Tabernacle बद्दल बायबलमधील वचने: Surrounded by curtains of fine line suspended from pillars in sockets of brass
Surrounded by curtains of fine line suspended from pillars in sockets of brass बद्दल वचने
“निवासमंडपासाठी अंगण बनवावे. त्याची दक्षिणेकडील बाजू शंभर हात लांब असावी व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पडदे असावेत,
आणि वीस खांब व वीस कास्याच्या बैठका बनवाव्या, खांबावर चांदीच्या कड्या व पट्ट्या असाव्या.
उत्तरेकडील बाजू सुद्धा शंभर हात लांब असून तिलाही पडदे आणि वीस खांब व कास्याच्या वीस बैठका बनवाव्या, खांबाच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या असाव्या.
“अंगणाच्या पश्चिमेकडील बाजू पन्नास हात रुंदीची असावी व त्यासाठी पडदे, व दहा खांब व दहा बैठका असाव्या.
सूर्योदयाकडील पूर्वेकडील अंगण सुद्धा पन्नास हात रुंद असावे.
प्रवेशद्वाराच्या एका बाजूस पंधरा हात लांबीचा पडदा आणि तीन खांब व तीन बैठका असाव्या.
आणि दुसर्या बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे, तीन खांब व तीन बैठका असाव्या.
मग त्यांनी अंगण तयार केले. त्याची दक्षिणेकडील बाजू शंभर हात लांब होती व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पडदे होते.
आणि वीस खांब व वीस कास्याच्या बैठका होत्या, खांबावर चांदीच्या कड्या व पट्ट्या होत्या.
उत्तरेकडील बाजू सुद्धा शंभर हात लांब होती आणि वीस खांब व कास्याच्या वीस बैठका होत्या व खांबाच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या होत्या.
पश्चिमेकडील शेवटची बाजू पन्नास हात रुंदीची होती आणि त्याला पडदे लावलेले होते, त्याला दहा खांब व दहा बैठका असून खांबांना चांदीच्या कड्या व पट्ट्या होत्या.
सूर्योदयाकडील पूर्वेकडील बाजू पन्नास हात रुंद होती.
प्रवेशद्वाराच्या एका बाजूस पंधरा हात लांबीचा पडदा होता. त्यास तीन खांब व तीन बैठका होत्या,
आणि अंगणाच्या प्रवेशद्वाराच्या दुसर्या बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे होते, त्यास तीन खांब व तीन बैठका होत्या.
अंगणाच्या सर्व बाजूचे पडदे कातलेल्या रेशमी तागाचे होते.