मुख्य मजकुरावर जा

Tabernacle बद्दल बायबलमधील वचने: (The holy of holies,) of heaven

5 वचने · 94 पैलू

(The holy of holies,) of heaven बद्दल वचने

  1. आम्हाला ही आशा जिवासाठी नांगर असून स्थिर व अढळ आहे. ती पडद्याच्या मागे आतील मंदिरात प्रवेश करणारी आहे.

  2. जिथे येशूंनी आपला अग्रदूत मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे, सदासर्वकाळचा महायाजक म्हणून आपल्यावतीने प्रवेश केला आहे.

  3. त्यांनी परमपवित्रस्थानात शेळ्यांच्या आणि वासरांच्या रक्ताद्वारे प्रवेश केला नाही; परंतु स्वतःच्या रक्ताद्वारे एकदाच प्रवेश केला आणि अनंतकाळची मुक्ती मिळविली.

  4. ख्रिस्ताने मानवी हाताने बांधलेल्या पवित्र मंदिरात प्रवेश केला नाही कारण ते खर्‍या मंदिराची केवळ नक्कल होती; आपल्यावतीने परमेश्वराच्या समक्षतेत उपस्थित राहण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष स्वर्गात प्रवेश केला आहे.

  5. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आता येशूंच्या रक्ताद्वारे आपल्याला परमपवित्रस्थानी आत्मविश्वासाने जाता येते.