मुख्य मजकुरावर जा

David

968 वचने · 40 कुटुंब सदस्य

David चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि मी तुला आणि या शहराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवेन. माझ्या नावाच्या गौरवासाठी व माझा सेवक दावीदासाठी मी या शहराचे रक्षण करेन.’ ”

  2. त्याने घडविलेली कोरीव अशेराची स्तंभे घेतली व मंदिरात ठेवली. या मंदिराविषयी याहवेह, दावीद व त्याचा पुत्र शलोमोनला म्हणाले होते, “इस्राएलांच्या सर्व गोत्रांतून मी निवडलेल्या यरुशलेम शहरात व या मंदिरात माझे नाव मी सर्वकाळासाठी ठेवेन.

  3. याहवेहच्या दृष्टीने जे योग्य तेच त्याने केले आणि उजवीकडे किंवा डावीकडे न वळता त्याचे पूर्वज दावीदच्या मार्गांचे पूर्णपणे पालन केले.

  4. सहावा ओसेम, व सातवा दावीद हे होते.

  5. हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे पुत्र: दावीदाचा ज्येष्ठपुत्र अम्नोन. दावीदाला तो येज्रीली अहीनोअमपासून झाला. दावीदाचा दुसरा पुत्र दानीएल. त्याच्या आईचे नाव अबीगईल असे असून ती कर्मेलची होती.

  6. या यादीमध्ये त्याला त्याच्या उपपत्नींपासून झालेल्या पुत्रांचा समावेश केलेला नाही. दावीदाला तामार नावाची एक कन्याही होती.

  7. बेथ-मर्काबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराईम. दावीदाच्या कारकिर्दीपर्यंत ही त्यांची शहरे होती.

  8. कोश स्थायिक झाल्यावर दावीदाने याहवेहच्या मंदिरात गायकवृंदात जे पुरुष नेमले ते:

  9. तोलाचे पुत्र: उज्जी, रफायाह, यरीएल, यहमय, इबसाम व शमुवेल हे—त्याचा पिता तोलाच्या घराण्याचे प्रमुख असून आपल्या वंशातील योद्धे होते. त्यांची संख्या दावीदाच्या कारकिर्दीत 22,600 होती.

  10. द्वारपालांच्या कामासाठी 212 लोक निवडले होते. त्यांच्या गावी त्यांच्या वंशावळीत त्यांची नोंद केलेली होती. विश्वासयोग्यता पाहून त्यास दावीद व शमुवेल संदेष्टा यांनी त्या कामगिरीवर नेमले होते.

  11. आणि याहवेहचे मार्गदर्शन नाकारले, यामुळे याहवेहने त्याचा वध केला आणि त्याचे राज्य इशायाचा पुत्र दावीदास सोपविले.

  12. मग इस्राएलचे पुढारी एकत्र आले व हेब्रोन येथे दावीदाकडे आले आणि त्याला म्हणाले, “आम्ही तर तुमचेच मांस आणि रक्त आहोत.

  13. जेव्हा इस्राएलचे सर्व वडील लोक हेब्रोनात दावीद राजाकडे आले होते, तेव्हा त्याने याहवेहसमोर हेब्रोन येथे त्यांच्याशी एक करार केला आणि त्यांनी दावीदाचा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला, जसे याहवेहने शमुवेलद्वारे वचन दिले होते.

  14. नंतर दावीद व इस्राएलचे सर्व लोक मिळून यरुशलेमला (म्हणजे यबूसला) गेले.

  15. तिथे राहणारे यबूसी लोक दावीदाला म्हणाले, “तू या शहरात प्रवेश करू शकणार नाही.” तरीही, दावीदाने सीयोन गड हस्तगत केला; हेच दावीदाचे शहर आहे.

  16. दावीद म्हणाला, “जो कोणी यबूसींवर हल्ला करण्यात पुढाकार घेईल तो सेनापती होईल.” मग जेरुइयाहचा पुत्र योआबने पहिल्याने आक्रमण करण्यास गेल्यामुळे तो दावीदाच्या सैन्याचा सेनापती झाला.

  17. तेव्हा दावीदाने त्या गडामध्ये आपला निवास केला, म्हणून त्याला दावीदाचे शहर असे नाव पडले.

  18. आणि दावीद अधिकाधिक शक्तिशाली बनत गेला, कारण सर्वसमर्थ याहवेह त्याच्याबरोबर होते.

  19. दावीदाच्या काही अत्यंत शूर योद्ध्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत—याहवेहच्या कराराप्रमाणे या योद्ध्यांनी इस्राएली पुढार्‍यांसह राज्याची वाढ करण्यासाठी त्याला मजबूत आधार दिला.

  20. दावीदाच्या पराक्रमी योद्ध्यांची नावे: हखमोनी याशबआम हा दावीदाच्या सैन्यातील पहिल्या श्रेणीच्या वीरांपैकी होता; त्याने भाला उगारून एका हल्ल्यात तीनशे लोकांचा वध केला.

  21. पस-दम्मीम येथे पलिष्ट्यांबरोबर केलेल्या लढाईत तो दावीदाबरोबर होता. तो जवाच्या शेतात असताना इस्राएली सैन्याने पलिष्ट्यांपुढून पळ काढला होता.

  22. जेव्हा पलिष्ट्यांच्या टोळीने रेफाईमच्या खोर्‍यात छावणी दिली होती तेव्हा तीस मुख्य सेनापती योद्ध्यांपैकी तिघे जण दावीदाकडे अदुल्लाम गुहेतील खडकाकडे आले.

  23. त्यावेळी दावीद गडावर होता आणि पलिष्टी सेना बेथलेहेम नगरात होती.

  24. दावीदाला पाणी पिण्याची उत्कट इच्छा झाली व तो म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे झाले असते!”

  25. तेव्हा या तीन पराक्रमी योद्ध्यांनी पलिष्ट्यांच्या छावणीमधून घुसून, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी काढून दावीदाकडे आणले. परंतु दावीदाने ते पिण्याचे नाकारले; आणि ते याहवेहसमोर ओतले.