे इ.स.पू. १८९७

    पण माझा करार मी इसहाकाबरोबर स्थापित करेन. ज्याला पुढील वर्षी याच सुमारास साराह तुझ्यासाठी प्रसवेल.”

  21. उत्पत्ती १७:२२सुमारे इ.स.पू. १८९७

    जेव्हा त्याने अब्राहामाशी बोलणे संपविले तेव्हा परमेश्वर अंतर्धान पावले.

  22. उत्पत्ती १७:२३सुमारे इ.स.पू. १८९७

    त्याच दिवशी अब्राहामाने आपला पुत्र इश्माएल आणि आपल्या घरात जन्मलेले किंवा पैसे देऊन विकत घेतलेले सर्व पुरुष यांची परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे सुंता केली.

  23. उत्पत्ती १७:२४सुमारे इ.स.पू. १८९७

    अब्राहामाची सुंता झाली त्यावेळी तो नव्याण्णव वर्षांचा होता,

  24. उत्पत्ती १७:२५सुमारे इ.स.पू. १८९७

    आणि त्याचा पुत्र इश्माएल तेरा वर्षांचा होता जेव्हा त्याची सुंता झाली.

  25. उत्पत्ती १७:२६सुमारे इ.स.पू. १८९७

    अब्राहाम व त्याचा पुत्र इश्माएल या दोघांचीही सुंता एकाच दिवशी झाली.