Skip to content

Prayer बद्दल बायबलमधील वचने

720 वचने · 120 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तो दिवस अंधकार असा होवो; वर राहणाऱ्या परमेश्वरासही त्याचे ध्यान न राहो; त्या दिवसावर प्रकाश न पडो.

  2. होय, खिन्नता व संपूर्ण काळोख त्यावर पुन्हा आपला हक्क गाजवो; त्यावर ढग वास्तव्य करून राहो; काळोख त्यावर मात करो.

  3. त्या रात्रीला अंधकार जप्त करो; वर्षाच्या दिवसात त्याची गणती न होवो कोणत्याही महिन्यांमध्ये त्याची गणती न होवो.

  4. ती रात्र उजाड होवो; आणि आनंदाचा गजर त्यातून ऐकू न येवो.

  5. जे दिवसाला शाप देतात, जे लिव्याथानाला चेतविण्यास तयार असतात, ते त्याला शापित करोत.

  6. त्या रात्रीचे तारे अंधकारमय होवोत; दिवसाच्या प्रकाशाची ती व्यर्थ वाट पाहो आणि पहाटेचा पहिला किरण तिच्या दृष्टीस न पडो,

  7. कारण तिने माझ्यावर गर्भाशयद्वार बंद केले नाहीत आणि दुःखाला माझ्या डोळ्याआड केले नाही.

  8. जर मी पाप केले, तर ज्या तुमची नजर लोकांवर लागलेली असते, त्या तुमचे मी काय केले? माझ्यावर नेम धरावा म्हणून तुम्ही मला निशाणा करून का ठेवले आहे? मी तुम्हाला ओझे असे झालो आहे का?

  9. परंतु जर तू मनःपूर्वक परमेश्वराला शोधशील आणि सर्वसमर्थाकडे विनवणी करशील,

  10. जर तू शुद्ध व सरळ आहेस, आतासुद्धा ते तुझ्या वतीने उभे राहतील आणि तुला तुझ्या समृध्‍दीच्या स्थितीत पुनर्स्थापित करतील.

  11. “जर तू आपले हृदय परमेश्वराकडे लावशील आणि त्यांच्याकडे आपले हात पसरशील,

  12. “मी माझ्या मित्रांच्या चेष्टेचा विषय बनलो आहे, मी परमेश्वराचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले— नीतिमान आणि निर्दोष असूनही मी केवळ चेष्टेचा विषय झालो आहे!

  13. हा सर्वसमर्थ कोण आहे, की आम्ही त्यांची सेवा करावी? त्यांच्याकडे विनंती करून आम्हाला काय मिळणार?’

  14. तू त्यांच्याकडे प्रार्थना करशील आणि ते तुझे ऐकतील, आणि तुझे नवस तू फेडशील.

  15. “माझे शत्रू दुष्‍टांप्रमाणे, आणि माझे विरोधी अन्यायीप्रमाणे होवोत!

  16. मग तो व्यक्ती प्रार्थना करेल आणि परमेश्वराचा अनुग्रह त्याच्यावर होईल, ते परमेश्वराचे मुख पाहतील आणि आनंदाचा गजर करतील; आणि परमेश्वर त्यांना सुयश देऊन, त्यांची पुनर्स्थापना करतील.

  17. त्यांच्यामुळे गरिबांचे अश्रू परमेश्वरासमोर आले आहेत अशासाठी की गरजवंत लोकांचा आक्रांत ते ऐकतील.

  18. “मी अयोग्य आहे; मी तुम्हाला काय उत्तर देणार? मी माझा हात माझ्या मुखावर ठेवतो.

  19. मी एकदा बोललो, पण माझ्याकडे उत्तर नाही; दोनदा मी बोललो, पण मी पुन्हा बोलणार नाही.”

  20. मी याहवेहचा धावा करतो, आणि ते त्यांच्या पवित्र पर्वतांवरून मला उत्तर देतात. सेला

  21. संगीत दिग्दर्शकासाठी; तंतुवाद्यावरील दावीदाचे स्तोत्र. हे माझ्या नीतिमान परमेश्वरा, मी तुम्हाला हाक मारेन, तेव्हा मला उत्तर द्या. माझ्या संकटात तुम्हीच मला साहाय्य करा. माझ्यावर दया करा, माझी प्रार्थना ऐका.

  22. संगीत दिग्दर्शकासाठी; वाजंत्र्याच्या साथीने गावयाचे दावीदाचे स्तोत्र. याहवेह, माझ्या शब्दांकडे कान द्या, माझ्या विलापाकडे लक्ष द्या.

  23. हे माझ्या राजा, माझ्या परमेश्वरा, माझ्या रडण्याकडे कान द्या, कारण मी तुमच्याकडे प्रार्थना करतो.

  24. याहवेह, दररोज सकाळी तुम्ही माझी वाणी ऐकता; सकाळी मी माझ्या प्रार्थना तुम्हाला सादर करतो व अपेक्षेने तुमची वाट पाहतो.

  25. परमेश्वर, त्यांना दोषी घोषित करा! त्यांच्या कारस्थानामुळेच त्यांचे पतन होवो. त्यांच्या अनेक अपराधांमुळे त्यांना तुमच्यापासून दूर घालवून द्या, कारण त्यांनी तुमच्याविरुद्ध बंड केले आहे.