Tabernacle बद्दल बायबलमधील वचने: Appointed over, and had charge of
Appointed over, and had charge of बद्दल वचने
परंतु कराराच्या नियमाचा निवासमंडप; त्यातील सामुग्री व त्यासंबंधाचे जे काही आहे त्यावर लेवींची प्रमुख म्हणून नेमणूक कर. त्यांनी निवासमंडप व त्यातील सामुग्री वाहून न्यावी; त्यांनी त्याची काळजी घ्यावी व त्याभोवती आपला डेरा उभारावा.
“लेव्यांच्या संबंधी हा नियम लागू असावा: पंचवीस वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या पुरुषांनी सभामंडपामध्ये कार्यरत होण्यासाठी यावे.
तू व तुझे पुत्र कराराच्या नियमाच्या कोशापुढे जेव्हा सेवा करतात तेव्हा तुझ्याशी जडून व तुला मदत करण्यासाठी लेवी वंशातील, तुझ्या पूर्वजांच्या गोत्रातील तुझ्या बांधवांना आपल्यासोबत आण.
ते तुला जबाबदार असणार व त्यांनी मंडपातील सर्व कर्तव्ये पार पाडावीत, परंतु त्यांनी पवित्रस्थानाच्या पात्रांजवळ किंवा वेदीजवळ जाऊ नये. नाहीतर ते व तुम्हीही मृत व्हाल.
त्यांनी तुझ्याशी जडून सभामंडपाच्या सेवेसंबंधी—म्हणजेच मंडपातील सर्व कामासंबंधी जबाबदार असावे—आणि जिथे तू असणार तिथे इतर कोणीही जवळ येऊ नये.