Skip to content

Prayer बद्दल बायबलमधील वचने

720 वचने · 120 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आपण न डगमगता आपल्या आशेचा भरवसा दृढ धरू; कारण ज्यांनी वचन दिले ते विश्वसनीय आहेत.

  2. विश्वासाशिवाय परमेश्वराला संतुष्ट करणे अशक्य आहे, ज्या कोणाला परमेश्वराकडे यावयाचे असेल, त्याने परमेश्वर आहे असा विश्वास धरला पाहिजे व त्यांचा मनापासून शोध घेणार्‍यांना ते प्रतिफळ देतात.

  3. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल, तर तुम्ही परमेश्वराला मागा आणि ते तुम्हास दिले जाईल, कारण ते कोणाचेही दोष न काढता सर्वांस उदारतेने देतात.

  4. परंतु जेव्हा तुम्ही मागता, तेव्हा संशय न बाळगता विश्वासाने मागावे, कारण जो संशय धरतो तो वार्‍याने लोटलेल्या व हेलकावे खाणार्‍या समुद्राच्या लाटेसारखा आहे.

  5. अशा व्यक्तीने आपल्याला प्रभूपासून काही मिळेल अशी आशा अजिबात धरू नये.

  6. तुम्ही परमेश्वराजवळ या म्हणजे ते तुम्हाजवळ येतील. अहो पाप्यांनो, आपले हात धुवा आणि दुहेरी मनाचे जे आहेत त्यांनी आपली अंतःकरणे शुद्ध करावीत.

  7. प्रभूसमोर तुम्ही स्वतःला नम्र करा आणि ते तुम्हाला उंच करतील.

  8. तुम्हापैकी कोणी त्रासात आहे काय? त्यांनी प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्यांनी स्तुतिस्तोत्रे गावीत.

  9. यास्तव एकमेकांजवळ आपली पापे कबूल करा व एकमेकांसाठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही निरोगी व्हाल. नीतिमान माणसाची प्रार्थना प्रबळ व परिणामकारक असते.

  10. एलीयाह अगदी आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. त्याने पाऊस पडू नये अशी कळकळीने प्रार्थना केली आणि साडेतीन वर्षे भूमीवर पाऊस पडला नाही.

  11. मग त्याने पुन्हा प्रार्थना केली, तेव्हा आकाशातून पाऊस पडला आणि पृथ्वीने आपला उपज दिला.

  12. पतींनो, त्याच प्रकारे तुम्ही आपल्या पत्नीबरोबर राहत असताना त्या नाजूक आहेत म्हणून सुज्ञतेने राहा, तुमच्याबरोबर त्यादेखील कृपेच्या जीवनाच्या देणग्यांच्या वतनदार आहेत, म्हणून त्यांना मान द्या म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही.

  13. सर्व गोष्टींचा अंतकाळ जवळ आला आहे म्हणून सावध आणि विचारशील असा, म्हणजे तुम्हाला प्रार्थना करता येईल.

  14. आणि आपण जे काही मागतो ते त्यांच्याकडून मिळते, कारण आपण त्यांच्या आज्ञा पाळतो आणि त्याला आवडणार्‍या गोष्टी करतो.

  15. आपल्याला परमेश्वराच्या समक्षतेत येण्यासाठी आत्मविश्वास आहे, कारण आपण त्यांच्या इच्छेनुसार काही मागितले तर ते आमचे ऐकतात.

  16. जे आपण मागतो ते ऐकतात आणि आपल्याला माहीत आहे की जे आपण त्यांना मागितले आहे ते आपणास मिळाले आहे.

  17. परंतु तुम्ही, प्रिय मित्रांनो, स्वतःला परमपवित्र विश्वासाच्या पायावर बांधा आणि पवित्र आत्म्याद्वारे प्रार्थना करा.

  18. कोकर्‍याने ती गुंडाळी घेतली, तेव्हा त्या चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजनांनी कोकर्‍याच्या पुढे दंडवत केले. त्या प्रत्येकाजवळ एकएक वीणा आणि धूपद्रव्याने भरलेले सोन्याचे धूपपात्र होते. यातील धूप म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना आहेत.

  19. नंतर दुसरा एक देवदूत, सोन्याची एक धूपदाणी घेऊन आला व वेदीजवळ उभा राहिला. त्याला राजासनासमोरील सोन्याच्या वेदीवर अर्पण करण्यासाठी परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांच्या प्रार्थना मिश्रित बराच धूप देण्यात आला होता.

  20. त्या देवदूताच्या हातातून प्रार्थना मिश्रित धूपाचा सुगंध परमेश्वरासमोर वर चढला.