Skip to content

Prayer बद्दल बायबलमधील वचने: Imprecatory prayers

114 वचने · 120 पैलू

Imprecatory prayers बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग मोशे खूप संतापला आणि याहवेहला म्हणाला, “त्यांच्या अर्पणांचा स्वीकार करू नका. त्यांच्या एका गाढवाची देखील मी चोरी केली नाही आणि त्यांच्यातील एकालाही दुखविले नाही.”

  2. तर आता ये आणि या लोकांना शाप दे, कारण ते माझ्यासाठी खूप प्रबळ आहेत. मग कदाचित मी त्यांचा पराभव करून त्यांना देशातून हाकलून देऊ शकेन. कारण मला माहीत आहे की ज्या कोणाला तू आशीर्वाद देतोस ते आशीर्वादित होतात आणि ज्या कोणाला तू शाप देतोस ते शापित होतात.”

  3. मोआबी व मिद्यानी वडील, शकुन पाहण्यासाठी मोबदला घेऊन निघाले. जेव्हा ते बलामाकडे आले, तेव्हा बालाक जे काही म्हणाला ते त्याला सांगितले.

  4. बलाम त्यांना म्हणाला, “आज रात्री येथे मुक्काम करा आणि याहवेह मला जे काही सांगतील ते मी तुम्हाला कळवेन.” म्हणून मोआबी सरदार त्याच्याकडे राहिले.

  5. परमेश्वराने बलामाकडे येऊन त्याला विचारले, “तुझ्याबरोबर हे पुरुष कोण आहेत?”

  6. बलाम परमेश्वराला म्हणाला, “सिप्पोरचा पुत्र बालाक, मोआबाच्या राजाने मला हा संदेश पाठवला आहे:

  7. ‘इजिप्तमधून काही लोक बाहेर आले आहेत; व त्यांनी पृथ्वी व्यापून टाकली आहे. तर आता ये आणि माझ्यासाठी त्यांना शाप दे. कदाचित मी त्यांचा पराभव करून त्यांना देशातून हाकलून देऊ शकेल.’ ”

  8. तेव्हा बलामाने आपला संदेश सांगितला: “बालाकाने मला अरामाहून आणले, मोआबाच्या राजाने पूर्वेकडील डोंगरातून मला आणले. तो म्हणाला, ‘ये, माझ्यासाठी याकोबाला शाप दे; ये, इस्राएलाचा धिक्कार कर.’

  9. ज्यांना परमेश्वराने शाप दिला नाही, त्यांना मी शाप कसा देऊ? ज्यांचा तिरस्कार याहवेहने केला नाही; त्यांचा तिरस्कार मी कसा करू?

  10. सिंहाप्रमाणे ते दबा धरून निपचित पडून राहतात, सिंहिणीप्रमाणे ते पडून राहतात—त्यांना उठविण्याचे धाडस कोण करणार? “जे तुम्हाला आशीर्वाद देतात ते आशीर्वादित होतील आणि जे तुम्हाला शाप देतात ते शापित असो!”

  11. तेव्हा बलामाविरुद्ध बालाकाचा राग पेटला. त्याने आपले हात एकत्र आपटले व त्याला म्हणाला, “माझ्या शत्रूंना शाप द्यावा म्हणून मी तुला बोलाविले, पण या तीन वेळा तू त्यांना आशीर्वादच दिलास.

  12. याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जेव्हा या देशाचा ताबा घेण्यासाठी आणतील, तेव्हा तुम्ही गरिज्जीम डोंगरावरून आशीर्वाद आणि एबाल डोंगरावरून शाप उच्चारावा.

  13. तुम्ही जाणता, हे डोंगर यार्देन नदीच्या पश्चिमेला असलेल्या कनानी लोकांच्या देशात आहेत. कनानी लोक जे अराबात गिलगाल या शहराजवळ असलेल्या ओसाड भागात राहतात. हे ठिकाण मोरेहच्या जवळील एला वृक्षांच्या राईपासून दूर नाही.

  14. त्याच दिवशी मोशेने लोकांना आज्ञापिले:

  15. तुम्ही यार्देन नदी पार करून जाल, तेव्हा शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार, योसेफ व बिन्यामीनच्या गोत्रांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम पर्वतावर उभे राहावे.

  16. आणि रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफताली यांच्या गोत्रांनी शापवचने उच्चारण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.

  17. हे याहवेह, त्यांचे सर्व कौशल्य आशीर्वादित करा, आणि त्यांची हस्तकृती तुम्हाला प्रसन्न करो. त्यांच्याविरुद्ध जे उठतात त्यांना चिरडून टाका, आणि ते पुन्हा उठणार नाहीत, असे करा.”

  18. सर्व इस्राएली लोक, त्यांच्या वडीलजनांसह, अधिकारी आणि न्यायाधीश हे सर्व याहवेहच्या कराराच्या कोशाच्या दोन्ही बाजूंना उभे होते, ज्या लेवीय याजकांनी तो वाहून आणला त्यांच्यासमोर ते होते. त्यांच्यामध्ये राहणारे परदेशी आणि तिथे जन्मलेले लोक तिथे होते. जशी आज्ञा याहवेहचा सेवक मोशेने पूर्वी दिली होती, त्याप्रमाणे अर्धे लोक गरिज्जीम पर्वतासमोर आणि अर्धे लोक एबाल पर्वतासमोर उभे राहिले, इस्राएली लोकांना आशीर्वाद देण्यासाठी त्याने या सूचना दिल्या होत्या.

  19. मग यहोशुआने त्या सर्व लोकांस नियमशास्त्राच्या पुस्तकात जशी लिहिलेली होती तशीच आशीर्वादांची आणि शापांची वचने वाचून दाखविली.

  20. मग शमशोनाने याहवेहला प्रार्थना केली, अहो, सार्वभौम याहवेह माझी आठवण करा. परमेश्वरा कृपा करून आणखी एकदाच मला बळ द्या आणि म्हणजे या पलिष्ट्यांचा मी माझ्या दोन्ही डोळ्यांबद्दल सूड घेऊ शकेन.

  21. परंतु राजा म्हणाला, “अहो जेरुइयाहच्या पुत्रांनो, तुम्हाला याचे काय? याहवेहनेच जर त्याला सांगितले असले, ‘दावीदाला शाप दे,’ तर ‘तू असे का करतोस,’ असे त्याला कोणी विचारावे?”

  22. तेव्हा दावीद अबीशाई व त्याच्या सर्व अधिकार्‍यांना म्हणाला, “माझा पुत्र, माझे स्वतःचे रक्त-मांस मला मारून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, तर हा बिन्यामीन किती अधिक करेल! त्याला जाऊ द्या; व शाप देऊ द्या, कारण याहवेहने त्याला तसे करण्यास सांगितले आहे.

  23. मला होत असलेल्या त्रासाकडे कदाचित याहवेह पाहतील आणि या शापाऐवजी मी गमावलेला त्यांच्या कराराचा आशीर्वाद मला मिळवून देतील.”

  24. आमच्या परमेश्वरा, आमचे ऐका, कारण आमचा उपहास होत आहे. त्यांची थट्टा त्यांच्याच शिरी उलटो आणि एखाद्या परकीय देशात बंदिवान म्हणून त्यांची लूट होऊ द्या.

  25. त्यांच्या अपराधांकडे डोळेझाक करू नका; त्यांचे पाप पुसून टाकू नका, कारण बांधणार्‍यांना त्यांनी अपमानित केले आहे.