Skip to content

Prayer बद्दल बायबलमधील वचने

720 वचने · 120 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याजक आणि लेवीय हे लोकांना आशीर्वाद देण्यासाठी उभे राहिले आणि परमेश्वराने त्यांचे ऐकले, कारण त्यांची प्रार्थना स्वर्गात, परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानापर्यंत पोहोचली.

  2. राजा हिज्कीयाह आणि आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्टा यांनी याबद्दल रडून स्वर्गाकडे प्रार्थना केली.

  3. त्याच्या संकटात त्याने त्याचे परमेश्वर याहवेह यांची कृपा मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या पूर्वजांच्या परमेश्वरासमोर स्वतःला अधिक नम्र केले.

  4. सरतेशेवटी, सायंकाळच्या होमार्पणाची वेळ झाल्यावर अत्यंत गोंधळलेल्या, माझा झगा व अंगरखा फाटलेल्या स्थितीतच मी गुडघे टेकले आणि याहवेह माझ्या परमेश्वराकडे हात उंचावले.

  5. आणि त्यांचा धावा करून म्हटले: “हे माझ्या परमेश्वरा, माझे मुख तुमच्याकडे वर करण्याची मला खरोखरच लाज व कलंकित झाल्यागत वाटते. आमच्या पातकांची रास आता आमच्या डोक्यावरून गेली आहे, कारण आमचे अपराध आकाशापर्यंत अमर्यादित झाले आहेत.

  6. हे याहवेह, इस्राएलांच्या परमेश्वरा, तुम्ही नीतिमान आहात! आता आम्ही अवशेष असे उरलो आहोत. तुमच्या दृष्टीने आम्ही दोषी आहोत आणि आमच्या दोषांमुळेच तुमच्या समक्षतेत उभे राहणे आम्हांपैकी कोणालाही शक्य नाही.”

  7. परमेश्वराच्या भवनासमोर जमिनीवर पडून एज्रा रडत प्रार्थना करीत व पापांगिकार करीत असताना, इस्राएली पुरुष, स्त्रिया व मुले यांचा एक फार मोठा समुदाय त्याच्याभोवती जमा झाला. तेही अत्यंत दुःखाने रडू लागले.

  8. हे ऐकताच मी खाली बसलो व रडू लागलो. त्यानंतर काही दिवस मी अन्नपाणी वर्ज्य केले व मी स्वर्गाच्या परमेश्वरासमोर मोठ्या शोकाने प्रार्थना करीत राहिलो.

  9. मग मी म्हणालो: “हे महान व भयावह याहवेह, स्वर्गाच्या परमेश्वरा, जे तुमच्यावर प्रीती करतात व तुमच्या आज्ञा पाळतात, त्या सर्वांना तुम्ही प्रीतीने दिलेला करार पाळता,

  10. तुमचे कान माझ्या बोलण्याकडे लागो व तुमची दृष्टी तुमचा सेवक इस्राएली लोकांसाठी रात्रंदिवस करीत असलेल्या प्रार्थनेकडे वळो. आम्ही इस्राएली लोकांनी, मी व माझ्या पित्याच्या कुटुंबाने तुमच्याविरुद्ध घोर पाप केले आहे, हे मी कबूल करतो.

  11. आम्ही तुमच्याविरुद्ध दुष्टतेचे आचरण केले आहे. तुम्ही तुमचा सेवक मोशेद्वारे आम्हाला दिलेल्या आज्ञा, नियम व आदेश पाळले नाही.

  12. “तुम्ही मोशेला काय सांगितले होते याची कृपा करून आठवण करा. तुम्ही म्हटले होते, ‘जर तुम्ही अविश्वासू व्हाल, तर मी तुम्हाला राष्ट्रांमध्ये विखरून टाकीन;

  13. पण तुम्ही माझ्याकडे परत याल, माझ्या आज्ञा पाळाल, तर जगाच्या अगदी टोकाच्या कोपर्‍यातही बंदिवासात असलात, तरी मी तुम्हाला गोळा करून जे ठिकाण मी माझ्या नामाच्या निवासासाठी निवडले आहे तिथे आणेन.’

  14. आमच्या परमेश्वरा, आमचे ऐका, कारण आमचा उपहास होत आहे. त्यांची थट्टा त्यांच्याच शिरी उलटो आणि एखाद्या परकीय देशात बंदिवान म्हणून त्यांची लूट होऊ द्या.

  15. त्यांच्या अपराधांकडे डोळेझाक करू नका; त्यांचे पाप पुसून टाकू नका, कारण बांधणार्‍यांना त्यांनी अपमानित केले आहे.

  16. पण आम्ही आमच्या परमेश्वराची प्रार्थना केली आणि आपले संरक्षण करण्यासाठी शहरावर रात्रंदिवस पहारा ठेवला.

  17. व माझ्या अंगरख्याची दुमड धरून तो झटकून म्हटले, “जो कोणी या शपथेचे पालन करणार नाही, परमेश्वर त्याची घरे व त्याची संपत्ती असेच झटकून टाकेल. तर असा मनुष्य असाच झटकला जाऊन पूर्णपणे रिकामा होवो!” यावर सभेतील सर्व लोक म्हणाले, “आमेन” आणि त्यांनी याहवेहची स्तुती केली. सर्व लोकांनी आपल्या वचनाप्रमाणे केले.

  18. ज्या इस्राएली वंशजांनी स्वतःला सर्व गैरयहूद्यांपासून वेगळे ठेवले, ते आपआपल्या जागेवर उभे राहिले व त्यांनी स्वतःची आणि आपल्या पूर्वजांची पापे कबूल केली.

  19. “म्हणून आता, हे आमच्या महान, पराक्रमी व भयावह परमेश्वरा, तुम्ही तुमच्या प्रीतीचे वचन पाळता, म्हणून ज्या हालअपेष्टा आम्ही सहन केल्या, त्यांना तुमच्या नजरेत क्षुल्लक मानू नका—जी आमच्यावर, आमच्या राजांवर व अधिकार्‍यांवर, आमच्या याजक व संदेष्ट्यांवर, आमच्या पूर्वजांवर व तुमच्या सर्व लोकांवर, अश्शूरी राजाच्या राजवटीपासून आतापर्यंत संकटे आली.

  20. जे सर्वकाही आमच्याबाबत घडले, त्यात तुमची विश्वासार्हता कायम होती; तुमची वागणूक विश्वासयोग्य होती, पण आम्ही मात्र दुष्टपणे वागलो.

  21. आमचे राजे, आमचे अधिकारी, आमचे याजक आणि आमचे पूर्वज यांनी तुमचे नियम पाळले नाहीत किंवा तुमच्या आज्ञा व आदेश पाळण्याच्या ताकिदीकडे लक्ष दिले नाही.

  22. ते स्वतः राज्य करीत असताना, त्यांनी विशाल व सुपीक देशात तुमच्या थोर चांगुलपणाचा उपभोग घेतला. तरी देखील त्यांनी तुमची भक्ती केली नाही वा दुष्टपणापासून मागे वळले नाही.

  23. यानंतर, इय्योबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसाला शाप दिला.

  24. तो म्हणाला:

  25. “माझा जन्मदिवस नष्ट होवो, आणि ‘पुत्र गर्भधारण झाले!’ असे ज्या रात्रीने म्हटले,