मुख्य मजकुरावर जा

David

968 वचने · 40 कुटुंब सदस्य

David चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेहच्या वचनानुसार तो वेदीविरुद्ध ओरडला: “वेदी, हे वेदी! याहवेह असे म्हणतात: ‘दावीदाच्या घराण्यात योशीयाह नावाचा पुत्र जन्माला येईल. जे याजक तुझ्यावर येथे यज्ञ करतात, त्यांचे यज्ञ तो तुझ्यावर करेल, मनुष्यांची हाडे तुझ्यावर जाळली जातील.’ ”

  2. दावीदाच्या घराण्यापासून राज्य फाडून ते मी तुला दिले, पण तू माझा सेवक दावीदाप्रमाणे नाहीस, त्याने माझ्या आज्ञा पाळल्या व त्याच्या आयुष्यभर त्यांचे अनुसरण केले आणि केवळ जे माझ्या दृष्टीने योग्य ते त्याने केले.

  3. रेहोबोअम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या शहरात त्याच्या पूर्वजांजवळ पुरण्यात आले. त्याच्या आईचे नाव नामाह होते; ती अम्मोनी होती. त्याचा पुत्र अबीयाह राजा म्हणून त्याचा वारस झाला.

  4. त्याच्या वडिलांनी त्याच्यापूर्वी जी पापे केली होती ती सर्व पापे त्याने केली; त्याचा पूर्वज दावीदाप्रमाणे त्याचे हृदय याहवेह त्याच्या परमेश्वराशी पूर्णपणे समर्पित नव्हते.

  5. तरीपण दावीदाप्रित्यर्थ याहवेह त्याचे परमेश्वर यांनी त्याला त्याचा वारस म्हणून यरुशलेमात त्याला दीप दिला व यरुशलेमास बलवान बनविले.

  6. कारण दावीदाने याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले होते आणि उरीयाह हिथीची घटना वगळता, दावीद आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात याहवेहची कोणतीही आज्ञा पाळण्यापासून मागे वळला नाही.

  7. मग अबीयाह त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या शहरात पुरले गेले. आणि त्याचा पुत्र आसा राजा म्हणून त्याचा वारस झाला.

  8. आसाने आपला पूर्वज दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.

  9. मग आसा त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याचा पिता दावीदाच्या शहरात पुरला गेला. आणि त्याचा पुत्र यहोशाफाट राजा म्हणून त्याचा वारस झाला.

  10. त्यानंतर यहोशाफाट आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याबरोबर त्याचा पिता दावीदाच्या शहरात पुरले. आणि त्याचा पुत्र यहोराम त्याचा वारस म्हणून राजा झाला.

  11. तथापि आपला सेवक दावीदासाठी याहवेहने यहूदाहचा नाश केला नाही. कारण त्यांनी दावीदाच्या वंशजाचा दिवा कायम ठेवण्याचे अभिवचन दिले होते.

  12. यहोराम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि तो त्यांच्याबरोबर दावीदाच्या नगरात पुरला गेला आणि वारस म्हणून त्याचा पुत्र अहज्याह राजा झाला.

  13. त्याच्या सेवकांनी त्याला रथामधूनच यरुशलेमास नेले व दावीदनगरीत त्याच्या पूर्वजांच्या थडग्यात त्याला मूठमाती दिली.

  14. याहवेहच्या मंदिरामधील दावीद राजाचे जे भाले व ढाली होत्या, त्या अधिकाऱ्यांच्या हाती दिल्या.

  15. ज्या अधिकार्‍यांनी त्याचा वध केला ते शिमाथाचा पुत्र योजाखार व शोमेराचा पुत्र यहोजाबाद हे होते. तो मरण पावला आणि त्याला दावीदनगरीत पूर्वजांच्या सोबत मूठमाती देण्यात आली. त्याचा पुत्र अमस्याह हा त्याच्या जागी राजा झाला.

  16. त्याने याहवेहच्या दृष्टीने योग्य ते केले, परंतु त्याचा पिता दावीदासारखे नव्हे. त्याने प्रत्येक गोष्टीत त्याचा पिता योआशचे अनुकरण केले.

  17. त्याला घोड्यावरून परत आणण्यात आले आणि यरुशलेममध्ये दावीदाच्या शहरात त्याच्या पूर्वजांबरोबर पुरण्यात आले.

  18. अजर्‍याह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ दावीदनगरीत पुरण्यात आले. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र योथाम राजा झाला.

  19. योथाम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ, त्याचा पिता दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. आणि वारस म्हणून त्याचा पुत्र आहाज राजा झाला.

  20. वयाच्या विसाव्या वर्षी आहाज राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. त्याचे वडील दावीदाने केले त्याप्रमाणे, याहवेह त्याच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले नाही.

  21. आहाज आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. त्याचा पुत्र हिज्कीयाह वारस म्हणून राजा झाला.

  22. जेव्हा याहवेहने इस्राएल दावीदाच्या घराण्यापासून फाडून काढला, तेव्हा इस्राएली लोकांनी नेबाटाचा पुत्र यराेबाेअमास आपला राजा केले. तेव्हा यरोबोअमाने इस्राएली लोकांना याहवेहच्या मागे जाण्यापासून बहकविले आणि त्यांना फार मोठे पाप करण्यास लावले.

  23. त्याने आपला पिता दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.

  24. माझ्याकरिता आणि माझा सेवक दावीदाच्या स्मरणार्थ, मी या यरुशलेम नगराचे रक्षण करेन!’ ”

  25. “परत जा आणि माझ्या लोकांचा अधिपती हिज्कीयाहला सांग, ‘तुझे पूर्वज दावीदाचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले आहेत; आजपासून तिसर्‍या दिवशी तू याहवेहच्या मंदिरात जाशील. मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षांची भर घालेन.