मुख्य मजकुरावर जा

The Tribes of Israel बद्दल बायबलमधील वचने

241 वचने · 21 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु त्यांनी जर इस्राएलातील इतर गोत्रातील पुरुषांशी लग्न केले, तर त्यांचे वतन आमच्या पूर्वजांच्या वतनातून काढून ज्या गोत्रात त्या लग्न करून जातील त्यांच्यात जोडले जाईल. म्हणजे आम्हाला मिळालेल्या वतनाचा भाग काढून घेतला जाईल.

  2. आणि जेव्हा इस्राएल लोकांचे योबेल वर्ष येईल, तेव्हा त्यांचे वतन ज्या गोत्रात ते लग्न करून जातील त्यांच्यात जोडले जाईल आणि त्यांचे वतन आमच्या पूर्वजांच्या गोत्रातून काढून घेतले जाईल.”

  3. नंतर याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने इस्राएली लोकांना हा हुकूम दिला: “योसेफाच्या गोत्राचे वंशज जे म्हणत आहेत ते बरोबर आहे.

  4. सलाफहादच्या कन्यांसंबंधी याहवेह अशी आज्ञा देतात: त्यांना आवडेल त्या व्यक्तीशी त्यांनी विवाह करावा, परंतु आपल्याच पित्याच्या गोत्राच्या कुळात त्यांनी विवाह करावा.

  5. इस्राएलचे वतन एका गोत्रातून दुसर्‍या गोत्रात जाऊ नये, तर प्रत्येक इस्राएली व्यक्तीने आपल्या पूर्वजांच्या गोत्राच्या वतनाला जपावे.

  6. इस्राएली लोकांतील कोणत्याही गोत्रातील ज्या प्रत्येक मुलीला वतन मिळाले असेल, तिने आपल्या पित्याच्या गोत्राच्या कुळातील एखाद्या व्यक्तीशी विवाह करावा, यासाठी की प्रत्येक इस्राएली व्यक्तीला आपल्या पूर्वजांचे वतन मिळेल.

  7. कोणतेही वतन एका गोत्रातून दुसर्‍या गोत्रात जाणार नाही, तर इस्राएली लोकांच्या प्रत्येक गोत्राने आपल्या वतनाला जपावे.”

  8. त्यावेळी आपण काबीज केलेला प्रदेश मी रऊबेन व गाद यांच्या वंशास दिला. रऊबेन व गादच्या वंशांना मी आर्णोन नदीवरील अरोएरापासून गिलआद पर्वताचा अर्धा भाग त्यातील शहरांसह दिला.

  9. गिलआद पर्वताचा उरलेला अर्धा भाग आणि ओग राजाचे पूर्वीचे राज्य म्हणजे अर्गोब विभाग हा मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रास दिला. (बाशानच्या अर्गोब प्रदेशाला रेफाईमचा देश असेही म्हणत.

  10. मनश्शेहच्या वंशातील याईराच्या कुळाने गशूरी व माकाथी लोकांच्या सीमेपर्यंतचा अर्गोबचा संपूर्ण प्रदेश आपल्या ताब्यात घेतला; त्याच्या नावावरून त्या प्रदेशाचे नाव पडले, त्यामुळे आजपर्यंत बाशानाला हव्योथ याईर म्हणतात.)

  11. आणि मी गिलआद देश माखीरला दिला.

  12. रऊबेन आणि गाद यांना मात्र गिलआद देशातील यब्बोक नदीपासून ते आर्णोन नदीच्या खोर्‍याच्या मध्यापर्यंतचा सर्व भाग मिळाला. गिलआद ही अम्मोन लोकांची सीमा होती.

  13. तसेच किन्नेरेथाच्या समुद्रापासून अराबाचा समुद्र (म्हणजे मृत समुद्र) आणि पिसगाच्या उतरणी खालील अराबा व यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रदेशही त्यांनाच मिळाला.

  14. त्यावेळी मी तुम्हाला आज्ञा दिली: “याहवेह तुमच्या परमेश्वराने हा प्रदेश तुम्हाला वतन म्हणून दिलेला आहे, परंतु तुम्ही त्यात वस्ती करण्यापूर्वी तुमच्या सक्षम योद्ध्यांना शस्त्रे धारण करून यार्देन ओलांडून इतर इस्राएलाच्या पुढे पाठवावे.

  15. तुमच्या स्त्रिया, मुले आणि तुमची जनावरे (मला माहीत आहे तुमच्याकडे विपुल गुरे आहेत) यांना मी तुम्हाला दिलेल्या शहरात राहता येईल,

  16. यार्देनेच्या पश्चिमेला याहवेह देत असलेल्या देशात तुमचे इस्राएली बांधव वस्ती करेपर्यंत आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने ज्याप्रमाणे तुम्हाला विसावा दिला आहे, त्याप्रमाणे त्यांनाही विसावा मिळेपर्यंत, तुमच्या बांधवांना मदत करा. त्यानंतर जो प्रदेश मी तुम्हाला दिला आहे येथे तुम्ही आपल्या वतनावर परत यावे.”

  17. तुम्ही यार्देन नदी पार करून जाल, तेव्हा शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार, योसेफ व बिन्यामीनच्या गोत्रांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम पर्वतावर उभे राहावे.

  18. आणि रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफताली यांच्या गोत्रांनी शापवचने उच्चारण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.

  19. “रऊबेन जिवंत राहो व त्यास मृत्यू न येवो, त्याची माणसे कमी न होवोत.”

  20. आणि तो यहूदाहबद्दल असे म्हणाला: “हे याहवेह, यहूदाहचा धावा ऐका; आणि त्याला आपल्या लोकांजवळ आणा. स्वतःच्या हाताने ते त्याचे संरक्षण करतात, तुम्हीच त्याच्यासाठी त्याच्या शत्रूविरुद्ध साहाय्य व्हा!”

  21. मग तो लेवी विषयी म्हणाला: “तुमचे उरीम व थुम्मीम, तुमच्या विश्वसनीय लोकांच्या अधिकारात कायम राहोत. ज्यांची तुम्ही मस्सा येथे परीक्षा घेतली; आणि मरीबाहच्या झर्‍याजवळ तुम्ही त्यांच्याशी झुंज दिली.

  22. आपले आई आणि वडील यांच्याबद्दल त्याने म्हटले, ‘ते माझे कोणीही नाहीत.’ त्याने आपल्या बांधवांना ओळखले नाही, किंवा आपल्या संततीस ओळखले नाही, परंतु त्याने तुमच्या आज्ञांचे पालन केले, आणि तुमच्या कराराशी ते प्रामाणिक राहिले.

  23. ते तुमचे विधी याकोबाला, आणि तुमचे नियमशास्त्र इस्राएली लोकांना शिकवतील. धूपाच्या वेदीवर ते धूप जाळतील, व तुमच्या वेदीवर संपूर्ण होमबली अर्पितील.

  24. हे याहवेह, त्यांचे सर्व कौशल्य आशीर्वादित करा, आणि त्यांची हस्तकृती तुम्हाला प्रसन्न करो. त्यांच्याविरुद्ध जे उठतात त्यांना चिरडून टाका, आणि ते पुन्हा उठणार नाहीत, असे करा.”

  25. मोशे बिन्यामीनाबद्दल म्हणाला: “याहवेहचा लाडका त्यांच्याजवळ सुरक्षित राहो, कारण दिवसभर याहवेह त्याची ढाल होऊन त्याला आपली सुरक्षा प्रदान करतात, आणि जो याहवेहला प्रिय आहे तो त्यांच्या दोन्ही खांद्यामध्ये सुरक्षित आहे.”