Skip to content

Tabernacle बद्दल बायबलमधील वचने

465 वचने · 94 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “अंगणाच्या पश्चिमेकडील बाजू पन्नास हात रुंदीची असावी व त्यासाठी पडदे, व दहा खांब व दहा बैठका असाव्या.

  2. सूर्योदयाकडील पूर्वेकडील अंगण सुद्धा पन्नास हात रुंद असावे.

  3. प्रवेशद्वाराच्या एका बाजूस पंधरा हात लांबीचा पडदा आणि तीन खांब व तीन बैठका असाव्या.

  4. आणि दुसर्‍या बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे, तीन खांब व तीन बैठका असाव्या.

  5. “अंगणाच्या प्रवेशद्वारासाठी, निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व रेशमी तागाचा, वीस हात लांबीचा पडदा असावा; त्यावर भरतकाम केलेले असावे; त्यात चार खांब व चार बैठका असाव्या.

  6. अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व खांबांना चांदीच्या पट्ट्या, कड्या व कास्याच्या बैठकी असाव्या.

  7. अंगणाची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात असावी व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पाच हात उंचीचे पडदे आणि कास्याच्या बैठकी असाव्या.

  8. निवासमंडपातील सेवेसाठी लागणारी सर्व पात्रे व उपकरणे, त्यांच्या मेखा व अंगणाच्या सर्व मेखा कास्याच्या असाव्यात.”

  9. सभामंडपातील जे पडदे कराराच्या कोशाला झाकतात त्याच्याबाहेर, अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी याहवेहसमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दिवे पेटत ठेवावे. इस्राएलात हा विधी पिढ्यान् पिढ्या असावा.”

  10. “हे होमार्पण येणार्‍या पिढ्यान् पिढ्या पर्यंत, याहवेहसाठी सभामंडपाच्या प्रवेशद्वारात नित्य करावे. तिथे मी तुला भेटेन व तुझ्याशी बोलेन.

  11. तिथे मी इस्राएली लोकांना देखील भेटेन आणि ते ठिकाण माझ्या तेजाने पवित्र होईल.

  12. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  13. “तू इस्राएली लोकांना मोजण्यासाठी त्यांची जनगणना करशील, तेव्हा प्रत्येकाने आपली मोजणी झाल्यावर आपल्या जिवासाठी याहवेहस खंडणी द्यावी, म्हणजे तू त्यांची मोजणी करीत असताना त्यांच्यावर कोणतीही पीडा येणार नाही.

  14. प्रत्येकजण ज्यांची मोजणी होईल, त्यांनी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार अर्धा शेकेल द्यावा, ज्याचे मोल वीस गेरे आहे. हा अर्धा शेकेल याहवेहसाठी अर्पण आहे.

  15. जे वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे आहेत त्या सर्वांनी याहवेहसाठी हे अर्पण द्यावे.

  16. जेव्हा आपल्या जिवासाठी खंडणी म्हणून तुम्ही याहवेहस अर्पण देता, तेव्हा श्रीमंताने अर्ध्या शेकेलापेक्षा अधिक देऊ नये व गरिबानेही कमी देऊ नये.

  17. इस्राएली लोकांकडून प्रायश्चिताचा पैसा घेऊन तो सभामंडपाच्या सेवेकरिता लावावा. तुमच्या जिवासाठी केलेले प्रायश्चित इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून राहील.”

  18. यातून पवित्र अभिषेकाचे तेल, सुगंधी द्रव्ये तयार करणार्‍याच्या कुशलतेप्रमाणे तयार करावे. ते पवित्र अभिषेकाचे तेल असेल.

  19. त्या तेलाचा उपयोग सभामंडप, कराराच्या नियमाचा कोश,

  20. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  21. “पाहा, मी यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे.

  22. व मी त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे—

  23. सोने, चांदी आणि कास्याचे कलाकौशल्य करण्यासाठी;

  24. आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करण्यासाठी.

  25. त्याचप्रमाणे, त्याला मदत करण्यासाठी दान गोत्रातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब याला मी नेमले आहे.