Skip to content

Prayer बद्दल बायबलमधील वचने: Confession in prayer

60 वचने · 120 पैलू

Confession in prayer बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जर कोणाला याची जाणीव होते की ते यापैकी कोणत्याही बाबतीत दोषी आहेत, तर त्याने जे पातक केले ते पातक कबूल करावे,

  2. “ ‘परंतु जर ते आपल्या पापांची व आपल्या वाडवडिलांच्या पापांची—त्यांच्या अविश्वासूपणाची आणि माझ्याविरुद्ध चालण्याची कबुली देतील,

  3. याहवेह मोशेला म्हणाले,

  4. “इस्राएली लोकांस सांग, ‘जेव्हा कोणी पुरुष किंवा स्त्री एखाद्याविरुद्ध कोणताही अपराध करेल, तो याहवेहच्या विरुद्ध विश्वासघात असून तो दोषी आहे.

  5. त्यांनी केलेले पाप कबूल करावे. त्यांनी केलेल्या पापाची पूर्ण भरपाई करून द्यावी, त्यात त्याचा पाचवा भाग मिळवून ज्या व्यक्तीविरुद्ध पाप केला आहे त्याला द्यावा.

  6. तेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहला आरोळी मारली, “आम्ही आमच्या परमेश्वराचा त्याग केला आणि बआलची सेवा करून तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.”

  7. परंतु इस्राएली लोकांनी याहवेहला म्हटले, “आम्ही पाप केले आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, पण आता आम्हाला सोडवा.”

  8. तेव्हा त्यांनी रडून याहवेहचा धावा करीत ते म्हणाले, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही याहवेहचा त्याग केला आहे आणि बआल व अष्टारोथ यांची सेवा केली आहे. परंतु आता आमच्या शत्रूंच्या हातातून आमची सुटका करा आणि आम्ही तुमची सेवा करू,’

  9. आणि ते कैदेत असता त्यांच्या हृदयाचा पालट झाला व पश्चात्ताप करीत कैद करून नेलेल्यांच्या देशात आपल्याकडे असे म्हणत विनंती केली, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही विपरीत वागलो आहोत, आम्ही दुष्टतेने वागलो आहोत’;

  10. आणि त्यांचा धावा करून म्हटले: “हे माझ्या परमेश्वरा, माझे मुख तुमच्याकडे वर करण्याची मला खरोखरच लाज व कलंकित झाल्यागत वाटते. आमच्या पातकांची रास आता आमच्या डोक्यावरून गेली आहे, कारण आमचे अपराध आकाशापर्यंत अमर्यादित झाले आहेत.

  11. हे याहवेह, इस्राएलांच्या परमेश्वरा, तुम्ही नीतिमान आहात! आता आम्ही अवशेष असे उरलो आहोत. तुमच्या दृष्टीने आम्ही दोषी आहोत आणि आमच्या दोषांमुळेच तुमच्या समक्षतेत उभे राहणे आम्हांपैकी कोणालाही शक्य नाही.”

  12. तुमचे कान माझ्या बोलण्याकडे लागो व तुमची दृष्टी तुमचा सेवक इस्राएली लोकांसाठी रात्रंदिवस करीत असलेल्या प्रार्थनेकडे वळो. आम्ही इस्राएली लोकांनी, मी व माझ्या पित्याच्या कुटुंबाने तुमच्याविरुद्ध घोर पाप केले आहे, हे मी कबूल करतो.

  13. आम्ही तुमच्याविरुद्ध दुष्टतेचे आचरण केले आहे. तुम्ही तुमचा सेवक मोशेद्वारे आम्हाला दिलेल्या आज्ञा, नियम व आदेश पाळले नाही.

  14. ज्या इस्राएली वंशजांनी स्वतःला सर्व गैरयहूद्यांपासून वेगळे ठेवले, ते आपआपल्या जागेवर उभे राहिले व त्यांनी स्वतःची आणि आपल्या पूर्वजांची पापे कबूल केली.

  15. जे सर्वकाही आमच्याबाबत घडले, त्यात तुमची विश्वासार्हता कायम होती; तुमची वागणूक विश्वासयोग्य होती, पण आम्ही मात्र दुष्टपणे वागलो.

  16. आमचे राजे, आमचे अधिकारी, आमचे याजक आणि आमचे पूर्वज यांनी तुमचे नियम पाळले नाहीत किंवा तुमच्या आज्ञा व आदेश पाळण्याच्या ताकिदीकडे लक्ष दिले नाही.

  17. ते स्वतः राज्य करीत असताना, त्यांनी विशाल व सुपीक देशात तुमच्या थोर चांगुलपणाचा उपभोग घेतला. तरी देखील त्यांनी तुमची भक्ती केली नाही वा दुष्टपणापासून मागे वळले नाही.

  18. जर मी पाप केले, तर ज्या तुमची नजर लोकांवर लागलेली असते, त्या तुमचे मी काय केले? माझ्यावर नेम धरावा म्हणून तुम्ही मला निशाणा करून का ठेवले आहे? मी तुम्हाला ओझे असे झालो आहे का?

  19. “मी अयोग्य आहे; मी तुम्हाला काय उत्तर देणार? मी माझा हात माझ्या मुखावर ठेवतो.

  20. मी एकदा बोललो, पण माझ्याकडे उत्तर नाही; दोनदा मी बोललो, पण मी पुन्हा बोलणार नाही.”

  21. दुःखामुळे माझे आयुष्य व कण्हण्यामुळे माझी वर्षे कमी होत आहेत; पापांनी माझी शक्ती शोषून घेतली आहे; माझी हाडे झिजून गेली आहेत.

  22. मी गप्प राहिलो, तेव्हा संपूर्ण दिवस माझी हाडे माझ्या कण्हण्यामुळे जर्जर झाली.

  23. नंतर मी माझी सर्व पातके तुमच्याजवळ कबूल केली आणि माझे अपराध लपविले नाही. मी स्वतःशी म्हणालो, “मी याहवेहजवळ माझी पातके कबूल करेन.” तेव्हा तुम्ही माझ्या पातकांच्या दोषाची क्षमा केली. सेला

  24. माझे दोष इतके भारी आहेत की ते वाहून नेणे अशक्य आहे.

  25. माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे, माझ्या जखमा सडून त्यास दुर्गंधी सुटली आहे.