Tabernacle बद्दल बायबलमधील वचने: Pattern of, revealed to Moses
Pattern of, revealed to Moses बद्दल वचने
हा निवासमंडप आणि त्याची रचना मी दाखवेन त्याप्रमाणेच असावी.
“मी तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणे नमुन्याप्रमाणे निवासमंडप तयार करावा.
याप्रकारे निवासमंडप व सभामंडप यांचे काम समाप्त झाले. इस्राएली लोकांनी जे काही याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याप्रमाणेच केले.
याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणेच इस्राएल लोकांनी सर्व कामे केली होती.
मोशेने कामाचे परीक्षण केले व पाहिले की त्यांनी याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणेच केले होते. म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.
“आपले पूर्वज रानातून जाताना त्यांच्याबरोबर कराराच्या साक्षीचा निवासमंडप होता. परमेश्वराने मोशेला दिलेल्या निर्देशानुसार व नमुन्याप्रमाणे त्याची रचना करण्यात आली होती.
जे स्वर्गात आहे, त्याचे प्रतिरूप आणि छाया आहे त्या मंदिरात ते सेवा करतात. यामुळेच मोशे निवासमंडप उभारण्याची तयारी करीत असताना, “पर्वतावर दाखविलेल्या निवासमंडपाच्या नमुन्याप्रमाणेच ते सर्व काळजीपूर्वकपणे ठेवावे असे त्याला सांगितले होते.”