- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
David
David चा उल्लेख असलेली वचने
इतर तीस जणांपेक्षा त्याला मोठा सन्मान दिला गेला, परंतु तिघांमध्ये त्याची गणती झाली नाही. आणि दावीदाने त्याला आपल्या अंगरक्षकांचा अधिकारी म्हणून नेमले.
कीशाचा पुत्र शौलाच्या सानिध्यातून हद्दपार केलेले असताना दावीदाला सिकलाग येथे येऊन मिळालेले योद्धे (ज्यांनी त्याला युद्धात साहाय्य केले त्या योद्ध्यांपैकी असलेले;
गादचे महान शूर वीरसुध्दा फितूर होऊन दावीद अरण्यवासात असताना त्याच्याकडे गेले. ते ढाली व भाले वापरण्यात निष्णात होते. त्यांचे चेहरे सिंहाच्या मुखासारखे असून ते डोंगरावरील हरणांसारखे चपळ होते.
बिन्यामीन व यहूदाह गोत्रातील दुसरे काहीजण दावीदाकडे गडावर आले.
दावीद त्यांच्या भेटीसाठी बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही मला मदत करावयास शांतीने आला असाल, तर तुम्हाला सहभागी करण्यास मी तयार आहे. पण मी निरपराध असताना मला शत्रूंच्या हवाली करण्यासाठी, माझा विश्वासघात करावयास तुम्ही आला असाल, तर आपल्या पूर्वजांचा परमेश्वर तुम्हाला पाहून घेईल व तुमचा न्याय करेल.”
तेव्हा त्या तिसांचा पुढारी अमासयवर पवित्र आत्मा आला आणि अमासय म्हणाला: “दावीद महाराज, आम्ही तुमचे आहोत! अहो इशायपुत्र, आम्ही तुमच्या बाजूचे आहोत! तुम्हाला शांती, कल्याण लाभो, आणि जे तुम्हाला मदत करतील, त्या सर्वांना यश लाभो. कारण तुमचे परमेश्वर तुम्हाला मदत करतील.” मग दावीदाने त्यांचा स्वीकार केला आणि त्यांना आपल्या गनिमी युद्धाच्या सेनेवर अधिकारी नेमले.
आणि दावीद पलिष्ट्यांशी शौलाच्या विरुद्ध लढायला गेला तेव्हा मनश्शेह गोत्रातीलही काही लोक दावीदाकडे फितूर झाले. (तरीही दावीद आणि त्याच्या माणसांनी पलिष्ट्यांची मदत केली नाही, कारण सल्लामसलत करून त्यांच्या अधिकार्यांनी त्याला पाठवून दिले. ते म्हणाले, “जर आपला धनी शौल याकडे तो फितूर झाला तर आमची शिरे धोक्यात जातील.”)
ते शूर योद्धे होते. त्यांनी पलिष्ट्यांच्या गनिमी युद्धाविरुद्ध दावीदाला मदत केली आणि ते त्याच्या सैन्यात सेनाधिकारी होते.
दररोज लोक दावीदाला येऊन मिळत होते. शेवटी त्याच्याकडे परमेश्वराच्या सेनेसारखी प्रचंड सेना जमा झाली.
दावीद हेब्रोन येथे असताना, त्याला अनेक कसलेले योद्धे येऊन मिळाले. याहवेहने वचन दिल्याप्रमाणे दावीदाला शौलाच्या जागी राजा होण्यास मदत करावी या उद्देशाने ते आले होते.
मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातले लोक दावीदाला राजा होण्यास मदत करण्यासाठी तातडीने पाठविण्यात आलेल्या सैन्यात होते 18,000;
हे सर्व योद्धे, जे सेनेत त्यांच्या हुद्यानुसार सहभागी होण्यास स्वेच्छेने आले. ते हेब्रोनला आले तेव्हा दावीदाला इस्राएलचा राजा करणे हा त्यांचा एकच उद्देश होता. वास्तविक पाहता सर्व इस्राएलींनी या गोष्टीस मान्यता दिली होती.
त्यांनी तिथे तीन दिवस दावीदाबरोबर घालवून, खाणेपिणे केले, कारण त्यांच्या कुटुंबाने त्यांचा तसा प्रबंध केला होता.
दावीदाने आपल्या सेनाधिकार्यांचा, म्हणजे प्रत्येक सहस्राधिपती, शताधिपतीचा सल्ला घेतला.
जमलेल्या संपूर्ण इस्राएली सभेपुढे दावीदाने असे भाषण केले, “जर तुम्हाला योग्य वाटते आणि आपल्या याहवेह परमेश्वरानेही या गोष्टीला संमती दिली आहे, त्याअर्थी आपल्यात सामील होण्यासाठी, आपण इस्राएलातील सर्व बंधूना, तसेच याजक, लेवी, जे त्यांच्यासह नगरात व मळ्यात आहेत त्यांना आमंत्रणाचा संदेश पाठवू या.
मग दावीदाने परमेश्वराचा कोश किर्याथ-यआरीमहून आणण्याच्या वेळी इजिप्तच्या शिहोर नदीपासून ते लबो हमाथपर्यंत सर्वत्र विखुरलेल्या इस्राएली लोकांना एकत्र केले.
दावीद व इस्राएलचे सर्व लोक यहूदीयातील बालाह म्हणजे किर्याथ-यआरीम येथे, जो त्या नावाने संबोधित केला जातो, सर्वसमर्थ याहवेह परमेश्वराचा कोश, जे करुबांमध्ये आरूढ आहेत, तो आणण्यासाठी निघाले.
दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक त्यांच्या सर्व शक्तीने परमेश्वरासमोर वीणा, सारंगी, डफ, डमरू, झांजा व कर्णे वाजवित आनंद करीत होते.
तेव्हा दावीदाला राग आला कारण याहवेहचा क्रोध उज्जाहवर भडकला होता आणि आजपर्यंत त्या ठिकाणाला पेरेस-उज्जाह असे म्हणतात.
त्या दिवशी दावीदाला परमेश्वराचे भय वाटले, तो म्हणाला, “परमेश्वराचा कोश मी आपल्याकडे कसा नेऊ?”
त्याने कोश त्याच्याबरोबर दावीदाच्या नगरात नेला नाही. त्याऐवजी त्याने तो गित्ती ओबेद-एदोम याच्या घरी नेला.
आता सोरचा राजा हीरामाने दावीदाकडे दूत पाठविले व दावीदासाठी राजवाडा बांधावा म्हणून त्यांच्याबरोबर देवदारू लाकडे, गवंडी व सुतार पाठवले.
आणि दावीदाने जाणले की याहवेहने आपल्याला इस्राएलवर राजा म्हणून स्थापित केले आहे आणि आपल्या इस्राएली लोकांसाठी त्याचे राज्य खूप उंचावले आहे.
यरुशलेमात दावीदाने अनेक पत्नी व उपपत्नी केल्या आणि त्याला आणखी पुत्र आणि कन्या झाल्या.
इस्राएलवर राजा म्हणून दावीदाचा अभिषेक झाला आहे असे पलिष्ट्यांनी जेव्हा ऐकले, तेव्हा ते त्याला शोधण्यासाठी आपले सर्व सैन्य घेऊन निघाले, परंतु दावीदाने याबद्दल ऐकले तेव्हा तो त्यांना भेटण्यास गेला.