Skip to content

Prayer बद्दल बायबलमधील वचने

720 वचने · 120 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दुष्टाई करणार्‍यांनो, येथून चालते व्हा, कारण याहवेहनी माझे रडणे ऐकले आहे.

  2. याहवेहनी माझ्या दयेची याचना ऐकली आहे; याहवेह माझ्या प्रार्थना स्वीकार करतील.

  3. माझे सर्व शत्रू भय आणि लज्जा पावतील; ते मागे फिरतील आणि तत्काळ लज्जित होतील.

  4. ज्यांना तुमचे नाव ठाऊक आहे, ते तुमच्यावर भरवसा ठेवतात, कारण हे याहवेह, जे तुमचा धावा करतात त्यांना तुम्ही कधीही टाकत नाही.

  5. जे रक्तपाताचा सूड घेतात, ते आठवण ठेवतात; दीनांच्या आक्रोशाकडे ते दुर्लक्ष करीत नाही.

  6. याहवेह, उठा, नाशवंत मानवाला विजयी होऊ देऊ नका; राष्ट्रांचा न्याय तुमच्यासमोर होऊ द्या.

  7. याहवेह, त्यांच्यावर भयाचा प्रहार करा; आपण केवळ नाशवंत आहोत याची राष्ट्रांना जाणीव होऊ द्या. सेला

  8. दुष्ट मनुष्य आपल्या उद्धटपणात दुर्बलांचा छळ करतो, त्याने योजलेल्या दुष्ट योजनांमध्ये असहाय अडकले जातात.

  9. त्या दुष्टाचे भुजबळ मोडून टाका; त्याच्या दुष्टपणाचा असा हिशोब घ्या, की त्याची दुष्टता शोधून सापडणार नाही.

  10. याहवेह, नम्र लोकांच्या इच्छा तुम्ही जाणता; त्यांचा आक्रोश ऐकून तुम्ही त्यांचे सांत्वन करा.

  11. दावीदाची एक प्रार्थना. याहवेह, ऐका माझी विनंती न्यायपूर्ण आहे, माझ्या आरोळीकडे लक्ष द्या. माझी प्रार्थना ऐका, जी कपटी ओठातून येत नाही.

  12. मी तुम्हालाच हाक मारली आहे, कारण परमेश्वरा तुम्ही मला उत्तर द्याल; माझ्या विनंतीकडे कान देऊन माझी प्रार्थना ऐका.

  13. स्तुतीस योग्य याहवेहचा मी धावा केला, आणि माझ्या शत्रूपासून माझी सुटका झाली.

  14. मी आपल्या संकटात याहवेहचा धावा केला; परमेश्वराकडे मदतीसाठी मी हाक मारली. त्यांनी आपल्या मंदिरातून माझी आरोळी ऐकली; माझा धावा त्यांच्या कानांपर्यंत पोहोचला.

  15. कारण त्याचे मनोरथ तुम्ही पूर्ण केले आहेत; त्याने मागितलेली एकही गोष्ट तुम्ही अमान्य केली नाही. सेला

  16. त्याने तुमच्याजवळ जीवनाची मागणी केली— तुम्ही त्याला युगानुयुगाचे आयुष्य दिले.

  17. संगीत दिग्दर्शकासाठी. “पहाटेची हरिणी” या रागावर बसविलेले दावीदाचे स्तोत्र. माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला? मला वाचविण्यास तुम्ही एवढे दूर का राहिले, माझ्या विव्हळण्याची आरोळी तुम्हापासून दूर का?

  18. माझ्या परमेश्वरा, मी दिवसा तुम्हाला हाक मारतो, परंतु तुम्ही उत्तर देत नाही, रात्री पण मला कोणताही विसावा नाही.

  19. तुमच्यावर आमच्या पूर्वजांनी भरवसा ठेवला; तुमच्यावर त्यांनी भरवसा ठेवला आणि तुम्ही त्यांना सोडविले.

  20. त्यांनी तुमचा धावा केला आणि तुम्ही त्यांना वाचविले; तुमच्यावरील विश्वासाने त्यांना लज्जित होऊ दिले नाही.

  21. परंतु याहवेह, तुम्ही माझ्यापासून दूर राहू नका; हे माझ्या सामर्थ्या, माझ्या साहाय्यासाठी त्वरेने या.

  22. कारण त्यांनी दुःखितांचे दुःख, तुच्छ जाणले नाही किंवा त्यांचा तिरस्कार केला नाही; त्यांनी आपले मुख त्यांच्यापासून फिरविले नाही परंतु त्यांचा मदतीचा धावा त्यांनी ऐकला.

  23. दावीदाचे स्तोत्र. याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुमच्यावर भरवसा ठेवतो.

  24. जो कोणी तुमच्यावर आशा धरतो, तो कधीही लज्जित होणार नाही. पण जे विनाकारण उपद्रव देतात, ते सर्वजण लज्जित होतील.

  25. याहवेह, तुम्ही आपली महान कृपा व प्रीती स्मरण करा, ती सनातन काळापासून आहेत.