Skip to content

Prayer बद्दल बायबलमधील वचने: Answer to prayer, delayed

8 वचने · 120 पैलू

Answer to prayer, delayed बद्दल वचने

  1. संगीत दिग्दर्शकासाठी. “पहाटेची हरिणी” या रागावर बसविलेले दावीदाचे स्तोत्र. माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला? मला वाचविण्यास तुम्ही एवढे दूर का राहिले, माझ्या विव्हळण्याची आरोळी तुम्हापासून दूर का?

  2. माझ्या परमेश्वरा, मी दिवसा तुम्हाला हाक मारतो, परंतु तुम्ही उत्तर देत नाही, रात्री पण मला कोणताही विसावा नाही.

  3. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. मी धीराने याहवेहची वाट पाहिली; तेव्हा त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले आणि माझी आरोळी ऐकली.

  4. हे याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुमच्या प्रजेच्या प्रार्थनांविरुद्ध, कुठवर तुमचा क्रोध भडकत राहणार?

  5. हे याहवेह, तुम्ही माझा त्याग का केला, आणि आपले मुख माझ्यापासून का फिरविले?

  6. दहा दिवसांनी यिर्मयाहला याहवेहचे वचन आले.

  7. हे याहवेह, मी कुठवर तुमचा धावा करावा? पण तुम्ही ऐकत नाहीत? मी तुम्हाला ओरडून हाक मारतो, “हिंसा!” पण तुम्ही वाचवित नाहीत.

  8. तर परमेश्वराचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्यांना विनवण्या करतात, त्या लोकांना ते न्याय देणार नाहीत काय? ते त्यांच्यासंबंधी उशीर करतील काय?