Skip to content

Tabernacle बद्दल बायबलमधील वचने

465 वचने · 94 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा कोश थांबत असे, तो म्हणे, “हे याहवेह, परत या, इस्राएलाच्या हजारो असंख्याकडे पुन्हा या.”

  2. याहवेह लगेचच मोशे, अहरोन आणि मिर्यामला म्हणाले, “तुम्ही तिघेही सभामंडपाकडे बाहेर या.” तेव्हा ते तिघे बाहेर गेले.

  3. मग याहवेह मेघस्तंभातून खाली आले; आणि निवासमंडपाच्या दाराशी उभे राहून अहरोन व मिर्याम यांना बोलाविले. जेव्हा ते पुढे गेले,

  4. याहवेह त्यांना म्हणाले, “माझे शब्द ऐका: “जेव्हा तुमच्यामध्ये एखादा संदेष्टा आहे, मी याहवेह, त्यांना दृष्टान्ताद्वारे स्वतःला प्रकट करतो, स्वप्नाद्वारे मी त्यांच्याशी बोलतो.

  5. परंतु माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही; तो माझ्या सर्व घराण्यात विश्वासू आहे.

  6. मी त्याच्याशी कोड्यात नाही, तर समोरासमोर स्पष्टपणे बोलतो; तो याहवेहचे रूप पाहतो. माझा सेवक मोशे याच्याविरुद्ध बोलण्यास तुम्हाला भीती का वाटली नाही?”

  7. मग याहवेहचा क्रोध त्यांच्याविरुद्ध भडकला आणि याहवेह त्यांना सोडून निघून गेले.

  8. जेव्हा मंडपावरून मेघ वरती घेतला गेला, तेव्हा मिर्यामची त्वचा रोगाने भरली होती; ती बर्फासारखी पांढरी झाली. अहरोनाने तिच्याकडे वळून बघितले तेव्हा त्याने पाहिले की तिच्या त्वचेवर कोड फुटले होते,

  9. जेव्हा कोरहाने त्यांच्याविरुद्ध असून त्याला अनुसरणाऱ्या सर्वांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ जमविले, याहवेहचे वैभव संपूर्ण समुदायासमक्ष प्रगट झाले.

  10. लवकरच तिथे मोशे व अहरोनाच्या विरुद्ध समुदाय जमला. तेवढ्यात एकाएकी सभामंडपावर मेघ उतरून याहवेहचे गौरव पसरल्याचे त्यांना दिसले.

  11. मोशे आणि अहरोन सभामंडपाच्या दाराशी येऊन उभे राहिले;

  12. मोशेने त्या काठ्या कराराच्या नियमाच्या मंडपात याहवेहसमोर ठेवल्या.

  13. दुसर्‍या दिवशी मोशे मंडपात गेला आणि अहरोनाची काठी जी लेवी वंशाच्या वतीने ठेवली होती, ती केवळ अंकुरितच नव्हे तर त्याला कळी आली असून तिच्यावर बदाम पिकलेले दिसले.

  14. याहवेह अहरोनाला म्हणाले, “पवित्रस्थानासंबंधी झालेल्या अन्यायास तू, तुझे पुत्र आणि तुझे घराणे जबाबदार असणार व याजकपणासंबंधीच्या अपराधासही तू व तुझे पुत्र जबाबदार असणार.

  15. तू व तुझे पुत्र कराराच्या नियमाच्या कोशापुढे जेव्हा सेवा करतात तेव्हा तुझ्याशी जडून व तुला मदत करण्यासाठी लेवी वंशातील, तुझ्या पूर्वजांच्या गोत्रातील तुझ्या बांधवांना आपल्यासोबत आण.

  16. ते तुला जबाबदार असणार व त्यांनी मंडपातील सर्व कर्तव्ये पार पाडावीत, परंतु त्यांनी पवित्रस्थानाच्या पात्रांजवळ किंवा वेदीजवळ जाऊ नये. नाहीतर ते व तुम्हीही मृत व्हाल.

  17. त्यांनी तुझ्याशी जडून सभामंडपाच्या सेवेसंबंधी—म्हणजेच मंडपातील सर्व कामासंबंधी जबाबदार असावे—आणि जिथे तू असणार तिथे इतर कोणीही जवळ येऊ नये.

  18. “पवित्रस्थान व वेदीच्या सेवेसंबंधी तू जबाबदार असावे, यासाठी की इस्राएली लोकांवर माझा क्रोध पुन्हा भडकू नये.

  19. मानवी मृतदेहाला स्पर्श केल्यानंतरही जर त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते याहवेहचा निवासमंडप विटाळवितात. इस्राएली लोकांमधून त्यांना काढून टाकले जावे. कारण शुद्ध करणारे पाणी त्याच्यावर शिंपडले गेले नाही, ते अशुद्ध आहेत; त्यांचा अशुध्दपणा त्यांच्यावर तसाच राहतो.

  20. पण जे अशुद्ध आहेत आणि स्वतःला शुद्ध करीत नाहीत, त्यांना समाजातून काढून टाकले जावे, कारण त्यांनी याहवेहचे पवित्रस्थान विटाळविले आहे. शुद्धतेचे पाणी त्यांच्यावर शिंपडले गेले नाही आणि ते अशुद्ध आहेत.

  21. मग मोशे व अहरोन मंडळीपुढून निघून सभामंडपाच्या दाराशी गेले व पालथे पडले आणि याहवेहचे तेज त्यांना प्रकट झाले.

  22. त्यावेळी ते सभामंडपाच्या दारात रडत असताना, एका इस्राएली पुरुषाने मोशे व संपूर्ण इस्राएली मंडळीसमोर एक मिद्यानी स्त्री आणली.

  23. मोशे आणि एलअज़ार याजकाने हजारांच्या व शंभरांच्या सरदारांकडून जे सोने स्वीकारले, ते त्यांनी इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून सभामंडपात आणले.

  24. उलट, तुमच्या सर्व गोत्रांच्या जागेतून याहवेह तुमचे परमेश्वर निवडील व त्या जागेला ते स्वतःचे नाव देतील, त्या ठिकाणी तुम्ही जावे;

  25. तिथेच तुम्ही आपली होमार्पणे, यज्ञार्पणे, तुमचे दशांश व विशेष भेटी, नवस फेडण्यासाठी आणलेली अर्पणे आणि तुमची स्वेच्छार्पणे आणि तुमच्या गुरांची व शेरडामेंढरांची प्रथम वत्सांची अर्पणे आणावीत.