Skip to content

Tabernacle बद्दल बायबलमधील वचने

465 वचने · 94 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दावीदाने याजकाला उत्तर दिले, “नक्कीच, नेहमीप्रमाणे मी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा स्त्रियांना आमच्यापासून दूर ठेवतो. कामगिरी पवित्र नसताना सुद्धा माणसांची शरीरे पवित्र असतात. तर आज किती अधिक पवित्र असतील!”

  2. तेव्हा याजकाने त्याला समर्पित समक्षतेची भाकर दिली, कारण समर्पित भाकरीशिवाय दुसरी भाकर तिथे नव्हती. जेव्हा ताजी भाकरी याहवेहच्या समक्षतेत ठेवली जात असे तेव्हा शिळी भाकर काढून टाकली जात असे.

  3. “जा आणि माझा सेवक दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी निवास करावा म्हणून माझ्यासाठी तू घर बांधणार काय?

  4. इस्राएली लोकांना इजिप्त देशातून मी बाहेर आणले तेव्हापासून आजपर्यंत मी घरात राहिलो नाही. मी एका ठिकाणाहून दुसरीकडे, माझे निवासस्थान म्हणून डेर्‍यातूनच फिरत आलो आहे.

  5. जिथे कुठे मी इस्राएली लोकांबरोबर फिरत आलो, तेव्हा त्यांच्यातील ज्यांना मी माझ्या इस्राएली लोकांची मेंढपाळाप्रमाणे काळजी घेण्यास आज्ञा दिली त्यातील कोणत्याही अधिकार्‍यांना, “तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे घर का बांधले नाही” असे कधी म्हटले काय?’

  6. “तर आता माझा सेवक दावीदाला सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: मी तुला कुरणातून, कळप राखीत असताना आणले आणि माझ्या इस्राएली लोकांवर अधिपती म्हणून नेमले.

  7. जिथे कुठे तू गेलास तिथे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून छेदून टाकले. आता मी पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ पुरुषांच्या नावांप्रमाणे तुझे नाव महान करेन.

  8. आणि मी माझ्या इस्राएली लोकांसाठी एक ठिकाण नेमून देईन आणि त्यांना त्या ठिकाणी स्थापित करेन, यासाठी की त्यांना स्वतःचे घर असावे आणि त्यांना पुन्हा त्रास होऊ नये. आणि पूर्वीप्रमाणे दुष्ट लोकांनी त्यांचा छळ करू नये.

  9. मी माझ्या इस्राएली लोकांवर पुढारी नेमले तेव्हापासून त्यांनी तसेच केले आहे. मी तुलासुद्धा तुझ्या सर्व शत्रूंपासून विसावा देईन. “ ‘याहवेह असे जाहीर करतात, की याहवेह स्वतः तुझ्यासाठी घर स्थापित करतील:

  10. जेव्हा तुझे दिवस भरतील आणि तू आपल्या पूर्वजांबरोबर निजशील, तेव्हा मी तुझे संतान म्हणजे तुझ्या पोटचा वंश उभा करून त्याला तुझा उत्तराधिकारी बनवीन, मी त्याचे राज्य प्रस्थापित करेन.

  11. तोच माझ्या नावाकरिता घर बांधेल आणि मी त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित करेन.

  12. जेव्हा योआबाला ही बातमी कळली, तो याहवेहच्या मंडपाकडे पळून गेला आणि वेदीवरील शिंगे धरून राहिला. अबशालोमसोबत तो जरी मिळाला नव्हता तरीही अदोनियाहसोबत त्याने कट रचला होता.

  13. तेव्हा शलोमोन राजाने दावीदाचे नगर सीयोन येथून याहवेहच्या कराराचा कोश आणण्यासाठी इस्राएल लोकांच्या पुढाऱ्यांना, सर्व गोत्रप्रमुखांना आणि इस्राएली कुटुंबाच्या सर्व प्रमुखांना त्याच्यापुढे येण्यास यरुशलेमास बोलाविले.

  14. आणि त्यांनी याहवेहचा कोश, सभामंडप व त्यातील सर्व पवित्र पात्रे आणली. याजक व लेवींनी ती वाहून आणली,

  15. राजा शलोमोन आणि जमलेली इस्राएलची संपूर्ण मंडळी कोशासमोर इतक्या मेंढरांचा आणि गुरांचा बळी दिले की, त्यांची नोंद किंवा मोजणी करता येत नव्हती.

  16. आता दावीदाने स्वतःसाठी दावीद नगर यरुशलेममध्ये भवने बांधली व त्याने परमेश्वराच्या कोशाकरिता एक स्थान सिद्ध करून तिथे एक नवा तंबू ठोकला.

  17. त्यांनी देवाचा कोश आणला आणि दावीदाने त्यासाठी जो तंबू तयार केला होता त्या ठिकाणी तो ठेवला आणि परमेश्वरासमोर होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केली.

  18. होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केल्यानंतर दावीदाने लोकांना याहवेहच्या नावाने आशीर्वाद दिला.

  19. दावीदाने गिबोन टेकडीवरील याहवेहच्या सभामंडपात सादोक याजक आणि त्याचे याजक भाऊबंद सेवा करण्यासाठी ठेवले.

  20. मोशेने रानात याहवेहसाठी केलेला सभामंडप आणि होमबलीची वेदी या दोन्ही गिबोनच्या टेकडीवर होती.

  21. शलोमोन व संपूर्ण सभा गिबोनच्या उच्चस्थानी गेले, कारण याहवेहचा सेवक मोशेने अरण्यवासात परमेश्वराचा सभामंडप उभारला होता.

  22. दावीदाने किर्याथ-यआरीमहून परमेश्वराचा कोश आणला, कारण त्याने त्याकरिता यरुशलेम येथे एक मंडप उभारला होता.

  23. परंतु हूरचा पुत्र, उरीचा पुत्र बसालेलाने गिबोनात कास्याच्या धातूची वेदी याहवेहच्या कोशासमोर बनविली होती; आता शलोमोन व सर्व लोक त्यांची इच्छा जाणून घेण्यास आले.

  24. शलोमोन याहवेहच्या समक्षतेत सभामंडपात गेला व त्याने कास्याच्या वेदीवर एक हजार होमबली अर्पिले.

  25. आणि त्यांनी कोश, सभामंडप व त्यातील सर्व पवित्र पात्रे आणली. याजकीय लेवींनी ती वाहून आणली,