मुख्य मजकुरावर जा

Tabernacle बद्दल बायबलमधील वचने: Defilement of, punished

5 वचने · 94 पैलू

Defilement of, punished बद्दल वचने

  1. “अशाप्रकारे इस्राएली लोकांना तू अशुद्धतेपासून दूर ठेवावे. आपल्यावर मरणाचा प्रसंग ओढवू नये म्हणून त्यांनी आपल्या अशुद्धतेमुळे त्यांच्यामध्ये ज्या निवासमंडपात मी राहतो तो अशुद्ध करू नये.”

  2. मानवी मृतदेहाला स्पर्श केल्यानंतरही जर त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते याहवेहचा निवासमंडप विटाळवितात. इस्राएली लोकांमधून त्यांना काढून टाकले जावे. कारण शुद्ध करणारे पाणी त्याच्यावर शिंपडले गेले नाही, ते अशुद्ध आहेत; त्यांचा अशुध्दपणा त्यांच्यावर तसाच राहतो.

  3. पण जे अशुद्ध आहेत आणि स्वतःला शुद्ध करीत नाहीत, त्यांना समाजातून काढून टाकले जावे, कारण त्यांनी याहवेहचे पवित्रस्थान विटाळविले आहे. शुद्धतेचे पाणी त्यांच्यावर शिंपडले गेले नाही आणि ते अशुद्ध आहेत.

  4. म्हणून सार्वभौम याहवेह असे घोषित करतात, की माझ्या जिवाची शपथ, तुम्ही तुमच्या व्यर्थ मूर्तींनी व अमंगळ कृत्यांनी माझे पवित्रस्थान भ्रष्ट केले आहे, म्हणून मी स्वतः तुमचे मुंडण करेन; मी तुमच्यावर दया करणार नाही किंवा तुमची गय करणार नाही.

  5. त्यांनी मलाही असेच केले: त्याचवेळी त्यांनी माझे पवित्रस्थान अपवित्र आणि माझे शब्बाथ भ्रष्ट केले.