Prayer बद्दल बायबलमधील वचने: Praying daily in the morning
Praying daily in the morning बद्दल वचने
याहवेह, दररोज सकाळी तुम्ही माझी वाणी ऐकता; सकाळी मी माझ्या प्रार्थना तुम्हाला सादर करतो व अपेक्षेने तुमची वाट पाहतो.
परंतु हे याहवेह, मी तुमचा धावा करतो; माझी प्रार्थना दररोज प्रातःकाळी तुमच्यापुढे सादर होवो.
प्रातःकाळी तुमच्या वात्सल्याचा मला प्रेमसंदेश येऊ द्या, कारण मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. माझे जीवन मी तुमच्या हातात सोपविले आहे, म्हणून मी कोणत्या मार्गाने चालावे ते मला दाखवा.
हे याहवेह, आम्हावर कृपा करा; आम्ही तुमची आस धरलेली आहे. रोज सकाळी तुम्ही आमचे सामर्थ्य व्हा, संकटाच्या वेळी आमचे तारण व्हा.