Tabernacle बद्दल बायबलमधील वचने: Divided by a vail of blue, purple, suspended from four pillars of shittim
Divided by a vail of blue, purple, suspended from four pillars of shittim बद्दल वचने
“निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या कातलेल्या रेशमी तागाचा पडदा करून त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घ्यावेत.
हा पडदा, बाभळीच्या लाकडाचे बनविलेले सोन्याचे आवरण देऊन चांदीच्या बैठकावर उभ्या असलेल्या चार खांबावर चार सोन्याच्या बैठकावर टांगावा.
पडदा आकड्यांवर टांगावा आणि कराराचा कोश पडद्यामागे ठेवावा. हा पडदा पवित्रस्थान व परमपवित्रस्थानाची साक्ष वेगळी करेल.
मग त्यांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाचे पडदे बनविले व त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घेतले.
त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले व त्यावर सोन्याचे आवरण घातले. त्यासाठी त्यांनी सोन्याच्या कड्या व चांदीच्या चार बैठका बनविल्या.
मग मोशेने कोश निवासमंडपात आणला आणि पडदे अडकविले आणि याहवेहने त्याला आज्ञापिल्याप्रमाणे कराराच्या नियमाचा कोश झाकून घेतला.