मुख्य मजकुरावर जा

circa 2100–1900 BC

Abraham: The Covenant

God calls Abram from Ur, establishes an everlasting covenant, and promises a son through whom all nations will be blessed.

394 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती १३:६सुमारे इ.स.पू. १९१८

    परंतु ते एकत्र राहत असताना ती जमीन त्यांना पुरेशी होऊ शकत नव्हती, कारण त्यांची संपत्ती इतकी मोठी होती की ते एकत्र राहू शकत नव्हते.

  2. उत्पत्ती १३:७सुमारे इ.स.पू. १९१८

    कनानी व परिज्जी हे लोक देखील तिथे राहत होते. अब्राम व लोट यांच्या गुराख्यामध्ये भांडणे होऊ लागली.

  3. उत्पत्ती १३:८सुमारे इ.स.पू. १९१८

    तेव्हा अब्राम लोटाला म्हणाला, “तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये, किंवा माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यात भांडणे नसावी. कारण आपण जवळचे भाऊबंद आहोत.

  4. उत्पत्ती १३:९सुमारे इ.स.पू. १९१८

    तुझ्यापुढे संपूर्ण देश नाही काय? आपण विभक्त होऊ या. जर तू डावीकडे गेला तर मी उजवीकडे जाईन आणि जर तू उजवीकडे गेला तर मी डावीकडे जाईन.”

  5. उत्पत्ती १३:१०सुमारे इ.स.पू. १९१८

    तेव्हा लोटाने आपली नजर सभोवार फिरविली आणि यार्देन नदीकडील सोअरकडे पाहिले की भरपूर पाणी असलेले, याहवेहच्या बागेसारखे आणि इजिप्त देशासारखे ठिकाण होते. (ही घटना याहवेहने सदोम आणि गमोराचा नाश करण्याआधीची आहे.)

  6. उत्पत्ती १३:११सुमारे इ.स.पू. १९१७

    मग लोटाने यार्देनेची सगळी तळवट निवडली आणि तो पूर्वेकडे निघाला. अशा रीतीने लोट व अब्राम विभक्त झाले.

  7. उत्पत्ती १३:१२सुमारे इ.स.पू. १९१७

    अब्राम कनान देशात राहिला आणि लोटाने यार्देनेच्या पूर्वतीरावरील तळवटीतील शहरांमध्ये मुक्काम करीत सदोम शहरापाशी तळ दिला.

  8. उत्पत्ती १३:१३सुमारे इ.स.पू. १९१७

    सदोम शहरातील लोक दुष्ट होते आणि याहवेहच्या विरुद्ध महापातक करणारे होते.

  9. उत्पत्ती १३:१४सुमारे इ.स.पू. १९१७

    लोट अब्रामापासून विभक्त झाल्यानंतर याहवेह अब्रामाला म्हणाले, “तू जिथे आहेस तिथून उत्तर, नेगेव दक्षिण आणि पूर्व, पश्चिम अशी चहूकडे आपली नजर टाक.

  10. उत्पत्ती १३:१५सुमारे इ.स.पू. १९१७

    जो सर्व देश तू पाहतोस तो मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन.

  11. उत्पत्ती १३:१६सुमारे इ.स.पू. १९१७

    मी तुझी संतती पृथ्वीवरील धुळीच्या कणांइतकी करेन, जर कोणाला धुळीच्या कणांची गणती करता आली, तर तुझ्या संततीचीही गणना होईल.

  12. उत्पत्ती १३:१७सुमारे इ.स.पू. १९१७

    आणि मी जो देश तुला देणार आहे, त्याच्या लांबी व रुंदीपर्यंत चालत जा.”

  13. उत्पत्ती १३:१८सुमारे इ.स.पू. १९१७

    मग अब्रामाने हेब्रोनजवळ असलेल्या मम्रेच्या महान एलावृक्षाजवळ जाऊन तळ दिला आणि तिथे त्याने याहवेहसाठी एक वेदी बांधली.

  14. उत्पत्ती १४:१सुमारे इ.स.पू. १९१३

    त्या काळात जेव्हा शिनारचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा केदोरलाओमेर व गोयीमाचा राजा तिदाल यांनी,

  15. उत्पत्ती १४:२सुमारे इ.स.पू. १९१३

    सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाहचा राजा शिनाब, सबोईमाचा राजा शमेबर आणि बेलाचा म्हणजे सोअराचा राजा यांच्याशी युद्ध केले.

  16. उत्पत्ती १४:३सुमारे इ.स.पू. १९१३

    दुसर्‍या गटाचे सर्व राजे सिद्दिमाच्या म्हणजे (मृत समुद्राच्या खोर्‍यात) एकत्र जमले.

  17. उत्पत्ती १४:४सुमारे इ.स.पू. १९१३

    बारा वर्षापर्यंत ते केदोरलाओमेर या राजाची सेवा करणारी प्रजा होते, परंतु तेराव्या वर्षी त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले.

  18. उत्पत्ती १४:५सुमारे इ.स.पू. १९१३

    चौदाव्या वर्षी, केदोरलाओमेर व त्याचे मित्रराजे यांनी अष्टरोथ-कर्णईम येथील रेफाईम लोकांचा व हाम येथील जूजीम लोकांच्या टोळीचा व शावेह किर्याथाईम येथे एमी लोकांचा पराभव केला

  19. उत्पत्ती १४:६सुमारे इ.स.पू. १९१३

    आणि होरी लोकांच्या टोळीला सेईर डोंगरात मार देऊन रानाच्या हद्दीवर असलेल्या एल-पारान येथपर्यंत पिटाळून लावले.

  20. उत्पत्ती १४:७सुमारे इ.स.पू. १९१३

    पुढे ज्याला कादेश असे नाव मिळाले, त्या एन मिशपात (अर्थात् कादेश) आणि अमालेकी लोकांचा, संपूर्ण प्रदेश व हससोन-तामार येथे राहणार्‍या अमोरी यांचाही त्यांनी पराभव केला.

  21. उत्पत्ती १४:८सुमारे इ.स.पू. १९१३

    पण आता सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाहचा राजा, सबोईमचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा यांनी सिद्दीमच्या खोर्‍यात हल्ला करण्याची तयारी केली.

  22. उत्पत्ती १४:९सुमारे इ.स.पू. १९१३

    ते एलामाचा राजा केदोरलाओमेर, गोयीमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक यांच्याविरुद्ध लढले. ते पाच राजे विरुद्ध चार राजे असे लढले.

  23. उत्पत्ती १४:१०सुमारे इ.स.पू. १९१३

    सिद्दीमच्या खोर्‍यात डांबराच्या अनेक खाणी होत्या. सदोम आणि गमोरा येथील राजांच्या सैन्याने पळ काढला, तेव्हा काहीजण त्या खाणीत पडले, पण बाकीचे सैन्य डोंगरावर पळून गेले.

  24. उत्पत्ती १४:११सुमारे इ.स.पू. १९१३

    चार राजांनी सदोम आणि गमोरा येथील मालमत्ता व अन्नसामुग्री लुटली आणि ते निघून गेले.

  25. उत्पत्ती १४:१२सुमारे इ.स.पू. १९१३

    सदोम येथे राहणारा अब्रामाचा पुतण्या लोट यालाही त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंसह ते घेऊन गेले.