मुख्य मजकुरावर जा

Tabernacle बद्दल बायबलमधील वचने: The second, eleven curtains of goats' hair

12 वचने · 94 पैलू

The second, eleven curtains of goats' hair बद्दल वचने

  1. “निवासमंडपावर आच्छादन करण्यासाठी बोकडाच्या केसाचे पडदे तयार करावेत; ते अकरा पडदे असावेत.

  2. सर्व अकरा पडदे एकाच मापाचे, म्हणजे लांबी तीस हात व रुंदी चार हात. असावी.

  3. पाच पडदे एकत्र व इतर सहा पडदे एकत्र असे जोडावेत. सहावा पडदा मंडपाच्या पुढील बाजूस दुमडावा.

  4. जोडलेल्या पडद्यांपैकी शेवटच्या पडद्याच्या किनारीवर शेवटपर्यंत पन्नास फासे करून तो एकजोड करावा आणि दुसर्‍या पडद्यापैकी किनारीवर देखील पन्नास फासे करून एकजोड करावा.

  5. मग कास्याचे पन्नास आकडे करावेत आणि ते फासात घालून असे जोडावे की तंबू एकजोड होईल.

  6. तंबूच्या पडद्याचा उरलेला भाग, म्हणजे जो अर्धा पडदा उरतो, तो निवासमंडपाच्या मागच्या बाजूस टांगलेला असू द्यावा.

  7. तंबूचे पडदे दोन्ही बाजूंनी एकएक हात अधिक लांब असावे; उरलेला पडदा निवासमंडपाला झाकेल असा लोंबत ठेवावा.

  8. निवासमंडपावर आच्छादन करण्यासाठी त्यांनी बोकडाच्या केसाचे पडदे तयार केले; ते अकरा पडदे होते.

  9. सर्व अकरा पडदे एकाच मापाचे, म्हणजे लांबी तीस हात व रुंदी चार हात होती.

  10. त्यांनी पाच पडदे एकत्र जोडले आणि इतर सहा पडदे एकत्र जोडले.

  11. जोडलेल्या पडद्यांपैकी शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास फासे करून तो एकजोड केला आणि दुसर्‍या पडद्याच्या किनारीवर देखील पन्नास फासे करून एकजोड केला.

  12. मग त्यांनी कास्याचे पन्नास आकडे तयार केले आणि ते फासात घालून तंबू एकजोड केला.