Prayer बद्दल बायबलमधील वचने: With desire to be heard
With desire to be heard बद्दल वचने
तुमचे कान माझ्या बोलण्याकडे लागो व तुमची दृष्टी तुमचा सेवक इस्राएली लोकांसाठी रात्रंदिवस करीत असलेल्या प्रार्थनेकडे वळो. आम्ही इस्राएली लोकांनी, मी व माझ्या पित्याच्या कुटुंबाने तुमच्याविरुद्ध घोर पाप केले आहे, हे मी कबूल करतो.
दावीदाची एक प्रार्थना. याहवेह, ऐका माझी विनंती न्यायपूर्ण आहे, माझ्या आरोळीकडे लक्ष द्या. माझी प्रार्थना ऐका, जी कपटी ओठातून येत नाही.
संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने गायचे दावीदाचे मासकील. हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका; माझ्या विनवणीकडे दुर्लक्ष करू नका.
माझे ऐका आणि मला उत्तर द्या; माझ्या विचारांनी मी त्रस्त आणि व्याकूळ झालो आहे.
संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्याच्या साथीने गायचे दावीदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझा धावा ऐका, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष द्या.