Skip to content

Prayer बद्दल बायबलमधील वचने: Answered

58 वचने · 120 पैलू

Answered बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांच्यामुळे गरिबांचे अश्रू परमेश्वरासमोर आले आहेत अशासाठी की गरजवंत लोकांचा आक्रांत ते ऐकतील.

  2. मी याहवेहचा धावा करतो, आणि ते त्यांच्या पवित्र पर्वतांवरून मला उत्तर देतात. सेला

  3. संगीत दिग्दर्शकासाठी; तंतुवाद्यावरील दावीदाचे स्तोत्र. हे माझ्या नीतिमान परमेश्वरा, मी तुम्हाला हाक मारेन, तेव्हा मला उत्तर द्या. माझ्या संकटात तुम्हीच मला साहाय्य करा. माझ्यावर दया करा, माझी प्रार्थना ऐका.

  4. दुष्टाई करणार्‍यांनो, येथून चालते व्हा, कारण याहवेहनी माझे रडणे ऐकले आहे.

  5. याहवेहनी माझ्या दयेची याचना ऐकली आहे; याहवेह माझ्या प्रार्थना स्वीकार करतील.

  6. मी आपल्या संकटात याहवेहचा धावा केला; परमेश्वराकडे मदतीसाठी मी हाक मारली. त्यांनी आपल्या मंदिरातून माझी आरोळी ऐकली; माझा धावा त्यांच्या कानांपर्यंत पोहोचला.

  7. कारण त्याचे मनोरथ तुम्ही पूर्ण केले आहेत; त्याने मागितलेली एकही गोष्ट तुम्ही अमान्य केली नाही. सेला

  8. त्याने तुमच्याजवळ जीवनाची मागणी केली— तुम्ही त्याला युगानुयुगाचे आयुष्य दिले.

  9. तुमच्यावर आमच्या पूर्वजांनी भरवसा ठेवला; तुमच्यावर त्यांनी भरवसा ठेवला आणि तुम्ही त्यांना सोडविले.

  10. त्यांनी तुमचा धावा केला आणि तुम्ही त्यांना वाचविले; तुमच्यावरील विश्वासाने त्यांना लज्जित होऊ दिले नाही.

  11. कारण त्यांनी दुःखितांचे दुःख, तुच्छ जाणले नाही किंवा त्यांचा तिरस्कार केला नाही; त्यांनी आपले मुख त्यांच्यापासून फिरविले नाही परंतु त्यांचा मदतीचा धावा त्यांनी ऐकला.

  12. याहवेहची स्तुती करा, कारण त्यांनी माझी दयेची आरोळी ऐकली आहे.

  13. हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला साहाय्यासाठी विनवणी केली आणि तुम्ही मला रोगमुक्त केले.

  14. याहवेह तुम्ही मला अधोलोकातून बाहेर काढले; तुम्ही मला गर्तेत जाण्यापासून वाचविले.

  15. माझ्या उतावळेपणात मी म्हटले, “मला तुमच्या दृष्टीपुढून काढून टाकले आहे!” तरीही जेव्हा मी साहाय्यासाठी तुम्हाला हाक मारली तेव्हा माझी दयेची विनवणी तुम्ही ऐकली.

  16. कारण मी याहवेहचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले; त्यांनी मला माझ्या सर्व भयांपासून सोडविले.

  17. जे त्यांच्याकडे पाहतात ते तेजस्वी होतात; त्यांचे मुख कधीही लज्जास्पद स्थितीत राहत नाही.

  18. या पामराने याहवेहचा धावा केला आणि त्यांनी तो ऐकला; त्याच्या सर्व संकटातून त्यांनी त्याला सोडविले.

  19. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. मी धीराने याहवेहची वाट पाहिली; तेव्हा त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले आणि माझी आरोळी ऐकली.

  20. परंतु परमेश्वराने ते ऐकले, त्यांनी माझ्या प्रार्थनेच्या विनंतीकडे लक्ष दिले आहे.

  21. परमेश्वराचा धन्यवाद असो, त्यांनी माझी प्रार्थना अस्वीकार केली नाही, आणि माझ्यावर प्रीती करण्याचे नाकारले नाही.

  22. संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथूनसाठी. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत. मी परमेश्वराकडे मदतीसाठी धावा केला; परमेश्वराने माझे ऐकावे म्हणून मी त्यांचा धावा केला.

  23. माझ्या संकटाच्या वेळी मी प्रभूला हाक मारली; रात्रीच्या वेळी न थकता मी त्यांच्याकडे हात पुढे करत राहिलो, तरीही माझे सांत्वन झाले नाही.

  24. तू संकटाच्या वेळी माझा धावा केलास आणि मी तुला सोडविले; मेघगर्जनेतून मी तुला उत्तर दिले; मरीबाह येथे मी तुझ्या विश्वासाची परीक्षा पाहिली. सेला

  25. मोशे आणि अहरोन त्यांचे याजक होते, व शमुवेल त्यांचा उपासक, त्यांचा धावा करणार्‍यांपैकी होते; यांनी याहवेहचा धावा केला, आणि त्यांनी त्यांना उत्तर दिले.