Skip to content

Tabernacle बद्दल बायबलमधील वचने

465 वचने · 94 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हाच तुम्ही तुमची सर्व होमार्पणे, यज्ञार्पणे, दशांश, नवसाची अर्पणे व स्वेच्छार्पणे—याहवेह तुमचे परमेश्वर स्वतःच्या नावाचे निवासस्थान म्हणून ज्या ठिकाणाची निवड करतील तिथे आणावीत.

  2. आणि त्या ठिकाणी तुम्ही, तुमचे पुत्र आणि कन्या, तुमचे दास व दासी आणि तुमच्या नगरातील लेवी, ज्यांना स्वतःचा कोणताही वाटा किंवा वतन नाही, या सर्वांसह—याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर आनंदोत्सव करावा.

  3. तुमची होमार्पणे तुम्ही इतर कुठेही अर्पण करणार नाही याची खबरदारी घ्या.

  4. तुमच्या एका गोत्रातील याहवेहने नेमून दिलेल्या ठिकाणीच तुमचे होमबली अर्पावेत आणि मी तुम्हाला जे आज्ञापिले ते सर्वकाही करावे.

  5. मग याहवेह मोशेला म्हणाले, “तुझ्या मृत्यूचा दिवस जवळ आला आहे. यहोशुआला बोलव आणि तुम्ही दोघे सभामंडपात हजर व्हा म्हणजे मी तिथे त्याला नियुक्त करेन.” मग मोशे आणि यहोशुआ आले आणि सभामंडपात हजर झाले.

  6. तेव्हा याहवेह मंडपाच्या प्रवेशद्वाराशी मेघस्तंभाच्या रूपाने त्यांना प्रगट झाले आणि मेघस्तंभ द्वाराशी स्थिर राहिले.

  7. “तुम्ही जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वराच्या कराराचा कोश व तो वाहत असणार्‍या लेवी याजकांना पाहाल, तेव्हा तुमच्या ठिकाणातून निघून त्यांच्या पाठोपाठ जा.

  8. तेव्हा कोणत्या मार्गाने जावे हे तुम्हाला समजेल, कारण तुम्ही या मार्गाने पूर्वी कधी गेला नाही. परंतु तुमच्यात व कोशात अंदाजे वीस हजार हाताचे अंतर असावे; तुम्ही त्याजवळ जाऊ नये.”

  9. मग यहोशुआने लोकांना सांगितले, “तुम्ही शुद्ध व्हा, कारण उद्या तुम्हामध्ये याहवेह एक महान चमत्कार करणार आहेत.”

  10. यहोशुआने याजकांस म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि लोकांच्या पुढे चला.” तेव्हा त्यांनी कोश घेतला व लोकांच्या पुढे निघाले.

  11. यरीहोच्या मैदानावर गिलगाल येथे इस्राएली लोकांनी तळ दिलेला असताना, त्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी सायंकाळी त्यांनी वल्हांडण सण साजरा केला.

  12. वल्हांडणाच्या दुसर्‍या दिवशी, त्याच दिवशी त्यांनी त्या जमिनीतील काही उपज खाल्ले: बेखमीर भाकरी आणि भाजलेले धान्य.

  13. इस्राएली लोकांनी ते शहर व त्यातील प्रत्येक गोष्ट जाळून टाकली. फक्त चांदी व सोने, कास्य व लोखंडाची पात्रे याहवेहच्या भांडारासाठी राखून ठेवण्यात आली.

  14. संपूर्ण इस्राएली लोकांचा समुदाय शिलोह येथे एकत्र जमला आणि तिथे त्यांनी सभामंडप उभारला. देश त्यांच्या ताब्यात आला होता.

  15. या वतनसीमा एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएली गोत्राच्या कुळांच्या पुढार्‍यांनी शिलोह येथे सभामंडपाच्या प्रवेशद्वारात याहवेहच्या उपस्थितीत नेमून दिली. अशाप्रकारे त्यांनी देशाची वाटणी करण्याचे काम संपविले.

  16. जर तुमच्या मालकीची जमीन अशुद्ध असेल, तर याहवेहच्या भूमीकडे या, ज्या ठिकाणी याहवेहचा निवासमंडप उभा आहे आणि ती भूमी आमच्याबरोबर वाटून घ्या. परंतु याहवेह आपल्या परमेश्वराच्या वेदीखेरीज आपल्यासाठी वेदी बांधून याहवेहविरुद्ध किंवा आमच्याविरुद्ध बंड करू नका.

  17. वर्षानुवर्षे हे असेच चालू होते. जेव्हा हन्नाह याहवेहच्या मंदिरात जात असे, तेव्हा तिची सवत पनिन्नाह, ती रडेपर्यंत चिडवीत असे आणि मग ती काही खात नसे.

  18. एकदा, शिलोह येथे त्यांनी खाणेपिणे संपविल्यानंतर हन्नाह उठली. तेव्हा एली याजक याहवेहच्या मंदिराच्या दारात त्याच्या खुर्चीवर बसलेला होता.

  19. त्याचे दूध तोडल्यानंतर तिने बालकास लहान असतानाच तिच्याबरोबर घेतले, तसेच तीन वर्षाचा बैल, एक एफा सपीठ आणि द्राक्षारसाचा बुधला घेतला आणि त्याला शिलोह येथे याहवेहच्या मंदिरात आणले.

  20. आता एली, जो फार वृद्ध झाला होता, त्याची मुले सर्व इस्राएली लोकांशी कसा व्यवहार करीत होते आणि ज्या स्त्रिया सभामंडपाच्या प्रवेशद्वारात सेवा करीत होत्या त्यांच्याबरोबर त्यांनी जे कुकर्म केले त्या सर्वांविषयी त्याने ऐकले.

  21. परमेश्वराचा दीप अजूनही विझला नव्हता आणि शमुवेल याहवेहच्या घरात परमेश्वराचा कोश होता त्या ठिकाणी निजला होता.

  22. दावीद नोब येथे अहीमेलेख याजकाकडे गेला. अहीमेलेख भीतीने कापत दावीदाला भेटला आणि विचारले, “तू एकटाच का आहेस? तुझ्याबरोबर कोणीच का नाही?”

  23. दावीदाने अहीमेलेख याजकाला उत्तर दिले, “राजाने मला एका कामगिरीवर पाठवले आहे आणि मला सांगितले, ‘ज्या कामगिरीवर मी तुला पाठवित आहे त्याबद्दल कोणालाही माहीत होऊ नये.’ आणि माझ्या माणसांनी मला मी एका ठराविक ठिकाणी भेटावे असे मी त्यांना सांगितले आहे.

  24. तर आता, तुझ्याजवळ काय आहे? मला पाच भाकरी दे किंवा तुझ्याजवळ जे काही असेल ते दे.”

  25. परंतु याजकाने दावीदाला उत्तर दिले, “माझ्याजवळ कोणती साधारण भाकर नाही, तरीही काही पवित्र भाकर येथे आहे, जी माणसे तुझ्याबरोबर आहेत ती मात्र स्त्रियांपासून दूर राहिली पाहिजेत.”