मुख्य मजकुरावर जा

Prayer बद्दल बायबलमधील वचने: Unclassified scriptures relating to prayer

65 वचने · 120 पैलू

"Prayer" साठी शोधा

Unclassified scriptures relating to prayer बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तिथे याकोब एकटाच होता. त्याचवेळी कोणा पुरुषाने सूर्योदय होईपर्यंत त्याच्याशी झोंबी केली.

  2. याकोबावर जय मिळणे शक्य नाही, असे पाहून त्या पुरुषाने याकोबाच्या जांघेवर प्रहार केला आणि तो सांधा त्याने उखडून टाकला.

  3. मग तो याकोबाला म्हणाला, “मला आता जाऊ दे, कारण पहाट होत आहे.” पण याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ देणार नाही.”

  4. मग त्याने याकोबास विचारले, “तुझे नाव काय आहे?” तेव्हा त्याने उत्तर दिले, “याकोब.”

  5. यावर तो मनुष्य म्हणाला, “आता तुझे नाव याकोब राहणार नाही, तर ‘इस्राएल’ असे पडेल; कारण तू परमेश्वराशी व मनुष्याशीही संघर्ष करून यशस्वी झाला.”

  6. याहवेह व त्यांच्या सामर्थ्याकडे पाहा; सतत त्यांचे मुख शोधा.

  7. यांचा धावा करून म्हणा, हे आमच्या परमेश्वरा, आमचे तारण करा; परमेश्वरा, आम्हाला या देशातून सोडवून एकत्र करा, जेणेकरून आम्ही तुमचे पवित्र नाव धन्यवादित करून, तुमच्या स्तवनात गौरव मानावे.

  8. जर माझे लोक, ज्यांना माझ्या नावाने ओळखले जाते, ते जर स्वतःला नम्र करतील आणि प्रार्थना करतील, माझा शोध घेतील आणि त्यांच्या वाईट मार्गांपासून फिरतील, तेव्हा मी स्वर्गातून ऐकेन आणि त्यांच्या पापांची क्षमा करेन आणि त्यांच्या भूमीला आरोग्य देईन.

  9. पण आम्ही आमच्या परमेश्वराची प्रार्थना केली आणि आपले संरक्षण करण्यासाठी शहरावर रात्रंदिवस पहारा ठेवला.

  10. तुमच्याविषयी माझे अंतःकरण म्हणाले, “त्यांचे मुख शोध!” हे याहवेह, मी तुमचे मुख शोधेन.

  11. त्यांच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; जे याहवेहचा शोध करतात, त्यांचे हृदय हर्षित होवो.

  12. याहवेह व त्यांच्या सामर्थ्याकडे पाहा; सतत त्यांचे मुख शोधा.

  13. जे त्यांचा धावा करतात, जे खरोखर मनापासून त्यांचा धावा करतात, त्यासर्वांच्या समीप याहवेह असतात.

  14. याहवेहना दुष्टांच्या अर्पणाचा वीट आहे, पण सात्विक लोकांची प्रार्थना त्यांना आनंद देते.

  15. बोलण्यात उतावळा असू नको, परमेश्वरासमोर काहीही उच्चारण्यास आपल्या मनात घाई करू नकोस. कारण परमेश्वर स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस, म्हणून तुझे शब्द थोडकेच असू दे.

  16. याहवेहच्या प्राप्तीचा काळ आहे, तेव्हा पर्यंतच त्यांचा शोध घ्या. ते समीप आहेत, तेव्हा पर्यंतच त्यांचा धावा करा.

  17. आपण स्वर्गातील परमेश्वराकडे आपले अंतःकरण आणि आपले हात उंच करू व म्हणू:

  18. तो स्वर्गदूताशी झगडला आणि त्याच्यावर विजयी झाला; तो रडला आणि त्याची मेहेरबानी व्हावी म्हणून त्याने भीक मागितली. बेथेलला ते त्याला भेटले आणि तिथे तो त्यांच्याशी बोलला—

  19. “मग मी दावीदाच्या घराण्यावर व यरुशलेमच्या सर्व रहिवाशांवर कृपेचा आणि विनंतीचा आत्मा ओतेन आणि ज्याला त्यांनी भोसकले त्या माझ्याकडे ते पाहतील आणि एकुलत्या एका पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी शोक करतील आणि प्रथम पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी विलाप करतील.

  20. “तुम्ही प्रार्थना करताना ढोंग्यासारखे होऊ नका, रस्त्यांच्या कोपर्‍यात किंवा सभागृहांमध्ये उभे राहून, दुसर्‍यांना दिसावे म्हणून प्रार्थना करण्यास त्यांना आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.

  21. तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा आपल्या खोलीत जा, दार बंद करा आणि मग तुमच्या अदृश्य पित्याची प्रार्थना करा. तुम्ही गुप्त प्रकारे केलेली प्रार्थना तुमचा पिता ऐकेल, तेव्हा ते तुम्हाला प्रतिफळ देतील.

  22. आणि तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा गैरयहूदी लोकांप्रमाणे निरर्थक बडबड करू नका, त्यांच्या पुष्कळ बोलण्यामुळे त्यांचे म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते.

  23. त्यांच्यासारखे होऊ नका, तुम्ही मागण्यापूर्वीच तुम्हाला कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला माहीत असते.

  24. “तर, तुम्ही याप्रमाणे प्रार्थना करीत जा: “ ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुमचे नाव पवित्र मानिले जावो,

  25. तुमचे राज्य येवो, जशी स्वर्गात तशीच पृथ्वीवरही, तुमची इच्छा पूर्ण होवो.