Skip to content

Tabernacle बद्दल बायबलमधील वचने

465 वचने · 94 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “वर्षातून तीन वेळा तुमच्या सर्व पुरुषांनी सार्वभौम याहवेह यांच्यासमोर हजर व्हावे.

  2. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  3. “इस्राएली लोकांना सांग की, त्यांनी मला अर्पण आणावे. ज्यांना मनापासून देण्याची इच्छा आहे त्यांच्याकडून ते तू माझ्यावतीने स्वीकारावे.

  4. “त्यांच्यापासून तू जी अर्पणे स्वीकारावी ती ही आहेत: “सोने, चांदी आणि कास्य;

  5. निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि रेशमी ताग, बोकडाचे केस;

  6. लाल रंगाने रंगविलेली मेंढ्याची कातडी व टिकाऊ चर्म; बाभळीचे लाकूड;

  7. दिव्यासाठी जैतुनाचे तेल; अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप यासाठी सुवासिक मसाले;

  8. एफोदाच्या ऊरस्त्राणावर चढविण्यासाठी गोमेद खडे व इतर रत्ने.

  9. “मग मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी, म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान बनवावे.

  10. हा निवासमंडप आणि त्याची रचना मी दाखवेन त्याप्रमाणेच असावी.

  11. तिथे, प्रायश्चिताच्या झाकणावर दोन करूब जे कोशावर ठेवलेले आहेत, त्यांच्यामध्ये मी तुला भेटेन आणि इस्राएल लोकांसाठी द्यावयाच्या सर्व आज्ञा मी तुला देईन.

  12. “निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाच्या दहा पडद्यांनी निवासमंडप तयार करावा, त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घ्यावे.

  13. सर्व पडद्यांची लांबी अठ्ठावीस हात व रुंदी चार हात असावी.

  14. पाच पडदे एकमेकांना जोडलेले असावेत व इतर पाच पडद्यांचेही तसेच करावे.

  15. जोडलेल्या पडद्यापैकी शेवटच्या पडद्यांच्या किनारीवर निळ्या रंगाच्या कापडाचे फासे बनवावे आणि दुसर्‍या पडद्यांच्या शेवटच्या पडद्यालाही तसेच करावे.

  16. एका पडद्याच्या किनारीला पन्नास फासे व दुसर्‍या पडद्याच्या किनारीपर्यंत पन्नास फासे करावे, हे फासे समोरासमोर असावेत.

  17. मग सोन्याचे पन्नास आकडे तयार करावेत आणि त्याचा उपयोग पडद्यांना एकत्र जोडण्यासाठी करावा की निवासमंडप अखंड होईल.

  18. “निवासमंडपावर आच्छादन करण्यासाठी बोकडाच्या केसाचे पडदे तयार करावेत; ते अकरा पडदे असावेत.

  19. सर्व अकरा पडदे एकाच मापाचे, म्हणजे लांबी तीस हात व रुंदी चार हात. असावी.

  20. पाच पडदे एकत्र व इतर सहा पडदे एकत्र असे जोडावेत. सहावा पडदा मंडपाच्या पुढील बाजूस दुमडावा.

  21. जोडलेल्या पडद्यांपैकी शेवटच्या पडद्याच्या किनारीवर शेवटपर्यंत पन्नास फासे करून तो एकजोड करावा आणि दुसर्‍या पडद्यापैकी किनारीवर देखील पन्नास फासे करून एकजोड करावा.

  22. मग कास्याचे पन्नास आकडे करावेत आणि ते फासात घालून असे जोडावे की तंबू एकजोड होईल.

  23. तंबूच्या पडद्याचा उरलेला भाग, म्हणजे जो अर्धा पडदा उरतो, तो निवासमंडपाच्या मागच्या बाजूस टांगलेला असू द्यावा.

  24. तंबूचे पडदे दोन्ही बाजूंनी एकएक हात अधिक लांब असावे; उरलेला पडदा निवासमंडपाला झाकेल असा लोंबत ठेवावा.

  25. तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे आच्छादन करावे आणि त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन करावे.