Prayer बद्दल बायबलमधील वचने: With desire to be answered
With desire to be answered बद्दल वचने
याहवेह, माझी याचना ऐका; माझ्यावर दया करा आणि मला उत्तर द्या.
मी संकटसमयात असता तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका. जेव्हा मी तुमचा धावा करेन तेव्हा मला त्वरेने उत्तर द्या; तुमचे कान माझ्याकडे लावा.
आम्हाला वाचवा आणि तुमच्या उजव्या हाताने मदत करा, म्हणजे तुम्ही ज्यांच्यावर प्रीती करता त्यांचे तारण होईल.
दावीदाचे एक स्तोत्र. हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका, कृपा करून माझ्या विनवणीकडे लक्ष द्या, तुमच्या विश्वासूपणा व नीतिमत्वास अनुसरून माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर द्या.