Tabernacle बद्दल बायबलमधील वचने: By Moses at Mount Sinai
By Moses at Mount Sinai बद्दल वचने
जेव्हा मोशेने निवासमंडपाची उभारणी केली, त्याने बैठका जागेवर लावल्या, फळ्या उभ्या केल्या, त्यात अडसर टाकले व खांब उभे केले.
मग मोशेने निवासमंडपावरून तंबू पसरला आणि तंबूवर आच्छादन टाकले, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते.
दुसर्या वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या विसाव्या दिवशी कराराच्या नियमाच्या निवासमंडपावरून मेघ वरती घेतला गेला.
तेव्हा इस्राएली लोक सीनायच्या रानातून निघाले आणि पारानाच्या रानात मेघ स्थिर होईपर्यंत एका ठिकाणातून दुसर्या ठिकाणी प्रवास करीत राहिले.