Skip to content

Tabernacle बद्दल बायबलमधील वचने

465 वचने · 94 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “जसे सभामंडप, कराराच्या नियमाचा कोश व त्यावरील प्रायश्चिताचे झाकण, आणि तंबूचे इतर सर्व साहित्य:

  2. मेज व त्यावरील सर्व सामान, शुद्ध सोन्याचा दीपस्तंभ व त्याची सर्व उपकरणे, व धूपवेदी,

  3. होमार्पणाची वेदी व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठक.

  4. तसेच विणलेली वस्त्रे, अहरोन याजकासाठी पवित्र वस्त्रे, व याजक म्हणून सेवा करतात तेव्हा त्याच्या पुत्रांसाठी वस्त्रे,

  5. अभिषेकाचे तेल व पवित्रस्थानासाठी सुगंधी धूप.

  6. आता छावणीबाहेर थोड्या दूर अंतरावर मोशे एक तंबू उभारीत असे, त्याला तो “सभामंडप असे म्हणे.” ज्याला याहवेहशी बोलायचे असेल तो छावणीबाहेर असलेल्या त्या सभामंडपाकडे जात असे.

  7. आणि जेव्हा मोशे बाहेर मंडपाकडे जाई, तेव्हा सर्व लोक आपआपल्या तंबूच्या दाराशी उठून उभे राहून मोशे मंडपामध्ये जाईपर्यंत त्याला पाहत असत.

  8. आणि जेव्हा मोशे मंडपामध्ये प्रवेश करी, तेव्हा याहवेह मोशेशी बोलेपर्यंत, मेघस्तंभ खाली उतरून मंडपाच्या दाराशी थांबत असे.

  9. जेव्हा लोक मेघस्तंभ मंडपाच्या दाराशी थांबलेला पाहत, ते सर्व आपआपल्या तंबूच्या दाराशी उभे राहून उपासना करीत असत.

  10. जसा एखादा व्यक्ती आपल्या मित्राशी बोलतो तसे याहवेह मोशेशी समोरासमोर बोलत असत. मग मोशे छावणीकडे परत जात असे, परंतु त्याचा तरुण सहकारी, नूनाचा पुत्र यहोशुआ हा मंडप सोडून जात नसे.

  11. मोशे सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “याहवेहने जे आज्ञापिले आहे ते हे:

  12. तुमच्याजवळ जे काही आहे, त्यातून याहवेहसाठी अर्पण घ्या. ज्या कोणास याहवेहसाठी अर्पण आणावे अशी इच्छा आहे, त्यांनी हे अर्पण आणावे: “सोने चांदी आणि कास्य,

  13. निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि रेशमी ताग; बोकडाचे केस;

  14. लाल रंगाने रंगविलेली मेंढ्याची कातडी व टिकाऊ चर्म; बाभळीचे लाकूड;

  15. दिव्यासाठी जैतुनाचे तेल; अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप यासाठी सुवासिक मसाले;

  16. एफोदाच्या ऊरस्त्राणावर चढविण्यासाठी गोमेद खडे व इतर रत्ने.

  17. “तुमच्यामध्ये जे सर्व कुशल कारागीर आहेत, त्यांनी येऊन जे सर्वकाही याहवेहने आज्ञापिले आहे ते तयार करावे:

  18. “निवासमंडप, त्याचा तंबू आणि त्याचे आच्छादन, आकडे, फळ्या, अडसर, खांब व बैठका;

  19. कोश व त्याचे दांडे आणि प्रायश्चिताचे झाकण व त्याचा पडदा;

  20. मेज व त्याचे दांडे आणि त्याचे सर्व सामान आणि समक्षतेची भाकर;

  21. प्रकाशासाठी दीपस्तंभ व त्याची सर्व उपकरणे, दिवे आणि प्रकाशासाठी तेल;

  22. धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप; निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी पडदा;

  23. होमार्पणाची वेदी, तिची कास्याची जाळी, तिचे दांडे व तिचे सर्व साहित्य; कास्याचे गंगाळ व त्याची बैठक;

  24. अंगणाचे पडदे, त्यांच्या खुंट्या व बैठका आणि अंगणाच्या दाराचा पडदा;

  25. निवासमंडप, त्याचे अंगण व त्यांच्या मेखा व त्यांच्या दोर्‍या;