मुख्य मजकुरावर जा

David

968 वचने · 40 कुटुंब सदस्य

David चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “तुम्ही दावीद या आपल्या सेवकाला मोठा सन्मान दिला आहे, तर मी पुढे काय बोलू? आपल्या सेवकाला तुम्ही ओळखता.

  2. यासाठी की ते स्थापित व्हावे आणि तुमचे नाव सर्वकाळ महान होईल. तेव्हा लोक म्हणतील, ‘सर्वसमर्थ याहवेह हे इस्राएलवर राज्य करणारे इस्राएलचे परमेश्वर आहेत!’ आणि आपला सेवक दावीदाचे घराणे तुमच्यासमोर स्थापित व्हावे.

  3. काही काळानंतर, दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्यावर ताबा घेतला आणि गथ व त्याच्या सभोवतालची गावे पलिष्ट्यांच्या ताब्यातून काढून घेतली.

  4. दावीदाने मोआबी लोकांचा सुद्धा पराभव केला आणि ते त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले.

  5. याशिवाय दावीद त्याच्या स्मारकाची उभारणी करण्यास फरात नदीकडे गेला असता, त्याने सोबाहचा राजा हादादेजर याचा हमाथाच्या परिसरात पराभव केला.

  6. दावीदाने त्याचे एक हजार रथ, सात हजार रथस्वार आणि वीस हजार पायदळ ताब्यात घेतले. परंतु रथाच्या घोड्यांपैकी शंभर घोडे सोडून बाकी घोड्यांच्या नसा कापून टाकल्या.

  7. जेव्हा दिमिष्कातील अरामी लोक सोबाहचा राजा हादादेजरच्या मदतीला आले तेव्हा दावीदाने त्यांच्यातील बावीस हजार जणांना ठार केले.

  8. नंतर त्याने दिमिष्कातील अरामी राज्यात ठाणे बसविले आणि अरामी लोक त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. दावीद जिथेही गेला, तिथे याहवेहने त्याला विजय दिला.

  9. हादादेजरचे अधिकारी वाहत असलेल्या सोन्याच्या ढाली दावीदाने घेतल्या आणि त्या यरुशलेमात आणल्या.

  10. हादादेजरच्या मालकीची नगरे तिबहाथ व कून येथून दावीद राजाने पुष्कळ कास्य आणले. शलोमोनाने हे नंतर वितळविले व मंदिर बांधण्याच्या कामात कास्याची मोठी टाकी, खांब आणि वेदीवरील यज्ञार्पणांसाठी लागणारी उपकरणे बनविण्याच्या उपयोगात आणले.

  11. हमाथाचा राजा तोऊ याने जेव्हा ऐकले की, दावीदाने सोबाहचा राजा हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे,

  12. तेव्हा त्याने आपला पुत्र हादोरामला दावीदाला आशीर्वाद देऊन अभिनंदन करण्यासाठी दावीद राजाकडे पाठवले, कारण दावीदाने हादादेजरशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळविला होता. कारण हादादेजर आणि तोऊ यांच्यातही युद्ध होते. हदोरामने त्याच्याबरोबर चांदी, सोने आणि कास्याच्या सर्वप्रकारच्या वस्तू आणल्या.

  13. दावीद राजाने या वस्तू, या सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही: एदोम आणि मोआब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी.

  14. त्याने एदोमात ठाणे बसविले, आणि सर्व एदोमी लोक दावीदाच्या अधीन झाले. दावीद जिथेही गेला तिथे याहवेहने त्याला विजय दिला.

  15. दावीदाने संपूर्ण इस्राएलवर राज्य केले व त्याच्या लोकांशी तो न्यायाने व सत्याने वागत असे.

  16. यहोयादाचा पुत्र बेनाइयाह करेथी आणि पेलेथी लोकांवर अधिकारी होता. दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य मंत्री होते.

  17. दावीदाने विचार केला, “हानूनचा पिता नाहाशने माझ्यावर दया दाखविली होती, तशी दया मी हानूनवर दाखवेन.” म्हणून दावीदाने हानूनच्या पित्याविषयी आपली सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राजदूत पाठवले. जेव्हा दावीदाचे राजदूत अम्मोनी लोकांच्या प्रदेशात आले,

  18. तेव्हा अम्मोनी अधिकार्‍यांनी हानूनला विचारले, “दावीदाने सहानुभूती व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे राजदूत पाठवून तुमच्या पित्याचा आदर केला आहे असे आपणास वाटते काय? दावीदाने त्यांना आपणाकडे केवळ देशाची पहाणी करण्यास, ते हेरण्यास व ते उद्ध्वस्त करण्यास पाठवले नाही काय?”

  19. तेव्हा हानूनने दावीदाच्या राजदूतांना ताब्यात घेऊन, प्रत्येकाचे मुंडण केले व त्यांची वस्त्रे मधोमध नितंबापर्यंत फाडून त्यांना परत पाठवून दिले.

  20. जेव्हा कोणी येऊन दावीदाला त्या माणसांबद्दल सांगितले, तेव्हा दावीदाने त्यांची भेट घेण्यासाठी माणसे पाठवली, कारण त्यांचा मोठा अपमान झाला होता. राजाने म्हटले, “तुमची दाढी वाढेपर्यंत यरीहोतच राहा, मग परत या.”

  21. जेव्हा अम्मोनी लोकांना समजून आले की, दावीदाला आपण घृणास्पद झालो आहोत, तेव्हा हानून व अम्मोन्यांनी अराम-नहराईम, अराम-माकाह व सोबाह येथून एक हजार तालांत चांदी देऊन सैन्य, रथ व घोडदळ ही भाड्याने आणली.

  22. हे ऐकून, दावीदाने संपूर्ण लढाऊ सैन्यासह योआबाला पाठवले.

  23. याविषयी जेव्हा दावीदाला सांगण्यात आले, तेव्हा त्याने सर्व इस्राएली सैन्य एकत्र केले आणि यार्देन नदी पार करून शत्रुसैन्याशी युद्ध सुरू केले. दावीदाने पुन्हा युद्धसीमेची खूण तयार केली व अराम्यांविरुद्ध युद्ध केले.

  24. परंतु अरामी सैन्यांनी इस्राएल समोरून पळ काढला आणि दावीदाने त्यांच्यातील सात हजार रथस्वारांना व चाळीस हजार पायदळांना ठार मारले. त्याने त्यांचा सेनापती शोफख यालाही ठार केले.

  25. जेव्हा हादादेजरच्या जहागीरदारांनी पाहिले की इस्राएलपुढे त्यांचा पराभव झाला, त्यांनी दावीदाशी समेट केला व ते त्याच्या अधीन झाले. यानंतर अरामी लोक पुन्हा कधीही अम्मोन्यांना त्याच्या युद्धामध्ये मदत करण्यास तयार झाले नाही.